पुनर्विवाह झालेल्या पत्नीचा पहिल्या पतीच्या मालमत्तेत वारसाहक्क आहे ???

Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

जरी आपल्या कडे हिंदू वारसा हक्क कायदा हा एक स्वतंत्र कायदा असला तरी मात्र हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार विविध वारसांना मिळणारे हक्क आणि अधिकार हा विषय काहीसा क्लिष्ट राहिलेला दिसून येत आहेत. त्यामुळे आपल्याला अनेक वेळा आजही वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नक्की कोणकोणत्या वारसांदारांचा अधिकार आहे, यावरून अनेक वादविवाद पाहायला मिळत असतात.

तसेच या भांडणात अजून एक महत्त्वाचा वाद असतो तो म्हणजे विधवेच्या हक्कासंदर्भात होय! कारण एखाद्या महिला पतीच्या निधनानंतर विधवा झाल्यास आणि जर त्या विधवा महिलेने पुनर्विवाह केल्यास तिला पहिल्या पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा मिळणार की नाही असा एक महत्त्वाचा प्रश्न अनेक लोकांना पडत असतो.

त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासमोर एका याचिकेद्वारे उपस्थित झालेला होता. दरम्यान, आता या प्रकरणाची सर्वसाधारण वस्तुस्थिती लक्षात घेता जर उदा, एका रेल्वेमध्ये कामाला आलेल्या व्यक्तीची निधनानंतर त्याच्या विधवा पत्नीनें दुसरं लग्न केलं म्हणजे पुनर्विवाह केले. मात्र, तिचा पहिला पती असल्यामुळे सहाजिकच त्या व्यक्तीच्या निधनानंतर जे लाभ दिले जातात

तसेच लाभ त्या पतीला म्हणजेच त्यांच्या वारसांना मिळणार होते आणि त्या लाभांमध्ये जे नॉमिनेशन असतं ते पत्नीच्या नावे करण्यात आले होते. मात्र, सहाजिकच या सगळ्या परिस्थितीच्या आधारे त्या रेल्वेने ते जे काही लाभ किंवा पैसे मिळणार होते त्याचा काही भाग हा पत्नीला सुद्धा दिले की, जीचा पुनर्विवाह झाला होता.

मात्र हे सर्व त्या निधन झालेल्या व्यक्तीच्या आईला म्हणजेच त्याच्या महिलेच्या सासूला मान्य नसल्यामुळे तिने तिकडच्या न्यायालयामध्ये एक दावा ठोकला की, या पत्नीचे दुसरं लग्न झालेला असल्यामुळे सगळे पैसे मला मिळाले पाहिजे, हा तिचा दावा मंजूर करण्यात आला. मात्र याच गडबड अशी झाली की, या दाव्याचे कामकाज चालू असतांना किंवा निकालाच्या आधी त्यातला काही भाग हा पुनर्विवाह केलेल्या स्त्रीला देऊन टाकला जातो.

मग या धक्कादायक घटनेनंतर या न्यायालयाच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये अपील करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती अपील मंजूर करण्यात आली आणि जिल्हा न्यायालय असं म्हणाल की, त्या पत्नीला सुद्धा निधन झालेल्या पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क आणि अधिकार असल्यामुळे तिला त्या पैशाचा काही भाग मिळणं हे योग्य होतं.

आता हा जो जिल्हा न्यायालयाच्या निकाल आला त्यावेळी त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आली. आता या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्यतः 2 कायद्यासंदर्भात वाद निर्माण झाला. एक म्हणजे हिंदू विडोज रीमॅरेज ऍक्ट तसेच दुसरा हिंदू सक्सेशन ऍक्ट. आता हिंदू विडोज रीमॅरेज ऍक्ट हा कायदा सुद्धा रद्द झालेला आहे.

आणि हिंदू सक्सेशन ऍक्ट यामधील कलम 24 संदर्भात विशेषत्वाने वादविवाद झाल्यानंतर हे कलम 24 सुद्धा आता रद्द झालेला आहे. हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम 24 मध्ये नक्की काय तरतूद होती तर त्यामध्ये विधवा पत्नीच्या पुनर्विवाह संदर्भात तरतूद करण्यात आलेली होती. याचबरोबर, जर एखाद्या महिलेने पहिल्या पतीच्या निधनानंतर म्हणजे ती विधवा झाल्यानंतर जर दुसरं लग्न केलं तर तिला वारसा हक्क मिळणार नाही.

अशा स्वरूपाची तरतूद हिंदू सक्सेशन act कलम 24 मध्ये करण्यात आली असून मात्र कालांतराने म्हणजे 2005 सली हिंदू सक्सेशन ऍक्ट मधील कलम 24 हेसुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या दुसर लग्न केलेल्या विधवेला काही वारसा हक्क आहे का ? आणि जर असेल तर त्याची व्याप्ती किती ? असे 2 मुख्य प्रश्न निर्माण झाले होते.

कारण हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम चोवीस यामध्ये अशी विशिष्ट तरतुद आहे की, ज्या दिवशी वारसा हक्क निर्माण होतो त्या दिवशी जर पुनर्विवाह झालेला असेल तर त्या पुनर्विवाहित पत्नीला वारसा हक्क मिळणार नाही. सहाजिकच या तरतुदी मधलं जेव्हा वारसा हक्क निर्माण होतो हे शब्द इंग्लिश मध्ये (ऑन द डेट में सक्सेशन ओपन) असे मुद्रित केलेले आहे ते अत्यंत महत्वाचे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात अशा निष्कर्षां प्रती निकाल जाहीर करण्यात आला की, ज्या दिवशी वारसा हक्क निर्माण होतो, त्याच दिवशी पुनर्विवाहित जर पत्नी असेल तर तिला हक्क अधिकार मिळणार नाही असा त्याचा अर्थ असल्याचे सांगितले गेले.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *