स्टारलिंक आणि वन वेब प्रोजेक्ट काय आहेत? इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवू पाहणार्‍या या दोन प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती.

Infomative News Technology

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि फायदेशीर माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर फायदेशीर माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

तंत्रज्ञानावर आधारित जग वेगवान इंटरनेटचे सर्व मार्ग शोधत आहे. भारतासारखे अनेक देश 5G आणि 6G इंटरनेटकडे वाटचाल करत आहेत. दुसरीकडे आता सॅटेलाइट बेस्ड इंटरनेटची स्पर्धा सुरू झाली आहे. इलॉन मस्कची कंपनी SpaceX आणि Airtel सोबत भागीदारी करणारी कंपनी SoftBank Group यांचा OneWeb प्रोजेक्ट यांची स्पर्धा सुरू आहे.

स्टारलिंकने अनेक देशांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी हजारो उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. इस्रोने अलीकडेच OneWeb चे 36 उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित केले.

या दोन्ही कंपन्यांची काम करण्याची पद्धत आणि क्षेत्र वेगवेगळे असले तरी सॅटेलाइट आधारित इंटरनेटमुळे दोघांची तुलना होऊ लागली आहे. दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आणि वनवेब यांची भारतात भागीदारी आहे, ज्यामुळे लोकांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. वन वेब आणि स्टारलिंक या दोनहीमद्धे काय फरक आहे आणि कोण सरस आहे ते आजच्या या लेखातून समजून घेऊया…

SoftBank Group च्या मालकीचे OneWeb हे 2012 मध्ये लॉन्च केले गेले. एकूण 648 उपग्रहांच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरविण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. OneWeb कमी फ्रीक्वेंसी वापरून इंटरनेट प्रदान करेल. वन वेबने आतापर्यंत चारशेहून अधिक उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.

स्टारलिंक प्रकल्प हा प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स ( SpaceX) कंपनीचा आहे. स्टारलिंकचे 30,000 लो ऑर्बिट सैटेलाइट अवकाशात पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. ही कंपनी जगभरात हाय-स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी काम करत आहे. युक्रेनसारख्या अनेक देशांमध्ये स्टारलिंक नेटवर्क कामही करू लागले आहे. 

OneWeb ची लेटन्सी 70ms आहे तर Starlink ची लेटेंसी 20 ते 40ms आहे. लेटन्सी म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत Data Packets पोहचण्यासाठी लागणारा एकूण वेळ. OneWeb चा इंटरनेट स्पीड 150 Mbps पर्यंत जाऊ शकतो आणि अपलोड स्पीड 20Mbps पर्यंत जाऊ शकतो. त्याच वेळी, स्टारलिंक म्हणते की त्याची डाऊनलोड स्पीड 50 ते 200 एमबीपीएस पर्यंत असू शकते तर अपलोड स्पीड 5 ते 10 एमबीपीएस पर्यंत असू शकते.

सध्या, स्टारलिंकच्या एका महिन्याच्या इंटरनेटची किंमत $110 म्हणजेच सुमारे 8,800 रुपये आहे. स्टारलिंकने अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहेत. 3 लाखांहून अधिक लोक स्टारलिंक इंटरनेट वापरत आहेत. OneWeb चे इंटरनेट Starlink पेक्षा खूपच स्वस्त आहे. त्यांची एका महिन्याची किंमत $12.95 म्हणजेच सुमारे 1,000 रुपये आहे.

स्टारलिंकचे नेटवर्क खूप मोठे आहे कारण त्यांनी आतापर्यंत हजारो उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यांनी आपले ब्रॉडबँड नेटवर्क इतके मजबूत केले आहे की दुर्गम ठिकाणीही स्टारलिंकचे इंटरनेट पोहोचू शकते. कंपनीनुसार, स्टारलिंक इंटरनेट अमेरिकेतील 98 टक्के लोकांना दिले जाऊ शकते. OneWeb मध्ये Starlink पेक्षा खूपच लहान नेटवर्क आहे. सध्या OneWeb फक्त 70 टक्के यूएस क्षेत्र व्यापते. परंतु, ज्या भागात OneWeb आहे तेथे सेवा अधिक चांगल्या आहेत.

सध्या इंटरनेट केबलद्वारे किंवा टॉवरद्वारे चालते. आता कल्पना करा तुमचा टीव्ही कसा काम करतो? टीव्हीसाठी डिश अँटेना आवश्यक आहे आणि तुम्ही सर्व चॅनेल अगदी आरामात पाहू शकता. आपल्या टीव्हीला जोडलेले डिश अँटेना हे उपग्रह आधारित नेटवर्कवर चालतात. कोणत्याही प्रकारच्या केबल किंवा टॉवरची त्यांना गरज पडत नाही. अगदी याच प्रमाणे सॅटेलाइट-आधारित इंटरनेट देखील कार्य करेल. अंतराळातील उपग्रह थेट तुमच्या घरी इंटरनेट कनेक्शन आणतील.

उपग्रह आधारित इंटरनेटमध्ये रेडिओ लहरींचा वापर केला जातो. मात्र, एलोन मस्कच्या स्टारलिंक प्रकल्पात लेझर वेव्हचा वापर केला जात आहे. उपग्रह आधारित इंटरनेटचा फायदा म्हणजे त्याचा वेग खूप चांगला आहे आणि उंच डोंगरावर, जंगलात कुठेही अगदी सहज हायस्पीड इंटरनेट मिळवता येते. स्टारलिंकचे म्हणणे आहे की ते आगामी काळात 300Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड प्रदान करेल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *