कोर्टाच्या प्रत्येक तारखेस आपल्याला उपस्थित राहणे बंधनकारक असते का? जर गैरहजर राहिलो तर काय?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. परंतु आजच्या काळात या ना त्या कारणाने प्रत्येकाला कोर्टाची पायरी चढावीच लागते. जेंव्हा एखाद्या दिवाणी दाव्यासाठी किंवा फौजदारी खटल्यामुळे कोर्टाची पायरी चढण्याचा योग येतो तेंव्हा त्याच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो, तो म्हणजे कोर्टाने दिलेल्या प्रत्येक तारखेस आपणास हजर राहावे लागेल का?

बरेच लोक आपल्या कामात व्यस्त असतात, काही लोक बाहेर गावी राहत असतात, काही लोकांचे इतर काही कारण असतात ज्यामुळे ते सतत कोर्टात हजार राहू शकत नाहीत. त्यामुळे आजच्या या लेखात आपण लोकांच्या मनातील याच प्रश्नाचे उत्तर सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

मित्रांनो, एका वाक्यात उत्तर देता येईल एवढा हा सोपा प्रश्न नाही, त्यामुळे आपणास याची माहिती सविस्तर घ्यावी लागेल. मूल प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे ती म्हणजे कोर्टात दिवाणी दावे आणि फौजदारी खटले हे मुख्य 2 प्रकारचे कामकाज चालते.

दिवाणी दाव्यांमद्धे स्थावर मालमत्ते संबंधी 2 किंवा अधिक लोकांमधील वाद असतात, तर फौजदारी खटले हे गुन्ह्यांसाठी असतात. हे जाणून घेण्याचे कारण म्हणजे, या दोन प्रकारांपैकी एका प्रकारामध्ये आपली उपस्थिती ही बंधनकारक नाही. परंतु एका प्रकरणामद्धे आपली उपस्थिती ही बंधनकारक आहे.

फौजदारी खटला : फौजदारी खटल्यामद्धे एका किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींवर एखाद्या गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात आलेला असतो. जो पर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत सदर व्यक्तींना आरोपी असे संबोधण्यात येते, कोर्टाने जर त्या आरोपींवर ठेवलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केली तर ते आरोपी गुन्हेगार ठरवले जातात.

फौजदारी खटल्यामद्धे आरोपींना तत्काळ किंवा काही कालावधी नंतर जामीन मिळतो, आणि आरोपी जामीनावर जेल बाहेर येतात. परंतु, कोर्टात प्रकरण सुरूच राहते आणि कोर्टाच्या प्रत्येक तारखेस आरोपींना कोर्टात हजर रहावेच लागते. तर मित्रांनो, फौजदारी खटल्यांमद्धे आरोपींना प्रत्येक तारखेस कोर्टात हजर राहणे बंधनकारक आहे. जर आरोपी एखाद्या तारखेस गैरहजर राहणार असतील तर त्यांनी आपल्या वकिलांना याबतची सूचना देणे आवश्यक असते, जेणेकरून वकील आरोपीच्या वतीने हजरी माफीचा अर्ज कोर्टसमोर ठेवतील.

जर, आरोपी सतत तारखेस गैरहजर राहत असेल तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आरोपींना जामीन मिळते तेंव्हा ती जामीन काही अटी-शर्तींवर देण्यात आलेली असते. कोर्टात प्रत्येक तारखेस हजर राहणे ही देखील त्यापैकी एक अट असते. जर आरोपी तारखेस गैरहजर राहत असेल तर नक्कीच जामीन रद्द देखील होऊ शकते.

दिवाणी दावे : दिवाणी दाव्यामध्ये प्रत्येक तारखेस कोर्टासमोर हजर राहणे आवश्यक नसते, कारण दिवाणी दाव्यामध्ये अनेक कामे तुमच्या तर्फे तुमचे वकील साहेब करत असतात. फक्त साक्ष देण्यासाठी तुम्हाला स्वतःला कोर्टात हजर राहावे लागते. दिवाणी दाव्यामध्ये देखील आपण कोर्टात उपस्थित राहून आपल्या दाव्यामध्ये काय चाललेले आहे ते पाहणे आवश्यक असते, परंतु त्यासाठी आपण वैयक्तिक रित्या हजर राहावे असा नियम नाही.

कोर्टामध्ये एखाद्या तारखेला वादीची उपस्थिती तर लगेच दावा काढून टाकला जात नाही. परंतु जर वादी कोणत्याच तारखेस कोर्टासमोर हजर राहत नसेल तर अश्या परिस्थितीत न्यायाधीश वादीचा दावा काढून टाकू शकतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *