नव्या संसदेचे नुकतंच उद्घाटन पार पडले. खरं तर नेहमी लोकसभेत व राज्यसभेत वाद होतात पण नवा संसद भवन सुरुवातीपासूनच वादात सापडला होत. नव्या संसद भवनाला घेऊन अनेक गोष्टी अनेक कॉन्ट्रोव्हर्सीज अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, याचबरोबर नवीन संसद भवनाची बरीच वैशिष्ट्ये सुद्धा आहेत त्यांचं कौतुकही केले जात आहे. तर आज या निमित्ताने समोर नव्या संसद भवन विषयी सगळं काही..
नवीन संसद भवन पहिल्यापासून वादात कसं सापडलं? तर नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते डिसेंबर 2020 मध्ये करण्यात आली. कोविड काळात नवीन संसद भवनाचा बांधकाम सुरू केलं म्हणून वाद असो किंवा अशोकस्तंभवरून वाद असो. दरम्यान, संसदेच्या या इमारतीबाबत विरोधकांनी सरकारवर अनेकदा निशाणा साधला.
यामध्ये नव्या इमारतीचे बजेट वादात सापडले. 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण देश कोविडशी लढत होता तेव्हा केंद्र सरकारने सेंट्रल विस्तार प्रकल्प 20 हजार कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केल्याच्या बातम्या आल्या. काही राजकीय पक्षांनी या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले.
केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय नगर विकास मंत्री समोर आले आणि म्हणाले लागतो 2026 पर्यंतच्या विकास प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यात संसद भवनासाठी 862 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय कोविड काळात अत्यावश्यक सेवा असा उल्लेख करत नवीन संसद भवनाचा बांधकाम सुरूच राहिलं.
यावरूनही सरकारवर टीका झाली. नंतर जुलै 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवनाच्या वर स्थापित केलेल्या राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण केलं त्यानंतर काही वेळातच सिंहांच्या हावभावावरून वाद निर्माण झाला. या राष्ट्रीय चिन्हाचा प्रतिमे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
तसेच या प्रकल्प बबन पंतप्रधानांचे निवासस्थान आणि केंद्रीय सचिवालय यांचा समावेश आहे. हे प्रोजेक्ट उभारण्यासाठी झाड तोडण्याचा मुद्द्यावरून पर्यावरण तज्ञांकडून केंद्र सरकारला सवाल करण्यात आला होता. मात्र केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड तोडण्याचा टाळून झाडे लावणार असल्याचे सांगितले. संसद भवन आतून काढलेली 404 झाडंही को-पार्कमध्ये लावण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
सेंट्रल संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते व्हावं अशी काँग्रेस सोबत इतर विरोधी पक्षांची मागणी होती. मात्र, राष्ट्रपतींना उद्घाटन समारंभ पासून दूर ठेवून केंद्र सरकारने अशोभनीय कृत्य केल्याचा आरोप केला गेला व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दूर ठेवून पंतप्रधान मोदींनी संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाही वर हल्ला असल्याचा आरोपही एका संयुक्त निवेदनात करण्यात आला.
जवळपास वीस विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, तर 25 राजकीय पक्षांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सरकारचा निमंत्रण स्वीकारले. आता याव्यतिरिक्त संसद भवन विषयीच्या गाजलेल्या गोष्टी कोणत्या होत्या त्या जाणून घेऊया..
सर्वप्रथम म्हणजे सेंगुल. नवीन संसद भवनात सभापतींच्या शासनाच्या शेजारी हा सेंगुल म्हणजेच राजदंड बसविण्यात आला आहे. भारताला पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्ट 1947 ला पंतप्रधान नेहरुंना सेंगुल देण्यात आला. सेंगुल हा शब्द तामिळ आहे. त्याचा अर्थ नीती प्रयनता असा आहे.
न्याय रक्षक म्हणून त्यावर हाताने कोरलेला नंदी बसवण्यात आला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंगुल धारण करणाऱ्या व्यक्तीला न्याय आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश देण्यात आला. लोकांचा सेवे साठी आपल्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे हे त्यांनी विसरू नये असे निर्देश असतात आणि दुसरा म्हणजे नव्या संसद भवनाच्या उभारणीत गाजलेलं नाव म्हणजे विमल पटेल.
विमल पटेल हे नवीन संसदेमधील आर्किटेक्ट आहेत. विमल पटेल गुजरात अहमदाबाद ते रहिवासी आहे, त्यांनी विश्वनाथ धाम, काशी विश्वनाथ मंदिर, गुजरात हाई कोर्ट बिल्डींग, IIM अहमदाबाद बिल्डिंग, साबरमती रिवरफ्रोंत डेवेलोपमेंत प्रोजेक्ट आणि पंडित दीनदयाळ पेट्रोलियम आणि आता हे नवं संसद भवन अशा अनेक मोठ्या इमारतींच्या डिझाइन केला आहे.
त्यांच्या असामान्य कार्यासाठी त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. संसद भवनाच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या एकूण 862 करोड इतकी आहे. नव्या संशोधनासाठी वापरला गेलेला सागवान लाकूड नागपुरातुन आणलेला आहे.
लाल पांढरे वाळूचे खडे राजस्थानातल्या सर्व इथून आणले गेले लाल किल्ला आणि हुमायूनच्या थडग्यावर हेच खडे वापरण्यात आले आहेत. पांढरा संगमरवर राजस्थानातल्या अंबा इथून आणल्या गेल्या. लोकसभा आणि राज्यसभेच्या चेंबरमध्ये फॉल्सिलींगसाठी सिलिंग स्ट्रक्चर दमन इथून खरेदी करण्यात आले. कार्पेट उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूर मधील आहे,
राजस्थानातल्या राजनगर आणि नोएडा इथून दगडी जाळीचे काम करण्यात आले. अशोकस्तंभसाठीचे साहित्य महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर आणि राजस्थानातल्या जयपूर येथून मागविण्यात आला होता आणि भिंतीवर अशोक चक्र मध्यप्रदेशातल्या इंदूरहून आणण्यात आले आहे. नवीन संसद भवन ही त्रिकोणी चार मजली इमारत असून संपूर्ण कॅम्पस 64,500 मीटर मध्ये बसलेला आहे. इथे ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार असे तीन मुख्य दरवाजे आहेत.
VIP खासदारसाठी विशेष प्रवेशद्वार आहे. शिवाय या इमारतीत एक कॉन्स्टिट्यूशन हॉल सुद्धा आहे. तसेच संसद भवनाची नवी इमारत विक्रमी वेळात उभारली गेल्याचे सांगण्यात येते. 10 डिसेंबर 2020 ला नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. तर 28 मे 2023 दिसला संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले.
असेही नवीन संसद बिल्डिंग 150 वर्षे व्यवस्थित टिकू शकते असेही बोलले जात आहे. यामध्ये 1272 सीट आहेत त्यापैकी 888 लोकसभेसाठी आणि 384 राज्यसभेसाठी राखीव नाही आणि महत्त्वाचं म्हणजे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या देशाच्या सुपर टाटा समुहाच्या कंपनीने संसद भवन बांधले आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार संसदेची जुनी इमारत पाडली जाणार नाही. या इमारतीची दुरुस्ती केली जाणार आहे, लोकसभा आयोगाकडून संसद भवन बाबत तयार करण्यात आलेल्या पुस्तीकानुसार नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर ही जुनी संसदेच्या इमारतीचा वापर सुरू राहील. तसेच दोन्ही माती एकमेकींना पूरक म्हणून काम करतील असेही सांगण्यात आले आहेत.