तुम्ही घड्याळामध्ये QUARTZ हा शब्द पाहिला असेलच, पण याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या रंजक माहिती.

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

जगभरातील विविध कंपनींच्या घड्याळावर तुम्हाला QUARTZ  हा शब्द लिहलेला दिसेल. बर्‍याच लोकांचा असा गैरसमज असतो की भितीवरील आणि हातामध्ये घातलेल्या घड्याळावर असलेला QUARTZ हा शब्द एखाद्या कंपनीचे नाव असेल. या बर्‍याच लोकांपैकी एक मी सुद्धा होतो. आता, हे कंपनीचे नाव नाही तर मग काय आहे? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच! चला तर मग आजच्या या लेखात आपण या QUARTZ शब्दामागची रंजक माहिती जाणून घेऊ.

सर्वप्रथम आपण QUARTZ काय आहे हे जाणून घेऊ. QUARTZ हे सिलिकॉन आणि ऑक्सीजन पासून तय्यार होणारे खनिज आहे. हे एक नौसर्गिक खनिज आहे. QUARTZ या नैसर्गिक खनिजामध्ये काही इलेक्ट्रिक गुणधर्म असतात. QUARTZ क्रिस्टल मध्ये असणारे हे इलेक्ट्रिक गुणधर्म म्हणजे piezoelectric effect आणि reverse piezoelectric effect.

या QUARTZ क्रिस्टलवर दबाव ( म्हणजेच प्रेशर किंवा व्हायब्रेशन ) दिल्यानंतर यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो. या क्रियेला piezoelectric effect असे म्हणतात. याउलट, जर QUARTZ क्रिस्टलला इलेक्ट्रिक चार्ज दिला तर त्यामध्ये दबाव म्हणजेच व्हायब्रेशन निर्माण होते. यालाच reverse piezoelectric effect असे म्हणतात.

आता तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या विज्ञानाच्या गोष्टी का सांगतोय? याचा आणि घड्यावर लिहलेला त्या QUARTZ चा काय संबंध? तर संबंध आहे. घड्याळामद्धे देखील निसर्गात आढळणारे QUARTZ हे खनिज वापरण्यात आलेले असते. घड्याळ बनवताना त्यामध्ये QUARTZ या खनिजाच्या reverse piezoelectric गुणधर्माचा वापर केला जातो.

QUARTZ क्रिस्टलला इलेक्ट्रिक चार्ज दिल्यानंतर त्यामध्ये होणारे व्हायब्रेशन हे त्या क्रिस्टलच्या आकारावर अवलंबून असते. एका ठराविक आकाराच्या QUARTZ क्रिस्टलला जर इलेक्ट्रिक चार्ज दिला तर त्यामध्ये होणारे व्हायब्रेशन हे तंतोतंत असतात. घड्याळामद्धे वापरल्या जाणार्‍या QUARTZ क्रिस्टलचे एका सेकंदाला 32,768 व्हायब्रेशन होतात. याचाच अर्थ असा की, घड्याळात वापरल्या जाणार्‍या QUARTZ क्रिस्टलचे 32,768 व्हायब्रेशन म्हणजेच 1 सेकंद.

मित्रांनो, 1 सेकंद म्हणजे नेमका किती कालावधी हे घड्याळातील उपकरणांना माहीत नसते. त्यामुळेच घड्याळात एका ठराविक आकाराचे QUARTZ क्रिस्टल वापरले जाते. या QUARTZ क्रिस्टलला घड्याळातील बॅटरीद्वारे एलेक्ट्रिक चार्ज दिला जातो, यामुळे QUARTZ क्रिस्टलचे व्हायब्रेशन होते. 32,768 व्हायब्रेशन झाले की घड्याळाचा सेकंद काटा पुढे सरकतो.

प्रत्येक 32,768 व्हायब्रेशन नंतर सेकंद काटा पुढे सरकतो आणि अश्याप्रकारे घड्याळ 1 सेकंदाचा कालावधी मोजतो. हा सेकंद काटा 60 वेळा फिरल्यानंतर मिनिट काटा फिरतो. मिनिट काटा 60 वेळा फिरल्यानंतर तास दर्शवणारा काटा पुढच्या आकड्यावर जातो. घड्याळ बनवताना जेंव्हा त्यामध्ये QUARTZ वापरले जाते, QUARTZ च्या reverse piezoelectric गुणधर्माचा वापर करून 1 सेकंदाचा कालावधी निश्चित केला जातो तेंव्हा त्या घड्याळावर QUARTZ हा शब्द लिहण्यात येतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *