पेजर म्हणजे काय ? व पेजर स्फोट कसा होऊ शकतो?..

News

तुम्हाला पेजर माहिती आहे का? किंवा आठवतंय का? मोबाईल येण्यापूर्वी हे एक अत्यंत आवश्यक गॅजेट होत आणि आता अनेक ठिकाणाहून ते हद्दपार झाल्या आहे. मात्र, आता ते अचानक चर्चेत आले आहे. बातमी झालेले एकाच वेळी अनेक ठिकाणी पेजस स्फोट झाला आणि 2800 जण जखमी झालेत आणि 9 जणांचा बळी गेला. आपल्या अनेकांनी पेजर पाहिले सुद्धा नसतील. मग काय आहे पेजर? आणि पेजर स्फोट कसा होऊ शकतो? आणि मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पेजर का वापरत होते? चला तर समजून घेऊया..
ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा मोबाईल नव्हते आणि मोबाइल आले सुरुवातीच्या काळात भयंकर महाग होते तेव्हा पेजर हे संपर्काचे साधन होत. हे पेजर निरोप पोचवण्यासाठी आणि मेसेजिंगसाठी वापरले जायचे. साधारण 90 च्या दशकात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात ते वापरले जायचे. सिगरेटच्या बॉक्स पेक्षा थोडा लहान अशा आकाराचा हा पेजर अनेकांच्या कमरेला बॅक लावलेला असायचा. या पेजरला लहानशी स्क्रीन वरती मेसेज दिसायचा.
नुमारेक पेजरमध्ये फक्त फोन नंबर दिसायचा याचा अर्थ तुम्हाला या नंबरला फोन करायचा आहे. तसेच अल्पा नुमरेक पेजरवरती आकडे आणि मजकूर असं दोन्ही दिसायचं. प्रत्येक पेजरला एक नंबर असायचा आणि तुम्हाला ऑपरेटरला हा नंबर असणारे व्यक्तीसाठीचा निरोप देता येत असायचा.
रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करत हा निरोप पेजवर ट्रान्सलेट व्हायचा. मेसेज आल्यानंतर पेजर बीफ करायचा किंवा व्हायबेट व्हायचा. वनवे पेजरवर फक्त मेसेज यायचा. तर टु वे पेजरवरती मेसेजला उत्तरही देता यायचा.
तसेच पेजर कधी ट्रॅक करता येत नाही याच उत्तम उदाहरण म्हणजे इस्त्राईल लोकेशन ट्रेस करू शकत नाही म्हणून हिजबुल्ला संवाद साधण्यासाठी पेजर वापरते. पेजर हे एक वायरलेस दूरसंचार उपकरण आहे. याद्वारे व्हॉइस मेसेज आणि लिखित संदेशाद्वारे संवाद साधला जात असल्याचे सांगितले जाते. मोबाइल फोन या प्रकरणात धोकादायक आहे कारण ते ठिकाण उघड करते.
इस्रायलने 1996 मध्ये हमास या अतिरेकी संघटनेचा बॉम्ब निर्माता याह्या अय्याशला ठार मारले होते. त्यानंतर याह्याच्या हातातील मोबाईलचा स्फोट झाला. पण हिजबुल्लाहने एपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, हे पेजर नवीन ब्रँडचे आहेत आणि ते यापूर्वी वापरले गेले नव्हते. माजी सीआयए विश्लेषक एमिली हार्डिंग यांनी एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “पेजर्सचा स्फोट हिजबुल्लासाठी अतिशय लाजिरवाणा आहे. या स्तरावरील सुरक्षा भंगामुळे हिजबुल्लाच्या संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *