आपले महाराष्ट्र राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्य शासनाचे प्रमुख असतात. महाराष्ट्रातील एकूण मुख्यमंत्री यांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मागील 61 वर्षात जवळजवळ 20 मुख्यमंत्र्यांची निवड झालेली आहे.
या वीस मुख्यमंत्रीमध्ये सर्वात जास्त वेळा कॉग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले दहा नेते कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरवात करूया.
1. उद्धव ठाकरे: महाराष्ट्रमध्ये सर्वात जास्त मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा नंबर लागतो. 2019 मध्ये शिवसेना पक्षातून निवडून आल्यावर महाविकास आघाडी बरोबर ड्युटी करून त्यांनी आपले सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता विचार केला तर 28 नोव्हेंबर 2001 ते 30 जून 2022 असे एकूण 2 वर्ष 214 दिवस उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रमध्ये एक वेळेस मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे.
2. वसंत दादा पाटील : महाराष्ट्रात सर्वात जास्त मुख्यमंत्री पद भूषवणारे नेत्यांमध्ये वसंत दादा पाटील आहेत. 1977-78 आणि 1983 मध्ये काँग्रेसच्या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. वसंत दादा पाटील यांचे असा विचार केला तर त्यांनी सलग 2 वर्षे 214 दिवस मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला आहे त्यांचा एकूण कार्यक्रम पाहिला तर 3 वर्षे 183 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. वसंत दादा पाटील यांनी महाराष्ट्रात 3 वेळेस मुख्यमंत्री पद धारण केलेले आहे.
3. पृथ्वीराज चव्हाण: महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त मुख्यमंत्री पद भूषवणारे नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा क्रमांक लागतो. 2010 मध्ये काँग्रेस पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्ता विचार केला तर 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 असे 3 वर्षे 321 दिवस पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र मध्ये एक वेळेस मुख्यमंत्री पद धारण केले आहे.
4. मनोहर जोशी: महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या नेत्यांमध्ये मनोहर जोशी यांचा क्रमांक लागतो. 1995 मध्ये शिवसेना या पक्षातून निवडून भाजप-शिवसेना युती नेत्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. मनोहर जोशी यांच्या कार्यकर्ता विचार केला तर त्यांनी 14 मार्च 1995 ते 1 फेब्रुवारी 1999 असे एकूण 3 वर्षें 324 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सांभाळले आहे. मनोहर जोशी यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेळेस मुख्यमंत्री पद धारण केलेले आहे.
5. शंकरराव चव्हाण: महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त मुख्यमंत्री पद भूषवणारे नेत्यांमध्ये शंकरराव चव्हाण यांचा क्रमांक लागतो. 1975 आणि 1983 मध्ये काँग्रेसच्या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यक्रमाचा विचार केला तर त्यांनी सलग 2 वर्षे 106 दिवस मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांचा एकूण कार्यक्रम पाहिला तर 4 वर्षे 191 दिवस त्यांनी आपले मुख्यमंत्री पद भूषवले आहे. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र मध्ये दोन वेळेस मुख्यमंत्री पद धारण केले आहे.
6. देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा क्रमांक लागतो. 2014 आणि 2019 मध्ये भाजप या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य।काळाचा विचार केला तर यांनी सलग 5 वर्षे 12 दिवस मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांचा एकूण पाहिला तर यांनी 5 वर्षे 17 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे . महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच पाच दिवस मुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांनी महाराष्ट्रात दोन वेळेस मुख्यमंत्री पद धारण केलेले आहे.
7. यशवंतराव चव्हाण: महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा क्रमांक लागतो. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. 1960 मध्ये काँग्रेसच्या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा विचार केला तर त्यांनी 6 वर्षे 119 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे.
8. शरद पवार: महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे नेत्यांमध्ये शरद पवार यांचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील आजपर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. वयाच्या 38 व्या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 1978, 1988 आणि 1993 मध्ये राष्ट्रवादी या पक्षाचे निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. शरद पवार यांच्या कार्याचा विचार केला तर त्यांनी 6 वर्षे 221 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे आणि महाराष्ट्रात चार वेळेस मुख्यमंत्री पद धारण केलेले आहे.
9. विलासराव देशमुख: महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे नेत्यांमध्ये विलासराव देशमुख यांचा क्रमांक लागतो. लातूर विभागाचे खंबीर नेतृत्व आणि महाराष्ट्राचे आदर्श मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांची ओळख आहे. 1999 आणि 2004 मध्ये काँग्रेसच्या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार सत्ता स्थापन केली होती. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात असा विचार केला तर त्यांनी 7 वर्षे 4 महिने 5 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे.
10. वसंतराव नाईक महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे नेत्यांमध्ये वसंतराव नाईक यांचा पहिला क्रमांक लागतो.1963-1975 मध्ये काँग्रेसच्या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. वसंतराव कार्य काळाचा विचार केला तर यांनी सलग 11 वर्ष 2 महिने 16 दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आहे. वसंतराव नाईक यांनीच महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात तीन वेळेस मुख्यमंत्री पद धारण केले आहे.