डॉलर पेक्षाही महागडे आहे हे चलन. तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात महाग ‘चलन’ कोणते?

Infomative Market Money

सध्याच्या काळात चलने आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सुखसोयी खरेदी करण्यासाठी आपल्याला चलन हवे असते. म्हणजेच सध्याच्या काळात चलनाशिवाय जीवन जगणे अशक्य आहे हे आपण समजू शकतो. पूर्वीच्या काळी असे नव्हते पण नंतर वस्तु विनिमय पद्धत लागू झाली. वस्तु विनिमय प्रणाली अंतर्गत, आपण एका वस्तूची दुसर्‍या वस्तूशी देवाणघेवाण करू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून आपण 1 किलो तांदूळ घेतले तर त्या व्यक्तिला त्या बदल्यात 1 किलो डाळ देण्यासारखी पद्धत जुन्या काळात असत.

चलनाचा वापर : जुन्या काळी, वस्तूंची खरेदी-विक्री आणि व्यापार करण्यासाठी जगातील सर्व देशांमध्ये वस्तु विनिमय प्रणाली वापरली जात होती. आजच्या काळात प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन आहे, ज्याद्वारे त्या देशातील लोक आपल्या देशातील कोणतीही वस्तू किंवा सुविधा खरेदी आणि विक्री करतात. प्रत्येक देशाच्या चलनाचे मूल्य वेगळे असते. म्हणजे जेव्हा आपण भारतातील इतर कोणत्याही देशाचे चलन वापरतो, तेव्हा त्याचे भारतीय चलनात रूपांतर केल्यानंतर त्याचे मूल्य वेगळे होते.

चालनाची किंमत कमी-जास्त का होते? : उदाहरणार्थ, जर आपण 1 यूएस डॉलर भारतीय चलनात रूपांतरित केले तर त्याची आज घडीला किंमत 78.03 ₹ असेल. ही किंमत कालांतराने वाढू किंवा कमी होऊ शकते. कोणत्याही देशाचे चलन मजबूत किंवा कमकुवत असण्याचे कारण म्हणजे त्या चलनाचा वापर. प्रत्येक देशाकडे इतर देशांच्या चलनांचा साठा असतो ज्याचा वापर व्यवहारासाठी केला जातो. या विदेशी चालनाच्या साठ्यात वाढ किंवा घट झाल्यामुळे चलनाचे मूल्यही वाढते किंवा कमी होते.

जगातील बहुतेक देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरचा वापर केल्यामुळे अमेरिकन डॉलरला जागतिक चलनाचे स्थान मिळाले आहे. भारतीय चलन साठयात अमेरिकन डॉलर कमी झाल्यास भारतीय चलन म्हणजेच ‘रुपया’ची किंमत देखील कमी होते. भारताने विदेशातून एखादी वस्तु आयात केल्यानंतर त्याची पेमेंट ही डॉलरच्या स्वरुपात केली जाते, त्यांमुळे भारतीय चलन साठयातून डॉलर कमी होतात.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जेंव्हा एखादा देश विदेशातून जास्त वस्तु आयात करतो तेंव्हा त्या देशाचे चलन कमकुवत होते, आणि जेंव्हा एखादा देश विदेशात वस्तु निर्यात करतो तेंव्हा त्या देशाचे चलन मजबूत होते. 

जगातील सर्वात महागडे चलन : कुवेत देशाचे चलन हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे आणि याचे कारण येथे सापडणारे प्रचंड तेल आहे जे कुवेत जगभरात निर्यात करते. कुवेतचे चलन  KWD ( कुवेती दिनार ) हे आहे. आज घडीला 1 दिनारची किंमत भारतात 254.39 इतकी आहे. या किंमतीत वेळोवेळी चढ-उतार होत राहते.

तुम्हाला माहिती आहे का आज जारी कुवैती दिनार हे जगातील सर्वात महागडे चलन असले तरी एक काळ असा होता जेंव्हा कुवैत कडे स्वतःचे चलन नव्हते. 70-80 वर्षांपूर्वी कुवेतमध्ये भारत सरकार द्वारे जारी केलेले चलन वापरण्यात येत होते. म्हणजेच RBI एकेकाळी कुवेतचे चलन बनवत असे आणि त्या चलनाचे नाव ‘गल्फ रुपया’ असे होते. ते भारतीय रुपयाशी दिसायला अगदी सारखे होते. या गल्फ रुपीचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतात वापरता येत नव्हते. जरी कुवेतला 1961 मध्ये ब्रिटीश सरकारपासून स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर 1963 मध्ये कुवेत हा पहिला अरब देश बनला जिथे निवडणुका झाल्या.

1960 मध्ये, कुवेती सरकारने प्रथमच कुवेती चलन सुरू केले. त्यावेळी त्याची किंमत भारतीय रुपयानुसार 13 रुपये 1 कुवैती दिनार होती. 1970 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कुवैती दिनारचा विनिमय दर निश्चित करण्यात आला. मात्र, कुवैती दिनार अजूनही स्थिर दरावर आहे. आता विचार करा की इतके फायदे आणि तोटे असताना, कुवेतचे दिनार हे जगातील सर्वात महाग चलन कसे राहिले. यामागे तेल हे एकमेव कारण आहे. कुवेतमध्ये जगातील सर्वात मोठी तेलाची खाण आहे आणि या तेलाच्या आधारावर कुवैती दिनारला जगभरात सर्वाधिक किंमत आहे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *