पत्नीचा तिच्या पतीच्या प्रॉपर्टीवर अधिकार असतो का? जाणून घ्या कायदेशीर माहिती, समजेल अश्या भाषेत.

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

जन-सामान्यांमद्धे एक धारणा प्रचलित आहे ती म्हणजे पत्नीचा तिच्या पतीच्या 50% प्रॉपर्टीवर अधिकार असतो. गावा-खेड्यामद्धे किंवा शहरांमध्ये राहणार्‍या मंडळींचा देखील गोष्टीवर विश्वास असतो. परंतु, कायदेशीर तरतुदी काय सांगतात? एखाद्या पत्नीचा तिच्या पतीच्या 50% प्रॉपर्टीवर किंवा सरसकट सगळ्याच प्रॉपर्टीवर अधिकार असतो का? हे आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.

मंडळी, या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देता येईल इतके सहज आणि सोपे उत्तर हे नक्कीच नाही. परंतु, एक गोष्ट मात्र एका वाक्यात सांगता येईल ती म्हणजे लोकांची जी 50% प्रॉपर्टीवर अधिकार असतो ही धारणा आहे, यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. परंतु याचा अर्थ असा देखील होत नाही की पत्नीचा तिच्या पतीच्या प्रॉपर्टीवर अधिकारच नाही.

पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर हक्क निर्माण होतो किंवा नाही, तो किती असतो या सर्व गोष्टी परिस्थिती नुसार बदलत असतात. त्यामुळे पत्नीचा तिच्या पतीच्या प्रॉपर्टीवर अधिकार असतो का? या प्रश्नाचे उत्तर सरसकट सर्वच परिस्थितीसाठी एकच असेल असे नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या परिस्थितीनुसार उत्तर काय असेल हे समजून घेऊ.

परिस्थिती 1) जर समजा पतीच्या नावावर एखादी स्वकष्टार्जित किंवा वडीलोपार्जित प्रॉपर्टी असेल, आणि पतीचा मृत्यू झालेला असेल तर अश्या परिस्थिती मध्ये पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर किंवा पतीच्या हिस्स्यात येणार्‍या प्रॉपर्टीवर नक्कीच अधिकार असतो. पत्नीसोबतच, मुला-मुलींचा देखील त्या प्रॉपर्टीवर अधिकार असतो.

परिस्थिती 2) जर समजा पती-पत्नी यांचा घटस्फोट झालेला असेल, किंवा होणार असेल तर अश्या परिस्थितीमध्ये पती पत्नीला कोर्टाच्या आदेशाद्वारे दर महिन्याला एक ठरावीक रक्कम देतो, याला मेंटेनन्स असे म्हणतात. मराठी मध्ये याला पोटगी असे म्हणतात. पती-पत्नी हे जर वेगळे राहत असतील तर त्या परिस्थितीमध्ये पत्नी पतीच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगू शकत नाही, मात्र पतीच्या नावावर असलेल्या प्रोपार्टीचा आधार घेत पोटगीची रक्कम वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

परिस्थिती 3) जर समजा पती-पत्नीमद्धे कोणताहा वाद नसेल, त्यांचा संसार सुरळीत सुरू असेल तर पत्नीचा तिच्या पतीच्या प्रॉपर्टीवर अधिकार असतो का? या प्रश्नाला काही अर्थच राहत नाही. पती-पत्नी एकमताने एखादा निर्णय घेऊ शकतात.

परिस्थिती 4) समजा, पत्नीने जर एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकत घेतली. प्रॉपर्टी घेण्याकरता संपूर्ण पैसे स्वतः जवळचे वापरले, मात्र त्या संपत्तीचे मुख्य नाव हे आपल्या पतीच्या नावाने केले असेल, म्हणजेच त्या पत्नीने ती प्रॉपर्टी आपल्या पतीच्या नावे विकत घेतली. अशा कंडिशन मध्ये त्या संपत्तीवरती पूर्ण अधिकार हा पतीचा होतो. पुढे पती-पत्नीमद्धे वाद झाले तर कोर्टात दावा दाखल करून पत्नीला हे सिद्ध करावे लागेल की प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठीचे पैसे तिने स्वत: दिलेले आहेत, प्रॉपर्टी खरेदी करतेवेळी पती-पत्नी एकत्र राहत असल्यामुळे प्रॉपर्टी पतीच्या नावे खरेदी केली होती. कोर्टात पुराव्यानिशी हे सिद्ध केल्यानंतर पत्नीला ती प्रॉपर्टी परत मिळू शकते.

परिस्थिती 5) समजा, एखाद्या पतीने एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकत घेतली व संपत्ती घेताना सर्व पैसे हे पतीने दिले, मात्र प्रॉपर्टीला नाव पत्नीचे लावले. तर ही प्रॉपर्टी कुणाची? तर मित्रांनो त्या प्रॉपर्टी वरती संपूर्ण अधिकार हा पत्नीचा होतो. येथे देखील पतीला कोर्टात दावा दाखल करून प्रॉपर्टी परत मिळवता येते.

परिस्थिती 6)  समजा एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती पती व पत्नी या दोघांनी मिळून घेतली. ती प्रॉपर्टी घेताना पैसे सुद्धा दोघांनी लावले व त्या प्रॉपर्टी चे नाव सुद्धा दोघांच्या नावे आहे, म्हणजेच ती संपत्ती दोघांच्या नावावर आहे म्हणजे त्या प्रॉपर्टीला जे नाव आहे ते दोघांचे नाव आहे.

तर अशा वेळेस त्या प्रॉपर्टी वरती कुणाचा अधिकार असेल तर मित्रांनो अशा वेळेस त्या प्रॉपर्टीवर ती पती-पत्नी दोघांचाही अधिकार हा सारखाच असतो. मग अशा वेळेस त्या प्रॉपर्टीचे विभाजन कशा पद्धतीने केले जाते? अशी प्रॉपर्टी विकून जो काही पैसा येतो त्या पैशाचे सारखे दोन भाग केले जाते व आपला -आपला हिस्सा प्रत्येकाला दिला जातो. तर अशा प्रकारे पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टी वर कशा प्रकारे अधिकार असतो याबद्दलची ही थोडक्यात माहिती होती.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “पत्नीचा तिच्या पतीच्या प्रॉपर्टीवर अधिकार असतो का? जाणून घ्या कायदेशीर माहिती, समजेल अश्या भाषेत.

  1. If a husband purchase property in name of wife ,if it’s not for benefit of wife ,then it will be treated as benami and is prohibited under benami act .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *