सावध राहा, सध्या Sim Swapping नावाचा Fraud धुमाकूळ घालतोय || झटक्यात तुमचा बँक बॅलन्स झिरो होऊ शकतो

News Technology

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

दोन दिवसापूर्वी पेपर मध्ये Sim Swapping नावाच्या फ्रॉड ची बातमी वाचली आणि मला धक्काच बसला. ऑनलाईन चोरी करणाऱ्या चोरांनी म्हणे सिम कार्ड चा वापर करून एका माणसाचे बँक अकाउंट रिकामे केले. विषय गंभीर असे असे वाटले. म्हणून म्हटल या बद्दल सर्वां पर्यंत माहिती पोहचवली पाहिजे. ही माहिती सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुमच्या सोबत असला काही फ्रोड होऊ नये.

मित्रांनो जसा काळ बदलतोय तसे 5G च्या वेगाने नवीन टेक्नॉलजी तयार होत आहे. पण त्या टेक्नॉलॉजी सोबत आणखी एक गोष्ट झपाट्याने बदलत आहे ती म्हणजे Online Fraud चे प्रकार. आता ती टेक्नॉलॉजी काय अपडेट होयची थांबणार नाही. त्याच्यामुळे तुम्हालाच थोड्या फार प्रमाणात अपडेट रहावे लागेल.

आता आपण Sim Swapping विषयी थोडी माहिती घेऊ. आता जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्या मोबाईल मध्ये प्रत्येक जण कॉल, ईमेल, मेसेज, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, गेम्स, रम्मी गेम अश्या सुविधा वापरत असतो. पण तशा सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावे लागते तर तुमचा मोबाईल नंबर वापरून ते ॲप किंवा गेम्स मध्ये लॉगिन करावे लागते.

पुढे तुमच्या मोबाईल नंबर बरोबर तुमचे नाव, राहत ठिकाण, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे सामाजिक मत, तुमचं जॉब प्रोेफेशन, तुमची बँक डिटेल, तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर तुम्हाला त्यामध्ये भरावे लागतात. आता ते कंपल्सरी नसलं तरी तुमच्यातले बरेच जण अनावधानाने अशी माहिती या ॲप मध्ये टाकून देतात.

त्यानंतर मग काय होते तर तसे ॲप्स किंवा गेम्स मध्ये तुम्ही टाकलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या टीमकडून तुमच्या मानसिकतेचा आणि गरजांचा अभ्यास केला जातो. तसा अभ्यास करून त्यांना काय मिळते तर तुम्हाला आता नेमकी कशाची गरज आहे याची माहिती. पुढे मग ती माहिती ते वेगवेगळ्या कंपन्यांना विकतात आणि त्या कंपन्या तुम्हाला तुमच्या गरजेनुसार जाहिराती दाखवू लागतात.

तुमच्या सुद्धा लक्षात येईल की जेव्हा तुम्ही गुगलवर किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या एखाद्या ई कॉमर्स वेबसाईटवर एखादी गोष्ट सर्च करता तेव्हा पुढच्या 10 व्या मिनिटाला तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर त्या वस्तूंची जाहिरात दिसायला लागतात. इतक्या बारकाईने तुमच्यावर लक्ष ठेवले जाते. कारण ऑनलाईन जगात तुम्ही त्यांच्यासाठी एक व्यवसायिक प्रॉडक्ट बनलेले असतात.

तशा प्रकारे तुमची मानसिकता ओळखून ते तुम्हाला मेसेज, ईमेल किंवा व्हाट्सअप द्वारे काही वेबसाईटच्या किंवा ॲप च्या लिंक पाठवतात. त्या लिंक मध्ये पैशांचा उल्लेख केलेला असतो. तुमच्या पैकी बरेच जण खरी परिस्थिती माहिती नसल्या मुळे त्या लिंक वर क्लिक करतात. ते ॲप डाउनलोड करतात आणि त्याच संधी चा फायदा घेऊन हॅकर तुमच्या फोनचा ताबा मिळवतो.

तसा ताबा मिळाल्यावर काय होते? तर तुमच्या फोनची स्क्रीन त्या हॅकरच्या लॅपटॉप वर दिसायला लागते. म्हणजे काय? तर तुम्ही तुमचा फोनवर जे काय करता ते सगळे त्याला तिकडे दिसायला लागत. तिथे बसून तो तुमचा फोन ऑपरेट देखील करू शकतो इतकी पावरफुल टेक्नॉलॉजी त्यांनी बनवलेले असते. त्याचा वापर करून मग तुमचा मोबाईल वर येणाऱ्या बँकेचा ओटीपी मिळवतो आणि दुसऱ्या मिनिटाला तुमचे बँक अकाउंट रिकाम करतो. असा एक प्रकार असतो.

दुसरा म्हणजे काही वेळेस अचानक तुमच्या सिम कार्ड चे नेटवर्क गायब होते. त्या सिम कार्ड वर मग ना कोणाचा फोन येतो ना कोणाचा मेसेज. तुम्हाला वाटतं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे मोबाईलची रेंज गेली असेल. पण खर दृश्य वेगळेच असते. तिकडे तो हॅकर तुमच्या आधार कार्ड ची माहिती घेऊन sim card च्या गॅलरी मध्ये जातो आणि तिथे तो मोबाईल बंद पाडलाय किंवा मोबाईल हरवलाय असं खोटे सांगून नंबर ब्लॉक करायला सांगते.

एकदा का नंबर ब्लॉक झाला, तुमचा फोन मधले सिम कार्ड बंद पडते आणि तिकडे तो हॅकर त्याच सेम नंबरचे sim card खरेदी करते. त्यासाठी तो तुमच्या डुबलीकेट कागदपत्रांचा वापर करतो. ही गोष्ट लक्षात घ्या ती सगळी प्रोसेस तो मुद्दाम शुक्रवार किंवा शनिवार गाठून करतो. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बऱ्याच टेलिफोन ऑपरेटर ची ऑफिस बंद असतात.

त्यामुळे तुम्हाला काय लगेच सिम कार्ड गॅलरी ला संपर्क करता येत नाही आणि त्याला त्याची गेम साध्य करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळतो. पुढे सिम चालू झाले की तातडीने तो हॅकर तुमच्या बँकेचा OTP मिळवतो आणि दुसरा सेकंदाला तुमचा बँक बॅलन्स शून्य करून टाकतो. मागे काही दिवसापूर्वी बिहारमध्ये अशी घटना घडल्याचे नोंद आहे. तशा प्रकारच्या फ्रॉड ला Sim Swapping किंवा sim exchanging fraud म्हटले जाते.

तो फ्रॉड दोन टप्प्यात केला जातो सुरुवातीला तुमचा डेटा गोळा करायचा आणि नंतर तुमचा नंबर ब्लॉक करून नवीन सिम कार्ड घ्यायचं. असं त्यांचा प्लॅन असतो आणि तुम्ही सुद्धा लिंक वर क्लिक करून आयत कोलित त्यांच्या हातात देता. आता हे झाले फ्रॉड चे स्वरूप आता त्या Sim Swapping पासून वाचायचे कसे? तर तुमच्या फोनवर तसे फिशिंग मेल्स, मेसेज किंवा लिंक्स आल्या तर त्याच्यावर अजिबात टॅप करायचं नाही.

म्हणजे त्या लिंक ओपन किंवा ॲप डाऊनलोड करायचे नाही. जर मेसेज ने शक्य झाले नाही तर हॅकर तुम्हाला बँकेचा फेक कर्मचारी बनून कॉल देखील करू शकतो. त्या कॉल वर तो तुम्हाला तुमचे बँक अकाउंट, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, जन्मतारीख, आधारकार्ड किंवा पॅन कार्ड ची डिटेल्स विचारू शकतो. जर असा कुणी तुम्हाला पण फोन केला तर तुम्ही त्याला फोनवर तुमची वैयक्तिक माहिती अजिबात शेअर करू नका.

तुम्ही चुकून तशी माहिती त्याला सांगितले तर त्यांना तुमच्या बँके खात्यावर घात घातलाच म्हणून समजा. त्याचप्रमाणे वेळोवेळी तुमच्या इंटरनेट बँकिंग, एटीएम, क्रेडिट कार्ड, गुगलपे, फोनपे, भीम युपीआय, पेटीएम वॉलेट चे Password बदलत राहा. Password जरा अवघड आणि क्लिष्ट ठेवा म्हणजे कोणाला लवकर त्याचा अंदाज लावता येणार नाही.

आणि सर्वात महत्त्वाचं जर तुमच सिम कार्ड बंद पडलं किंवा नंबर ब्लॉक झाला तर लगबगीने गॅलरी वाल्यांशी संपर्क करा. नंबर फक्त तुमच्या ॲक्टिव राहील याची काळजी घ्या. शक्यतो जो नंबर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड व तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक केलाय तो नंबर कोणत्याही सोशल मीडिया साईट साठी किंवा ऑनलाईन गेम साठी अजिबात वापरू नका. कारण तिथूनच तुमच्या नंबरची डिटेल्स हॅकर्स गँगला मिळत असते. त्यामुळे जेवढे सेफ राहता येईल तेवढं सेफ रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *