महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यांना विजयासाठी फक्त 144 मतांची गरज असताना 164 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी ( 107 मत ) यांचा पराभव केला. या पदासाठी शिंदे गट आणि भाजपची पहिली पसंती राहुल यांना होती. राहुल नर्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचे महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पेशाने वकील असलेल्या राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा सगळेच विचारात पडले. चला जाणून घेऊया कोण आहे राहुल नार्वेकर आणि त्यांच्या नावावर शिक्का का मारला गेला?
कोण आहेत राहून नर्वेकर ?
४५ वर्षीय राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नगरसेवक होते. त्यांचे भाऊ मकरंद हे बीएमसीच्या प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. त्यांची मेहुणी हर्षताही बीएमसीच्या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेवक आहे. याशिवाय राहुल हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजके नाईक यांचे जावई आहेत. नाईक हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती आहेत.
2019 मध्ये केला भाजप मध्ये प्रवेश :
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी राहुल नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दक्षिण मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले. त्यांनी दणदणीत विजयाची नोंद केली. सध्या राहुल नार्वेकर हे भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारीही आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्येही केले काम :
भाजपपूर्वी राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि राष्ट्रवादीतही राहिले आहेत. इंडियन एक्सप्रेसमधील एका बातमीनुसार, राहुल नार्वेकर 15 वर्षांपासून शिवसेनेत होते. 2014 मध्ये त्यांना राज्य विधान परिषदेची निवडणूक लढवायची होती. मात्र शिवसेनेने नकार दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण पराभव झाला.