या 5 कारणानें जैन लोक इतके श्रीमंत झाले..!!

Infomative Investments

भारतात एक गोष्ट तुम्हाला कधीच जाणवले का? संख्येने फार थोडे असणारे लोक लय श्रीमंत असतात. त्यांची कमुनिटी छोटीच असते पण लोक खूप श्रीमंत. उदाहरण द्यायचं झालं तर पारशी, जैन समाजाचे लोक. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला तर जाणून घेवू..

आपण जैन धर्माचे लोक श्रीमंत कसे असतात? त्याचे पाच महत्त्वाचे कारण पाहणार आहोत.. भारतात जैन लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे आणि तरीही लोक भारताच्या आयकर भरण्याच्या आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरतात. गोल्ड इंडस्ट्रीज, डायमंड इंडस्ट्रीज, शेअर मार्केट, कमोडिटी इंडस्ट्री, इयरलाईन इंडस्ट्रीज अशा अनेक ठिकाणी जैनांची लॉबी पाहायला मिळते.

तसेच इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई जैनधर्मीय होते. जगातल्या सगळ्यात जास्त श्रीमंत माणसांच्या यादीत येणारे गौतम अदानी जैन धर्माचे आहेत. भारतातल्या सगळ्यात मोठ्या फार्मासिंडीकल कंपनीचे मालक दिलीप संघवी जैन कमुनिटीचे आहेत. याचबरोबर टाइम्स ग्रुपच्या मालक इंदू जैन सुद्धा जैन धर्माच्या आहे आणि अशी जैन धर्मीयांची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.

जैन लोक श्रीमंत असण्याचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांचं “शिकेल तो टिकेल” हे धोरण होय. एका रिसर्चनुसार आपल्याकडे अधिक साक्षरतेचे दर हा जैन कमुनिटीचा आहे. त्यामध्ये भारताचा साधारण साक्षरता दर 65.38 टक्के आहे आणि आता फक्त जैनांचा 94 टक्के आहे. शिवाय भारताचा महिलांचा साधारण साक्षरता दर 54. 16 टक्के आहे तर जैन ईसाधारण साक्षरता दर 90.06 टक्के एवढा आहे. यावरून आपल्या लक्षात येतं जैन धर्मात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व देते.

तसेच तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय शिक्षण हाच सगळ्याच पाया असतो या विचारधारेचे जैन लोक असल्याचे दिसून येत. तसेच जैन धर्माचे लोक नोकरी करणारी नाही तर देणारी असतात. त्यांना यूपीएससी करायचं नसतं, सरकारी नोकरी करायची नसते त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो तो धंदा आणि ही विचारसरणी त्यांची लहानपणापासूनच बनत असते.

व्यवसाय बद्दल नियोजन आणि अंडरस्टॅंडिंग या जैनांचे खूप लहान वयातच बनत असल्यामुळे त्यांची प्रगती लवकर होते आणि प्रगती झाल्यावर हाती पैसा सुद्धा लवकर येतो. जैन कम्युनिटी श्रीमंत असण्याचा तिसरा मुद्दा म्हणजे त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होय. या जैन कम्युनिटीला मुळातच फार वाईट सवयी कमी असतात. पार्टी, पॉलिटिक्स, मजा-मस्ती यापेक्षा योगा मेडिटेशन, अध्यात्म या त्यांना जास्त रस असतो.

यामुळे या लोकांचे वाढीव खर्च होतच नाही. नॉनव्हेज तरी लोक खातच नाही बरेच लोक दारू पीत नाही. त्यामुळे पैसे जास्त साठवले जातात आणि उडवले जात नाही. शिवाय यामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामसुध्दा कमी होतात आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे डॉक्टर आणि हॉस्पिटलचा खर्च ही वाचतो. जैन समाजाला पैसे कमावणं ते वाचणं आणि साठवणं याचं गणित बरोबर माहीत असतं. कारण पैसा साठवला म्हणजे एक प्रकारे पैसा कमवत असत. त्यामुळे हे लोक इतरांपेक्षा जास्त श्रीमंत असतात.

याचबरोबर, जैन लोक “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” कम्युनिटी बिल्डिंग शिकावं तर ते जैनांकडून. कारण मराठी माणसाबद्दल कायम एक तक्रार हमखास ऐकू येते ती म्हणजे एकमेकांचे पाय ओढणे आपल्याकडे लय चालतं. पण याचा उलट जैन समाजात चालतं. ज्याला जशी लागेल तशी मदत करायला कायम तत्पर असतात आणि एकत्र पुढे जातात. त्यांच्यावर त्यांच्या धर्माचा आणि संस्कारांचा प्रभाव असतो.

शिवाय माणसांची पैशांची आणि कामाची या लोकांना किंमत असते. तसेच हे लोक कामाने, स्वभावाने शांत आणि गोड बोलणारी असतात त्यामुळे त्यांचं सगळ्यांशी जमतं आणि त्यांना सगळ्यांशी जुळवून घेतात आणि त्यांच्या स्वभावाचा सगळ्यात मोठा फायदा होतो तो त्यांच्या बिझनेस वाढवण्याला आणि त्यामुळे ही लोक कायम नफ्यात असतात.

तसेच या जैन लोकांचा पाचवा फंडा आहे “जगा आणि जगू द्या”. जैन लोक पृथ्वीवरचा कोणालाही किंवा कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही यासाठी कायम प्रयत्नात असतात. त्या गोष्टींसाठी सॅक्रिफाइस करण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. त्यामुळे कोणालाही हानी होणार नाही अश्या व्यवसायात ते घुसतात आणि म्हणूनच जैन समाज जास्तीत जास्त बिजनेस करताना दिसतात.

म्हणजेच व्यापार करताना किंवा ट्रेडिंग करताना दिसतात, तिथे त्याचा व्यवहाराशी येतो या व्यवहारात कोणालाही हानी पोचणार नसते तर फक्त फायदाच होणार असतो आणि अहिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्या या जैन समाज यावर विश्वास ठेवणं सुद्धा इतर व त्यांच्यासोबत व्यवसाय करणाऱ्याला सहज शक्य होतात आणि परिणामी जैन समाजाची उत्तरोत्तर प्रगती होते.

जैन समाजाला स्वतः सोबतच दुसऱ्यांच्या पैशांचीही तेवढीच किंमत असते. त्यामुळे ते कोणाला फसवायला जात नाही आणि कोणाकडून फसले सुद्धा जात नाहीत. थोडक्यात काय तर जैन धर्मीय फक्त पैसे कमवून नाही तर नाव कमावून धर्म प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य जपून सर्व बाजूने तुम्हाला श्रीमंत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *