Parker Pen : गोष्ट अश्या शिक्षकाची ज्याने फक्त विद्यार्थीच नव्हे तर जग प्रसिद्ध पेन देखील घडविला.

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

शिक्षक ते असतात ज्यांच्यात कोणत्याही मुलाचे भविष्य बदलण्याची क्षमता असते. शिक्षकच आपल्या शिकवणीतून समाजात परिवर्तन घडवण्याचा पाया घालतात. असाच एक शिक्षक म्हणजे जॉर्ज सॅफर्ड पार्कर. १८८० च्या दशकात अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील जेनेसविले येथील टेलिग्राफी शाळेत तो शिकवत होता. शाळा सुटल्यानंतर मोकळ्या वेळात अमेरिकेतील तत्कालीन प्रसिद्ध पेन कंपनी ‘जॉन हॉलंड गोल्ड’चे फाउंटन पेन तो विकायचा.

या प्रवासातच पार्करच्या मनात एक गोष्ट आली आणि त्याने जगप्रसिद्ध पार्कर पेन बनवला. चला आजच्या या लेखात जाणून घेऊया जॉर्ज सॅफर्ड पार्कर यांची जगप्रसिद्ध पार्कर पेन बनवण्याची रंजक गोष्ट. हा लेख आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करून त्यांना देखील ही गोष्ट सांगा.

घडले असे की, जॉर्ज विकत असलेले पेन वारंवार लिक होत असे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे कपडे-हात नेहमी खराब व्हायचे. त्या पेनची शाई देखील लवकर संपत असे, आणि पेनची कॉलीटी देखील एवढी काही खास नव्हती.

या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जॉर्ज शेफर्ड पार्कर यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसह हा फाउंटन पेन दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आणि काही साधनांच्या मदतीने पेनमध्ये सुधारणाही केल्या. पार्करने जॉन हॉलंड गोल्ड कंपनीच्या पेन मधील शाई लिक होण्याची समस्या सोडवली, त्यामुळे शाई देखील जास्त काळ टिकत असे. त्यानंतर जॉर्ज पार्करने शाई गळतीच्या समस्येचे पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतले.

पेटंट घेतल्यानंतर पार्करने पेनचा व्यवसाय स्वतःच करण्याचा विचार केला, परंतु त्यांना पैसे गमावण्याची भीती होती. पण म्हणतात ना, ‘नशिबात जे आहे तेच घडतं’. पार्करने आपल्या भीतीवर मात करत या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आणि लकी कर्व्ह फीड नावाचा एक फॉर्म्युला तयार केला, ज्यामुळे पेनमधून उरलेली शाई सहज काढता येईल. ही टेक्निक देखील पार्करने पेटंट केली आणि 1888 मध्ये पार्कर पेन कंपनी उघडली.

जॉर्ज पार्कर यांनी पेन कंपनी तर सुरू केली, पण ते व्यवसायाने शिक्षक होते, त्यामुळे त्यांना मार्केटिंगचा फारसा अनुभव नव्हता. त्यावेळी त्यांना स्वतःची पेन कंपनी चालवणे खूप अवघड गेले. तो काळ होता जेव्हा जॉन हॉलंड, विल्यम पेन आणि एच.बी. स्मिथ पेन सारख्या मोठ्या आणि नामांकित पेन कंपन्यांनी बाजारात आपले पाय रोवले होते. अशा परिस्थितीत पार्करला आपला हा नवीन पेन विकायचा होता.

त्या काळात W. F. पामर यांनी पार्करला 1000$ इतकी मदत केली. या मदतीच्या जोरावर पार्कर पुढील काही काळ स्पर्धेत टिकून राहू शकत होते. पुढे पामर यांनी पार्कर कंपनीचे 50% शेअर्स विकत घेतले. पार्कर आणि पामर कंपनीला 1898 पर्यंत बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. त्‍यामुळे 1899 मध्‍ये जॉइंटलेस मॉडेल लाँच झाले आणि विस्‍कॉन्सिनमधील जेनेस्‍विल्‍लेमध्‍ये साऊथ मेन स्‍ट्रीटमध्‍ये त्‍यांची कार्यालये उघडली तोपर्यंत जगभरात 100 हून अधिक वितरक होते. 1908 पर्यंत, त्यांचा पेन कारखाना हा जगातील सर्वात मोठा पेन कारखाना होता आणि तो जगातील सर्वात मोठ्या पेन ब्रँडपैकी एक बनला.

1937 मध्ये कंपनीचे संस्थापक जॉर्ज पार्कर यांच्या निधनानंतर मॅनेजमेंट टिमने कंपनीला सांभाळले. दिल्लीच्या लक्सर ग्रुपसोबत पार्टनरशीप करून गेल्या काही दशकांपासून भारतात पार्कर पेन्सची निर्मिती केली जात आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पार्करचा समावेश आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *