आज आपण पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजेच कुलमुखत्यार पत्र या विषयी आपण माहिती घेणार आहोत. कुलमुखत्यार पत्र हे आपण अनेकदा ऐकतो. पण याच्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. कुलमुखत्यार पत्र म्हणजे एक असा दस्त की ज्याच्याद्वारे एक व्यक्ती आपले कायदेशीर अधिकार दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करत असतो. हे आपले कायदेशीर अधिकार दुसऱ्या माणसाला हस्तांतरित करणे म्हणजे कायद्याच्या भाषेत याला म्हणतात, पॉवर डेलिगेट करणे. आजच्या या कायदे विषयक लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर करा.
एक माणूस आपले कायदेशीर अधिकार दुसऱ्या माणसाला डेलिगेट करतो, आणि ज्या दस्तान्वये हे अधिकार हस्तांतरित करतो त्या दस्ताला पावर ऑफ अटॉर्नी म्हणतात. आता एखाद्या व्यक्तीने आपले अधिकार दुसर्या एखाद्या व्यक्तिला का बरं हस्तांतरित करावे? यामागे काय कारण असावे? असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील! बरेचदा काय होतं की जे मोठे बिझनेस मॅन आहे, किंवा मोठे व्यापारी आहेत, किंवा कोणी पॉलिटिशन आहेत, किंवा अजून कोणी आहे, म्हातारे लोक आहेत, किंवा विदेशात राहणारी माणसं आहेत, त्यांना एखाद्या ठिकाणी काही व्यवहार करायचे असतात. जसे की शासकीय ऑफिसला जाऊन काही काम असेल, जस की सही करावी लागणार आहे, काही व्यवहार करावा लागणार आहे, पण त्याला प्रत्यक्ष जाऊन तिथे उभा राहणे वेळेवर जमत नाही.
मग काय केलं जात तर, ते व्यक्ती स्वतः प्रत्यक्ष तिथं जावू शकत नसेल तर त्या शासकीय ऑफिसमध्ये कार्यरत सही करण्याचा जो त्या व्यक्तीचा अधिकार आहे. हा अधिकार तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तिला डेलिगेट करतो, दुसऱ्याला ते अधिकार हस्तांतरित करतो. तर ज्याच्या नावे पॉवर ऑफ अटॉर्नी आपण देतो त्याला म्हणतात पावर ऑफ अटॉर्नी होल्डर. आता मराठीत याला म्हणतात कुलमुखत्यार धारक. तर ही झाली पॉवर ऑफ अटॉर्नी माहिती.
या पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये एक खूप मोठा दोष आहे. किंवा काही व्यक्तींसाठी हा दोष एक महत्वाचे वैशिष्ट्य ठरते. समजा जर एका व्यक्तीने घोषित केलं की हा माझा पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. आणि त्या व्यक्तीच्या वतीने असलेले सर्व व्यवहार किंवा सही आणि इतर कामकाज हा दूसरा व्यक्ती पाहिल. आणि म्हणून पहिल्या व्यक्तीने पॉवर ऑफ अटॉर्नी त्या दुसर्या व्यक्तीच्या नावे लिहिली. आणि समजा पॉवर ऑफ अटॉर्नी लिहिणाऱ्या व्यक्तीचा काही कारणाने मृत्यू झाला. जसा मृत्यू होतो तेव्हा ज्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणून काही अधिकार मिळतात. किंवा त्याकडे जे अधिकार हस्तांतरित झालेले असतात ते सर्व अधिकार ऑटोमॅटिकली संपुष्टात येतात. त्याला कोणताही अधिकार राहत नाही. तर हे आहे मुख्य वैशिष्ट्य! पॉवर ऑफ अटॉर्नी करणारे जेव्हा मृत्यू होतात. तेव्हा त्या क्षणाला पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर कुठेही राहो तिथे त्याचा ऑटोमॅटिकली सही करण्याचा, किंवा कुठलेही कामकाज करण्याचा हक्क संपुष्टात येतो.
पण या पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये अजून एक प्रकार आहे, त्याला म्हणतात कधीच रद्द न होणारे पॉवर ऑफ अटॉर्नी. हे अशा कामांमध्ये दिल्या जातात, ज्या कामांमध्ये देणारा व्यक्ती वारला तरी पुढील काम थांबू नये असे जेव्हा आपल्याला वाटतं त्या केस मध्ये आपण हा पॉवर ऑफ अटॉर्नी देतो. पण या पॉवर ऑफ अटोनीला वर हेडिंग मध्ये टाकावं लागतं, “कधीच रद्द न होणारे पॉवर ऑफ अटॉर्नी.” त्याची हेडिंगच असते आणि सुरुवात करताना तशी सुरवात करावी लागते. बहुतांशी याची हेडिंग पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा कुलमुखत्यार पत्र असेच असते. पण कधीच रद्द नहोणार द्यायचा असेल तर वर हेडिंगच टाकावे लागते की कधीच रद्द न होणार पॉवर ऑफ अटॉर्नी!
नॉर्मली हा पॉवर ऑफ अटॉर्नी तेव्हा दिला जातो, की एखादा व्यवहार आपण करतो आणि तो व्यवहार “इन द एक्सचेंज ऑफ कन्सिडरेशन” म्हणजेच पैशाच्या किंवा आर्थिक मोबदल्यात आपण जर व्यवहार करतो. बघा पहिल्या पॉवर ऑफ अटोनी मध्ये आर्थिक बदल्यात व्यवहार करत नव्हतो किंवा आर्थिक मोबदल्यात पॉवर ऑफ अटॉर्नी देत नव्हतो. पण हा दुसरा जो प्रकार आहे इथे मात्र आपण पॉवर ऑफ अटॉर्नी आर्थिक मोबदल्यात देत असतो. त्या केस मध्ये मात्र पॉवर ऑफ अटॉर्नी वारला तरी पॉवर ऑफ अटोनी होल्डरचे जे राइट्स आले आहेत, त्याला जे राईट डेलिगेट झाले आहेत, ते राईट संपुष्टात येत नाही. तर हा आहे दुसऱ्या प्रकारचा पॉवर ऑफ अटोनी. आणि हे ह्याचे वैशिष्टये आहे.
म्हणजे साध्या पॉवर ऑफ अटॉर्नी वैशिष्ट्य असं आहे की, जेव्हा देणारा वारतो तेव्हा ते संपुष्टात येत. त्यास काहीही लीगल व्हॅल्यू राहत नाही. पण कधीच रद्द न होणारे पॉवर ऑफ अटॉर्नी जे पैशाच्या मोबदल्यात किंवा कुठल्यातरी कन्सिडरेशनच्या बदल्यात दिली जाते. त्या केस मध्ये मात्र पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला या दस्ताअन्वये जे काही हक्क मिळाले ते कधीही संपुष्टात येत नाही. हा दोन पॉवर ऑफ अटॉर्नी मधला मूलभूत फरक आहे. तर ही होती पॉवर ऑफ अटॉर्नी ऑफ म्हणजेच कुलमुखत्यार पत्राबद्दलची माहित. ही नक्कीच तुम्हाला उपयुक्त असेल.