जेंव्हा एखादी क्रुज शिप रिटायर होते तेंव्हा तिचे काय केले जाते? जाणून घ्या ही रंजक माहिती.

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

जगातील शेकडो क्रूझ जहाजे दररोज एका देशातून दुसऱ्या देशात जातात. एकाच वेळी हजारो प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असलेली ही मोठी जहाजे आहेत. पण, अशी वेळ येते जेव्हा ही क्रूझ जहाजे निवृत्त होतात. पण मित्रांनो, क्रूझ जहाज निवृत्त झाल्यावर त्याचे काय होते हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर या विशेष लेखात आम्ही तुम्हाला या विषयाची माहिती देणार आहोत.

सामान्यतः क्रूझ जहाज हे सुमारे 30 ते 40 वर्षांच्या सेवेसाठी बांधले जाते, त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ते निवृत्त केले जाते. कारण समुद्रात इतके वर्ष प्रवास केल्यानंतर त्यामध्ये झीज होणे स्वाभाविक आहे, यामुळे ते प्रवाशांसाठी काही प्रमाणात धोकादायक ठरतात. त्यामध्ये कितीही दूरस्ती केली तरी 30-40 वर्ष जुने क्रूझ पुढे लांबच्या प्रवासासाठी सुरक्षित मानले जाऊ शकत नाही.

अश्या रिटायर झालेल्या क्रूझ शिपला मोठ्या शिपिंग कंपन्या इतर लहान कंपन्यांना विकतात. छोट्या जहाज कंपन्या अश्या क्रूझचे आवश्यक दुरुस्ती आणि री-ब्रँडिंग करतात. अश्या प्रकारे जुने क्रूझ जवळच्या प्रवसांसाठी वापरले जाते. काही देशांमध्ये तर असे जुने झालेले क्रूझ समुद्रातील महागडे फाइव्ह स्टार हॉटेल म्हणून आपली सेवा देतात. दीर्घ सेवेनंतर, एलिझाबेथ 2 हे क्रूझ जहाज दुबईमध्ये फ्लोटिंग हॉटेल म्हणून चालवले जात आहे.

जुनी जहाजे खरेदी करण्यासाठी फारशी मागणी नसताना ती भंगारात विकली जातात. ही जहाजे शिप ब्रेकिंग यार्डमध्ये भंगारासाठी पाठवली जातात. क्रूझ जहाजे नष्ट करण्याचे बहुतेक शिपयार्ड तुर्की, भारत आणि पाकिस्तानमध्ये आहेत. त्यापैकी भारतातील ‘अलंग’ हा सर्वात मोठा शिप ब्रेकिंग यार्ड मानला जातो. त्याची किनारपट्टी सुमारे 10 मैलांपर्यंत पसरलेली आहे.

जहाज नष्ट करण्यासाठी पाठवण्यापूर्वी कंपनी जहाजातून विक्रीयोग्य वस्तू काढून घेते आणि नंतर त्या वस्तूंची विक्री केली जाते. यामध्ये टॉयलेटपासून ते झुंबर आणि खुर्च्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. त्याच वेळी, जहाज पूर्णपणे नष्ट होण्यापूर्वी त्यात असलेले वि’षा’री पदार्थ देखील योग्य त्या प्रकारे नष्ट केले जातात. तर काही दुर्घटना ग्रस्त जहाज असेच कुठेतरी सोडून दिले जातात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *