म्हणून पुण्यात मोक्याच्या जागा आर्मीकडे आहेत !!

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

पहिल्यांदा पुण्यात गेल्यावर अनेक लोकांना एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे पुण्यात काही मोठ्या ठिकाणी कायमस्वरूपी लष्करी अधिकारी आणि जवान का असतात.  तर पुण्याच्या लष्करी महत्त्वाची सुरुवात अगदी छत्रपती शिवरायांपासून होते. शिवरायांचे बालपण पुण्यात गेले. त्यांनी अनेक धाडसी मोहीम फत्ते केल्या आणि त्या नंतर पुन्हा एकदा सत्ताकेंद्र पेशव्यांच्या काळात बनलं.

मग त्यांनतर मराठे शाहीचा अटकेपार झेंडा लावून आपल्या अंमलाखाली आणला होता. तेव्हा छत्रपतींच्या आदेशानुसार सर्व सूत्रे इथूनच हालत होती. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात इंग्रज आणि पेशवे यांच्यात युद्ध झाले आणि इंग्रजांचा झेंडा शनिवार वाड्यावर फडकला. तिथून पुढे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली इंग्रजांची लढाई त्यांनी आपल्या सैन्यासाठी कायम ठेवली. मुंबईसारख्या महत्त्वाचे व्यापारी बंदर ताब्यात असल्याने त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात सैन्य तैनात करणे त्याना गरजेचं वाटत होतं.

पुण्यातील आल्हाददायक वातावरण, पाणी लष्कराच्या दृष्टीने मिळणाऱ्या सुखसुविधा बघता पुण्यात आपल्या लष्कराच्या जम बसवला. 1857 उठाव झाल्यानंतर ब्रिटिश सरकार थेट भारताच्या कारभारात लक्ष घालू लागले. ब्रिटिशांनी प्रेसिडेंट आर्मीचे विघटन केलं आणि सगळे अधिकार कमांडर इं चीफच्या हातात सोपवून त्यानुसार 1 एप्रिल 1895 हे सैन्य ब्रिटिश इंडियन आर्मी म्हणून ओळखला जाऊ लागला.या आर्मीची बंगाल, पंजाब, मद्रास आणि बॉम्बे अशी 4 मुख्यालय करण्यात आली होती. त्यातील बॉम्बे मुख्यालयाचे हेड कॉटर पुणे.

मग पुढे 1908 मध्ये ब्रिटिशांनी आर्मीचे 2 भाग केले आणि त्यातील एकाचे मुख्यालय रावळपिंडीत होते तर दुसऱ्याचे मुख्यालय पुण्यातच कायम ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा 1920 मध्ये बदल करण्यात आले. सध्या भारतीय सैन्यदलाच्या एकूण 7 कमांड आहे त्यातही पुण्यात मुख्यालय असलेल्या सदन कमांडचे महत्व अबाधित आहे. सगळ्यात जुनी कमांड सदन कमांड ओळखला जातं. पहिल्या महायुद्धापासून, लष्करी आणि मानव निर्मित नैसर्गिक आपत्तीपासून नागरिकांसाठी भारताच्या भूमीचे रक्षण करण्यात योगदान दिले.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सदन कमांडरच्या काही तुकड्या बेंगलोरमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. भारतातल्या बंदराचे आणि हवाईदलाचे रक्षण करण्यासाठी आणि सैनिकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी यांनी बजावली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोठं आव्हान होतं ते संस्थानांचं विलीनीकरण आणि गोव्याला मुक्त करण्याचे. जुना गड आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात सदन कमांडच्या सैन्याचा मोठा वाटा होता. हे पराक्रमाचे परंपरा 1961 गोवा मुक्तिसंग्रामात 1965 कच्च युद्धातही कायम राहील.

1971च्या युद्धात भारतीय वायुदलाच्या पंखांना खांदा लावून कमांडनी झुंज दिली आणि पाकिस्तानी सैन्यापासून भारताचा रक्षण करण्यात आलं. तसेच पाकिस्तानमध्ये घुसत काही भाग आपल्या ताब्यात घेतला होता. त्याचा आवाका इतका होता 1985 मध्ये जोधपूरला सदन कमांडचे वाळवंट तुकडी उभा करण्यात आली. सध्या सदन कमांड फक्त पुण्यापुरतेच मर्यादित आहे का? तर नाही. त्याला पुण्यात असला तरी सदन कमांड सीमा अनेक ठिकाणी पाकिस्तानला भिडतात.

11 राज्य केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी शिरावर असलेल्या सदन कमांडचे मुख्यालय पुण्यात आहे. त्याचा कारभार पुण्यातून चालतो त्यामुळे निश्चितच पुण्याच्या वैभवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत 2 भूकंपाने मोठे हादरे दिले. त्यातील एक हादरा 1960 मध्ये कोयना भूकंप आणि 1993 मध्ये किल्लारी भूकंप. या अडचणीमध्ये प्रत्येकापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम ठेवा सदन कमांड केलं. मदतीचा हात 2004 वेळी महापुरात आणि मुंबई दंगलीवेळी तसेच 2019 च्या महाराष्ट्रातल्या पुरा वेळी पुढे आला आणि कित्येक जीव वाचले.

आजही भारताच्या मित्र देशांसोबत युद्धसरावचे आयोजन करतात. तसेच कोरोना काळात फक्त लष्करासाठी असलेल्या सुविधा सामान्य नागरिकांसाठी खुला करतात किंवा महामारी झालेली लढाई सदन कमांडने असंख्य माणसे जगवण्याचे काम केले आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *