सूर्यफुलाचे तोंड नेहमी सूर्याकडेच का असते? जाणून घ्या रंजक माहिती

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

सूर्यामध्ये इतका प्रकाश, ऊर्जा कोठून येते, चंद्र इतका थंड का आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात कायम डोकावतात. यापैकी एक प्रश्न वारंवार मनात येतो तो म्हणजे सूर्यफुलाचे तोंड नेहमी सूर्याकडेच का असते? तुमच्यापैकी बर्‍याच लोकांनी हे पाहिले देखील असेल, ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी हे ऐकले नक्कीच असेल. चला तर मग आजच्या लेखात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ.

प्रत्येक फुलाचे स्वतःचे असे काही वेगळेपण असते, त्याचप्रमाणे सूर्यफुलालाही स्वतःची वेगळी ओळख आणि सौंदर्य असते. सूर्यफुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपले तोंड नेहमी सूर्याच्या दिशेने फिरवते. सूर्यफुलाची फुले हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात जास्त फुलतात कारण उन्हाळ्यात सूर्यप्रकाश 6-7 तासांपेक्षा जास्त असतो आणि सूर्यफुलाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.

सूर्यफुलाची नवीन फुललेली फुले सूर्याकडे अधिक सरकतात. सूर्यफुलाची फुले सूर्याच्या दिशेकडे असण्याचे कारण म्हणजे हेलिओट्रोपिझम. एका संशोधनानुसार, सूर्यफुलाच्या फुलांमध्ये हेलिओट्रोपिझम नावाची प्रणाली असते, जी त्यांना सूर्याची दिशा समजण्यास आणि त्या दिशेने वळण्यास मदत करते.

सूर्य सकाळी पूर्वेकडून उगवतो आणि हळू हळू पश्चिमेकडे मावळतो, त्याच प्रमाणे सकाळी पूर्वेकडे तोंड असलेले सूर्यफूल देखील सूर्यासोबत पश्चिम दिशेकडे तोंड करते. सूर्य मावळल्यानंतर सूर्यफूल पुन्हा आपले तोंड पूर्व दिशेला वळवून ठेवते, आणि सकाळी सूर्य उगवल्यानंतर पुन्हा ते चक्र सुरू होते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *