जगातल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा नंबर पाचवा नंबर आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी अलीकडे त्यांच्या एका नव्या टार्गेटची घोषणा केली. येत्या काळाला जगातील पहिल्या 3 मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची नाव येण्यार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता पाचव्या नंबरवर असलेला भारत तिसऱ्या नंबरवर खरंच येऊ शकेल का? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे भारत तिसऱ्या नंबर आला? तर भारतातल्या त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार का?
सर्वसामान्य भारतीय श्रीमंत होणार का? चला तर जाणून घेऊया… 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी काही काळापूर्वी सुरू झाली आहे. सत्ताधारी विरोधक दोघांनी आपल्या आघाड्या उघडून शड्डू ठोकले आहे. यांच्या राजकीय जुगलबंदीकडे आपलं लक्ष असतंच. पण आपल्यासाठी सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे अर्थव्यवस्था श्रीमंत झाली म्हणजे आपणही श्रीमंत होणार का?
पंतप्रधानांनी दावा केलाय? जगातल्या पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल. पण सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की, ही आकडेवारी नेमकी कशी ठरते? तर जीडीपीच्या वाढीच्या दरावर. कारण 2014 ते 2023 दरम्यान भारताच्या जीडीपीमध्ये एकूण 83 टक्के वाढ झाली. जीडीपी म्हणजे एका वर्षात एका देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा यांच्या एकूण मूल्य होय. समजा तुम्ही शेती करता एका वर्षात तुमच्या शेतीचा बाजार मूल्य 10 लाख रुपये झाले म्हणजे तुमचा जीडीपी 10 लाख आहे.
आता या तुमच्या मुल्यांमध्ये जर 1 लाख रुपये वाढ झाली तर दहा टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, भारताचा जीडीपी 83 टक्क्यांनी वाढला असला तरी अनेक लोक म्हणतील की, आमचा पगार आणि आमचा खर्च यांची सांगड ती तशीच आहे. तसेच अजुनही आमची आर्थिक स्थिती सुधारली नाही.
कारण देशाची अर्थव्यवस्था वाढणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्या वाढलेल्या उत्पन्नाचा वाटप आणि वितरण कसे आहे. हे अत्यंत आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती मोजण्याचे माप म्हणजे दरडोई उत्पन्न होय. यासाठी जीडीपीचा आकडा घेऊया आणि त्याला देशाच्या एकूण लोकसंख्येच्या भागून म्हणजे तुम्हाला देशातल्या सर्व एका वर्षात सरासरी उत्पन्न मिळेल. याला दरडोई उत्पन्न म्हणायचं.
पण या सरासरीत अदानी, अंबानी सारख्या गडगंज लोकांपासून ते तुमच्या माझ्यासारखे पगारदार, हातावर पोट असणारे मोलमजुरी करणारे लोक आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचे काहीच साधन नाही असे सगळे येतात, केवढी ही विषमता. जीडीपीच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. मात्र, दरडोई उत्पन्न बाबतीत भारताचे स्थान जगातल्या पहिल्या शंभर देशांमध्येसुद्धा नाही.
पहिल कारण आपली मोठी लोकसंख्या आणि दुसरे कारण संपत्तीचे असमान वाटप. कारण भारतातल्या एक टक्के लोकांकडे देशातील 40 टक्के संपत्ती एकवटली आहे. जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थची यादी काढली तर त्यात अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत हे तुम्हाला दिसतील. पण दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर काय? सगळे चित्र बदलून जात. काही देश हे मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 20 व्या आणि 72 व्या स्थानावर आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न अमेरिकेपेक्षा सुद्धा खूप जास्त आहे.
भारताची अर्थव्यस्था पाचव्या क्रमांकावर ब्राझीलची दहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, तिथले दरडोई उत्पन्न भारतापेक्षा चौपट आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा कार्याबरोबरच सर्वसामान्य लोकांचे उत्पन्न वाढण राष्ट्रीय प्रगतीचा रूपांतर वैयक्तिक आर्थिक विकासातून हेदेखील महत्त्वाचे आहे. आर्थिक विश्लेषक म्हणतात की, भारत एकीकडे भारत जगातील तिसरी अव्वल अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय.
आर्थिक कार्यक्षेत्र वाढतील याचा लोकांना फायदा होईल. परंतु सामान्य लोकांच्या जीवनात आणि त्यांच्या आर्थिक सुबत्तमध्ये फरक पडण्याची शक्यता नाही. या सगळ्यावर ना तिकडे राजकारणात सुद्धा जोरदार फटकेबाजी सुरू आहे. कारण काँग्रेस म्हणतात की, भारत तिसऱ्या स्थानी येईल या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी आधीच सांगून ठेवले. त्यामुळे यात मोदींचा काहीही श्रेय नाही.