पुष्पा नावाचा साऊथ सिनेमाची अल्लू अर्जुनच्या नेहमीप्रमाणे दमदार अभिनय आणि ऍक्शनमुळे सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या भूमिका असलेलाल ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट लाल चंदन तस्करीवर आधारीत आहे. एक साधा मजूर ते माफिया डॉन असा त्याचा प्रवास सिनेमात दाखवला आहे. भारतात विशेष ठिकाणी आढळणाऱ्या लाल चंदनाच्या लाकडाला खूप महत्त्व आहे.
थोडक्यात काय तर सगळं पब्लिक पुष्प पिक्चरच्या नादात अल्लू अर्जुन उर्फ पुष्पा भाऊने केलेला धुरळा आणि काळीज बाद करून टाकणारी रश्मिका आणि तीन मिनिटात खुळ करणारी समता एवढे मटेरिअल घेऊन मार्केटमध्ये आलेल्या पुष्पा हिट झाला आणि गिरणीत काम करणारा पुष्पा सगळ्या सिंडिकेटचा बाप बनला तो फक्त रक्तचंदनाचा जीवावर.
हजार रुपये रोजंदारीवर रक्तचंदन तोडायला जाणारा पुष्पा तेच रक्तचंदन विकून लॉर्ड बनतो. आता डोकं ठेवून पिक्चर पाहिला असला चंदनाच्या जीवावर सूत्र हलतात हे मात्र खरे आहे. त्यामुळे अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की, रक्तचंदन इतकं महाग कसं आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो आणि चंदन, रक्तचंदन यात काय फरक असतो? त्यांची उत्तरे जाणून घेऊया.
जस आपलं नॉर्मल चंदनाचं झाड असते तर रक्त चंदनाचे झाड असते. मात्र या झाडाची जात वेगळी असते. चंदनाच्या झाडाला जसा सुगंध असतो तर रक्त चंदनाच्या झाडाला नसतो. रक्त चंदनाचे झाड जवळपास 8-10 मीटरपर्यंत वाढते, त्याची वाढ निवांत होत। एकदम सरळसोट वाढणाऱ्या झाडाला पिवळी लहान फुले देखील येतात.
चंदनाचा वापर साबण, परफ्यूम, गंध इतकच काय तर माणूस गेल्यावर त्याला जाळण्यासाठी केला जातो. मात्र, रक्तचंदनाचा वापर मात्र किरकोळ गोष्टींसाठी होत नाही. महागडा फर्निचर, उंची मद्य बनण्यासाठी रक्तचंदन वापरतात. आपल्यापैकी कितीजनांच्या घरात उपचारांसाठी रक्तचंदनाची बाहुली सुद्धा वापरली जाते.
रक्तचंदनाचे बाहुली जखमा आजारांवर रक्तचंदनाचा लेप फार रामबाण उपाय असतो. पुष्पा पिक्चर मध्ये दाखवले तसे जपानी लोकांमध्ये गाण्यासाठी वापरली जाणारी वाद्य देखील रक्तचंदनपासून बनवली जातात. तसेच हा फरक ओळखण्यासाठी आणखी एक असते. रक्तचंदनाच्या झाडाला घनता जास्त असते, त्यामुळे लाकूड लवकर पाण्यात बुडत.
त्यामुळे रक्त चंदनाचे झाड दिसणे कठीण आहे. आता तुमच्या बुद्धीला समजला असेल त्यामुळे रक्त चंदनाचे झाड एवढी महाग असत. दुनियेत काही भागांमध्ये सापडत. भारत देशामध्ये आंध्र प्रदेशच्या शेषाचलम पर्वतरांगांमध्ये आढळणारे लाल चंदन आढळून येते.
रक्त चंदनाचे झाड दुर्मिळ असल्याने वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली आहे आणि तरी कुणी तसा प्रयत्न केला तर पोलीसची कारवाई केली जाते. भारतसोबत, श्रीलंका आणि फिलिपिन्समध्ये काही भागात रक्त चंदनाचे झाड आढळून येतात. रक्तचंदनाला भारतात दिल्ली आणि गुजरात, हिमाचलमधून जोरदार मागणी असते.
तसेचपर्यंत जपान, चीन, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही डिमांडमध्ये आहे. इतर ठिकाणीसोबतच रक्तचंदन इंपोर्ट करण्यामध्येही चीन टॉपला आहे. मध्यंतरी माध्यमांमध्ये एक बातमी आली होती की, आपल्या रत्नागिरी एक झाडाचे वय आहे दीडशे वर्ष आणि किंमत जवळपास दीडशे कोटी अर्थात हे झाड होतं रक्तचंदनाचे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात साखोली नावाचं गावमधील देवरायांमध्ये सापडलेल्या झाडावर स्थानिक लोक आणि प्रशासन कित्येक दिवस लक्ष ठेवून होतं. मात्र, सत्य परिस्थिती बघता पिक्चरमध्ये रक्त चंदन गायब करणारा पुष्पा हिरो दाखवला आहे. प्रत्यक्षात मात्र रक्तचंदनाची बेमालूम वृक्षतोड करणे चुकीचा आहे.
आधीच दुर्मिळ असलेली ही झाडे पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर कमी झाली तर हवामानापासून प्राण्यांच्या जीवनापर्यंत अनेक गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे फक्त रक्तचंदनाची नाही तर कुठलाही झाड तोडू नका कारण आपल्या कित्येक पिढ्यांना सावली देणारे झाड निसर्गसाठी अत्यंत आवश्यक आहेत.