रस्त्यांवरील गतिरोधकांची जागा, ऊंची कोण ठरवते? जाणून घ्या सविस्तर.

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

एखाद्या गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करताना अचानक समोर गतिरोधक येतो आणि गाडीमध्ये बसलेल्या प्रवाश्यांना हवेत उडण्याचा अनुभव मिळतो. शहरात देखील मोठ-मोठे गतिरोधक बांधलेले असतात ज्यावर चार-चाकी गाड्यांना तारेवरची कसरत करावी लागते. असे हे गतिरोधक पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनात अनेक प्रश्न येतात. आजच्या या लेखात अश्याच काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ.

कोणत्या रस्त्यावर, कोणत्या जागेवर, कश्या प्रकारचा गतिरोधक बांधवा हे कोण ठरते? गुत्तेदार स्वतःच्या मनाने कुठेही गतिरोधक बनवू शकतो का? तर नाही. कोणत्याही रस्त्यावर गतिरोधक बांधण्यासाठी काही नियम असतात, त्यांचे पालन करूनच हे गतिरोधक बांधता येतात.

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बनवण्याचे काम हे NHAI यांच्या मार्गदर्शनाखाली होते. राज्य महामार्गावर गतिरोधक बांधण्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली होते. तर, शरतील रस्त्यांवर नगरपालिका/महापालिका यांच्या मार्गदर्शनाखाली गतिरोधक बांधण्यात येतात. गुत्तेदार स्वतःच्या मर्जीणे किंवा इतरांच्या सूचनेप्रमाणे गतिरोधक बनवू शकत नाही.

आपण बर्‍याच ठिकाणी मोठ-मोठे गतिरोधक पाहतो, ज्यावरून एखादी चार-चाकी गाडी जाताना खालून घासते. अश्या प्रकारचे गतिरोधक अपघात टाळण्यासाठी बनवले गेले आहेत की अपघात वाढवण्यासाठी हेच समजत नाही. अश्या प्रकारचे गतिरोधक हे नियमबाह्य आहेत. गतिरोधक बनवतेवेळी इंडियन रोड कॉंग्रेस (IRC) यांच्याद्वारे बनवले गेलेल्या मानकांचा वापर करणे हे बंधनकारक असते, परंतु असे होताना दिसून येत नाही.

IRC मानकांनुसार शहरअंतर्गत बनविण्यात येणार्‍या रस्त्यांवर 3 मीटर रुंद तर 10 सेंटीमीटर उंच गतिरोधक बनवणे आवश्यक असते. राज्य महामार्गावरील बनवण्यात येणार्‍या गतिरोधकांसाठी देखील हाच आकार निश्चित करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग हे चार पदरी असतात, त्यावर वाहतूक जास्त गतीने होत असते त्यामुळे या ठिकाणी रंब्लर बसवणे आवश्यक असते.

शहरात बसवण्यात येणारे गतिरोधक हे मागणी नुसार बसवण्यात येतात. रहदारीचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे आवश्यक असते. तसेच, शाळा, महाविद्यालय, दवाखाना, वळण रस्ता याठिकाणी मागणी नुसार गतिरोधक बसवण्यात येतात.

इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमानुसार राज्य महामार्गावर वर्दळीचा विचार करून गतिरोधक बसवण्यासाठी बांधकाम विभागाची यंत्रणा कार्यरत असते. राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका, वळण रस्ता, बायपास अश्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात येतात.

या व्यतिरिक्त इतरही नियम आहेत जे गतिरोधकांच्या बाबतीत लागू होतात. जसे की, गतिरोधकाच्या किमान 50 मीटर पूर्वी रोडच्या कडेला ‘पुढे गतिरोधक आहे’ अशी पाटी बसवणे आवश्यक असते. तसेच, दुरून गतिरोधक ओळखता यावे यासाठी गतिरोधकावर पांढर्‍या किंवा पिवळ्या रंगाच्या पट्ट्या बनवणे आवश्यक असते. तसेच, रात्रीच्या वेळी गतिरोधक ओळखता यावे यासाठी त्यावर रिफ्लेक्टर बसवणे देखील नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु, या नियमांचे पालन केले जात आहे का हा मात्र चर्चेचा विषय आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *