मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपल्या वेबसाईटच्या एका वाचकाने कमेंटमध्ये हा प्रश्न विचारला होता की, एखाद्या मालमत्तेची काही काळापूर्वी वाटणी झालेली असेल, आणि आपल्याला त्या वाटणीमध्ये कमी हिस्सा मिळालेला असेल तर त्या मालमत्तेच्या वाटणीला आव्हान देता येऊ शकते का? आणि या आव्हानाला यश मिळू शकते का? तर आजच्या या लेखात आपण या प्रश्नाचे सविस्तर उत्तर जाणून घेऊ.
मित्रांनो, एखाद्या मालमत्तेची वाटणी बर्याच पद्धतींनी केली जाते. काही मंडळी तोंडी वाटणी करतात, काही मंडळी कागदावर लिहून वाटणी करतात, तर काही मंडळी झालेल्या वाटणीची नोंदणी करून घेतात. पूर्वी झालेल्या अश्या कोणत्याही वाटणीला आव्हान देता येऊ शकते का? तर नक्कीच आव्हान देता येऊ शकते.
परंतु, जेंव्हा पूर्वी झालेल्या वाटणीला आव्हान देण्याचा प्रश्न येतो, त्या आव्हानाला यश मिळू शकतेका याबाबत आपण विचार करतो तेंव्हा पूर्वीची वाटणी कोणत्या पद्धतीने झालेली आहे हे महत्वाचे ठरते. जर पूर्वी झालेली मालमत्तेची वाटणी ही बेकायदेशीर मार्गांनी झालेली असेल, जर वाटणीमध्ये तत्कालीन एखाद्या कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन झालेले असेल तर आव्हानाला यश मिळण्याची शक्यता नक्कीच जास्त असते.
परंतु, समजा पूर्वी झालेली वाटणी ही कायदेशीर मार्गांनी झालेली असेल, वाटणी करताना सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन झालेले असेल तर जारी आपण त्या वाटणीला आव्हान दिले तरी त्या आव्हानाला यश मिळण्याची शक्यता ही खूपच कमी असते.
तर आता प्रश्न येतो तो म्हणजे कायदेशीर मार्गांनी झालेली वाटणी कोणती आणि बेकायदेशीर मार्गांनी झालेली वाटणी कोणती? दिवाणी न्यायलयामधून झालेली वाटणी ही मालमत्तेच्या कायदेशीर वाटणीचा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच, झालेल्या वाटणीची रीतसर नोंदणी करून घेणे ही देखील कायदेशीर मार्गांनी झालेली वाटणी समजण्यात येते. आता अश्या कायदेशीर मार्गांनी झालेल्या वाटणीला आव्हान केले तर यश मिळण्याची शक्यता नक्कीच खूप कमी असते.
आजच्या काळात देखील खूप मोठ्या प्रमाणावर तोंडी पद्धतीने मालमत्तेची वाटणी केली जाते. मुळात तोंडी वाटप हा सगळा प्रकारच गैर आणि बेकायदेशीर आहे. एखाद्या मालमत्तेचे तोंडी वाटप करणे हा करार कायदा, मुद्रांक कायदा आणि नोंदणी कायदा या सगळ्या कायद्यांचा भंग आहे. कारण कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण करायचं असेल, मग ते कुठल्याही प्रकारे असो. तर असा हस्तांतरण होण्याकरता रीतसर करार लिहून तो नोंदवून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे, तोंडी झालेल्या वाटणीला जर आव्हणीत केले तर अश्या प्रकारच्या आव्हानास यश मिळण्याची शक्यता ही जास्त असते. थोडक्यात काय तर, आपण पूर्वी झालेल्या वाटणीला नक्कीच आव्हान देऊ शकतो परंतु त्या आव्हानाचे यश हे वाटणी कोणत्या पद्धतीने झालेली आहे यावर अवलंबून असते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.