नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा..
सोशल मीडिया हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजच्या काळात सोशल मीडियाशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. सोशल मीडियावर आपली प्रतिभा दाखवण्यासोबतच लोक त्याचा मनोरंजनासाठीही वापर करतात. इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या मदतीने लोक एकमेकांशी संवाद देखील साधतात.
आपण कधी विचार केला आहे की सोशल मीडिया आपल्यासाठी इतका महत्त्वाचा झाला आहे, परंतु सर्वात पहिली सोशल मीडिया साईट कोणती? पहिली सोशल मीडिया साईट कोणत्या व्यक्तीने बनवली होती? सोशल मीडिया साईट वरील सर्वात पहिली पोस्ट कोणती होती? नाही?? चला मग आजच्या या लेखात याबद्दलची रंजक माहिती जाणून घेऊ.
1989 मध्ये स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध लॅब ‘सर्न’चे संगणक शास्त्रज्ञ सिल्व्हानो डी गेनारो यांनी प्रयोगशाळेत संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. लोकांना कामातून दिलासा मिळावा हा त्याचा उद्देश होता. या उपक्रमात ४० मुलींनी सहभाग घेतला. या मुली गाण्यासाठी स्टेजवर गेल्या. एका फोटोग्राफरने अल्बमच्या कव्हरसाठी या मुलींचे फोटो काढले होते. बीबीसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सिल्व्हानो या मुलींचे फोटो आपल्या कॉम्प्युटरमध्ये सुरक्षित ठेवत होता. त्याच वेळी, त्यांचे मित्र आणि world wide web (www) चे शोधक, बर्नर्स ली यांनी वेबसाइट तयार करण्याचे सुचवले.
बर्नर्स ली यांनी प्रयोगशाळेतील लोकांना त्यांच्या जीवनाची माहिती शेअर करता यावी यासाठी एक वेबसाइट तयार केली जावी या संकल्पनेतून वेबसाइट तयार करण्याचे सुचवले. वेबसाइट तयार झाली आणि कार्यक्रमात गाणाऱ्या त्या मुलींचे फोटो पहिल्यांदा वेबसाइटवर अपलोड करण्यात आले. जगातील ही पहिली सोशल मीडिया आणि सोशल मीडियावरील ती पहिली पोस्ट असल्याचा दावा केला जात आहे.
यासोबतच जगातील पहिल्या सोशल मीडिया साइटबद्दल बोलायचे झाले तर सिक्स डिग्रीचे नाव सर्वात वर येते. ही एक प्रकारची ब्लॉगिंग साइट होती आणि ती 1997 मध्ये सुरू झाली होती. लोक या साइटवर त्यांचे फोटो अपलोड करू शकत असे. तसेच लोक एकमेकांना मित्र म्हणून आपल्या लिस्ट मध्ये जोडू शकत होते.
फेसबुकबद्दल सांगायचे तर, मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या रूममेट आणि हॉवर्डच्या मित्रांनी 2004 मध्ये फेसबुक तयार केले. त्यानंतर 2005 मध्ये यूट्यूबची सुरुवात झाली. एका वर्षानंतर, मार्च 2006 मध्ये, जॅक डोर्सीने 3 साथीदारांसह ट्विटर तयार केले. त्यानंतर 2010 मध्ये इंस्टाग्रामने दस्तक दिली.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.