रामदेव बाबा आणि त्यांचे पतंजलीला सगळेच ओळखतात. पहाटे टीव्हीवर योगासन शिकवत रामदेव बाबा आपल्या घरात शिरले आणि मग हळूहळू दातामधील कीड संपवण्याऱ्या दंतकांतीपासून ते नुडल्सपर्यंत तसेच जीन्स पर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्या दारात विकायला आणली. आता नुकताच पतंजलीने 14 नवीन प्रोडक्ट लॉंच केलं आहेत.
पण तुम्हाला माहीत आहे का की, पतंजली म्हंटल की, रामदेव बाबा आठवतात पतंजली कंपनीचे खरे मालक रामदेव बाबा नसून पतंजलीचा सगळा डोलारा सांभाळता कंपनीत 98 टक्के स्टेक असणारे रामदेव बाबांचे मित्र आचार्य बाळकृष्ण होय.
20 वर्षांपूर्वी योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अब्जाधीश बनवता येतो असं कुणी म्हटलं असतं तर ते अशक्य वाटत असतं.
पण आज पतंजलीचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांचे संपत्ती पाहून हे शक्य आहे असं वाटतं. अब्जाधीशांच्या यादीनुसार आचार्य बाळकृष्ण यांची एकूण संपत्ती अंदाजे 3.6 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 29 हजार 587 कोटी रुपये आणि जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा 810 वा क्रमांक आहे. आचार्य बाळकृष्ण हे सुद्धा बालब्रह्मचारी आहे, खरं नाव बाळकृष्ण सुवेदी होय.
जन्मभूमी नेपाळ होय. पण वडील उत्तराखंडमध्ये एक आश्रमाचे नोकरीमध्ये होते. मात्र, नोकरीत मन रमले नाही म्हणून ते परत नेपाल निघून गेले. साधारण चौदा-पंधरा वर्षांचा असताना बाळकृष्ण यांना चांगला स्वयंपाकी आहे म्हणून कोणीतरी हरियाणाच्या कालबा गुरुकुल इथे आणलं. तिथे आपल रामदेव बाबा शिकायला होते.
असे म्हणतात की रामदेव बाबांची आणि त्यांची मैत्री तिथूनच सुरू झाली आहे. कोणी कोणी म्हणतं की, बाबा रामदेव हिमालयात गंगोत्री नदीच्या मुखापाशी गुहेत ध्यानधारणा करत असलेला बाळकृष्ण त्याना दिसला. तसेच त्यांचे भक्त असही म्हणतात की, जगात बाळकृष्ण हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना संजीवनी जडीबुटीचे ज्ञान आहेत आणि ते ओळखूनच रामदेव बाबांनी त्यांना आश्रमात आणलं होतं. बाळकृष्ण कालबा आश्रमात आले आणि रामदेव यांच्याबरोबर त्यांची मैत्री सुरू झाली.
आचार्य बाळकृष्ण यांना जडीबुटी यामध्ये विशेष रस होता तर रामदेव बाबांना योगसाधनेमध्ये. दोघे मित्र कायम एकत्र असायचं. काही वर्षांनी प्रथम बाळकृष्ण यांनी आश्रम सोडला आणि ते हरिद्वारला निघून गेले. त्यांनी तिथे भेट गुरु शंकर देव यांच्याबरोबर झाली. आश्रमात योग शिकवायचे. सोबत बाळकृष्ण देखील शंकर देव यांच्या आश्रमात येऊन शिकू लागले.
मग काही दिवसांनी त्यांनी रामदेव बाबांचा मागेही लकडा लावला की, हरिद्वारला या. रामदेव बाबा तयार झाले. बाळकृष्ण यांच्यापाठोपाठ तेही शंकर देव आश्रमात दाखल झाले. शंकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी दिव्य योग ट्रस्त स्थापना केली. पुढे काही वर्षांनी शंकर देव यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पण इकडे रामदेव बाबा आणि बाळकृष्ण ही जोड दिवसेंदिवस प्रगतीच शिखर पार करतच आली होती.
रामदेव बाबा यांचा संवाद कौशल्य व त्यांची योगसाधना पाहून आस्था टीव्हीने त्यांना आपल्या वर सकाळी आपल्या चॅनलवर योग शिकवण्यास बोलवलं. हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्यातून रामदेव बाबा यांची पब्लिसिटी वाढू लागली. सकाळी प्रवचन कम योगासन आणि तेही सोप्या पद्धतीने याचा लोकांवर प्रचंड मोठा परिणाम झाला.
रामदेव बाबा यांनी ठिकाणी योग शिकण्यासाठी बोलवण्यात येऊ लागलं. अमिताभ बच्चन पासून शिल्पा शेट्टीपर्यंत अनेकजण त्याचे फॅन झाले. तसेच अनेक जण रामदेव यांचा गर्दी जमवण्यासाठी फायदा घेऊ लागेल. तसेच भारतातच नाही तर परदेशातही रामदेव बाबांची योगा शिबिर हिट झाली. हे सगळं चाललं होतं तेव्हा बाळकृष्ण यांनी श्रवण पोद्दार या अनिवासी भारतीयांची मदत घेऊन पतंजलीची स्थापना केली.
मग पोस्टर बॉय रामदेव बाबा होते. हळूहळू स्वदेशी, गुणकारक आणि आयुर्वेदिक औषध यापासून सुरू झालेला हा व्यवसाय वाढतच गेला. रामदेव बाबाच्या या प्रसिद्धीचा या कंपनीलाही फायदा झाला. आज या महाप्रचंड कंपनीचा डोलारा रामदेव बाबा यांचा चेहरा आणि बाळकृष्ण यांचे डोके यामुळे उभा राहिलेला आहे.
लोकांकडून पैसे घेऊन सुरू झालेल्या या उद्योगाने 2012 खाली 450 कोटी ते 2016 सालापर्यंत 10 हजार कोटींचा टर्नओव्हर नोंदवला होता. पतंजली फूड पार्कपासून ते योगसाधना अशा अनेक गोष्टींनी सुसज्ज असलेले हरिद्वार येथे पतंजली आश्रम म्हणजे भारतातलं आधुनिक आश्चर्य आहे.
याहूनही सगळ्यात मोठा आश्चर्य म्हणजे हे साम्राज्य सांभाळणारे रामदेव बाबा आणि बाळ कृष्णा हे दोघेही रूढ अर्थाने फार शिकलेली नाही. बाळकृष्ण हे कंपनीचे सीईओ सुद्धा आहेत. हे पतंजली उद्योग समूहाचे 98 टक्के शेअर्स बाळकृष्ण यांच्या ताब्यात आहेत. भारतातल्या सर्वात श्रीमंत 10 व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.
काही वर्षात पतंजली ही वादांच्या भोवऱ्यात अडकली. कंपनी उभारताना गैरव्यवहार केलेला असण्याची शक्यता, पुत्र प्राप्ति औषध अशा अनेक गोष्टी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण त्यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले. पण तरीही आजही ही कंपनी तग धरून टिकून राहिलेली आहे, हेच खरं, बाकी तुम्हाला स्टोरी कशी वाटली कमेंट करुन सांगा..