नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे? आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता कधी मिळेल? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला आहे.
त्यामुळे राज्यभरात सगळीकडे शेतकरी वर्गात एकच चर्चा सुरू होती ती म्हणजे राज्य सरकारच्या नमो शेतकरी मान सन्मान योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता कधी त्यांच्या खात्यात जमा होईल. याची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल ? आणि शेतकऱ्यांना पहिला हप्ता कधी मिळेल? याची सविस्तर माहिती..
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देतात तर चार महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपये रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार नमो शेतकरी मान सन्मान निधी योजना जाहीर केली होती व राज्य सरकारला सांगितलं होतं की,
केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांमध्ये राज्य सरकार सुद्धा 6 हजार ऍड करतील आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्ष एकूण 12 हजार रुपये मिळतील. पण नेमकी या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल? याविषयी काही स्पष्ट सांगितले नव्हते. दरम्यान आताच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारना नमो शेतकरी मान सन्मान योजनेसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली.
सध्या राज्यभरातल्या 87 लाख शेतकरीना फायदा होईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने 28 जुलै 2023 रोजी एक शासन निर्णय काढला आहे. त्या राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.
याचबरोबर याशिवाय या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर स्वतंत्र आज्ञावली विकसित करण्यात येईल असं सुद्धा या शासन निर्णयात नमूद केले आहे. पण नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल आणि शेतकऱ्यांना पहिला हप्ता कधी मिळेल, याविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले मत व्यक्त केले.
यामध्ये cm एकनाथ शिंदे म्हणतात की, आम्ही राज्य सरकारने नमो सन्मान शेतकरी योजना देखील या वर्षापासून सुरू केलेली आहे आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये कार्यक्रम सुरू होईल. दरम्यान कृषी विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य स्तरावर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे आणि जवळपास महिन्यात सगळी प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.