इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळवीर चंद्रावर मंगळावरचे पाठवण्याचे मोहिमेची तयारी करते हे आपल्याला माहिती आहे. पण यासाठी एक प्रकारची रंगीत तालीम म्हणजे भारतात लडाखमध्ये प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. भारताचं पहिलं स्पेस मिशन सुरू करत असल्याचे जाहीर केले. भविष्यातल्या अंतरालसाठीची पृथ्वीवरती करण्यात येणारी ही तयारी असते. तर काय करतात या स्पेस मिशनमध्ये? यासाठी लडाखची का निवड करण्यात आली? चला तर मग समजून घेऊया..
दोन ग्रहांच्या प्रवासादरम्यानची परिस्थिती या मिशनमध्ये निर्माण करण्यात येईल आणि पृथ्वीशिवाय दुसऱ्या बेसवरती असताना कोणत्या अडचणी येतात? त्यांचा सामना कसा करायचा? याचा अभ्यास या द्वारे करण्यात येईल. नजीकच्या भविष्यात या पुढच्या काही काळामध्ये लघुग्रह, मंगळ किंवा चंद्रावरती जाणाऱ्या मोहिमांसाठीची पूर्वतयारी या अनलॉक स्पेस मिशन द्वारे करण्यात येते असे नासाने म्हटले आहे. या अनलॉक स्पेस मिशनसाठी साधारण अशी जागा निवडली जाते यामध्ये मंगळ किंवा चंद्राच्या भूभागासारखं साधर्म्य आहे आणि वातावरण देखील तशाच प्रकारचं इतर भागांपेक्षा अगदी वेगळ आहे.
अश्या खडतर परिस्थितीमधे मोजक्या यंत्रणेसह मोठ्या साहित्यासह आणि इतर सर्वांपेक्षा वेगळे म्हणजे राहत असताना कोणत्या अडचणी येऊ शकतात? याला कोणत्या प्रकारे तोंड दिलं जाऊ शकतं? या सगळ्याचा अभ्यास या प्रकारच्या मिशनमध्ये केला जातो. अंतराळामध्ये सगळे प्रयोग करून पाहण्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यात प्रचंड वेळ, मनुष्यबळ, साधन सामुग्री खर्ची पडते या चाचण्या पृथ्वीवरती उभारलेल्या स्पेस मिशनमध्ये करून पाहिल्या जातात. त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर तोडगा शोधला जातो, अशा प्रकारे प्रयोग किंवा चाचण्या करणं हे परवडणार आणि मुख्य म्हणजे कमी वेळ घेणार असतं.
नवीन तंत्रज्ञान, रोबोटिक उपकरणं, परग्रहावर ते वापरायची यंत्र किंवा वाहन एखाद्या दुसऱ्या ग्रहावर राहण्यासाठी इथे उभारायचा अधिवास, तिथे लागणारी संपर्क यंत्रणा, पायाभूत सुविधा या सगळ्याचा अभ्यास अशा प्रयोगातून करण्यात येतो. शिवाय पृथ्वीपासून दूर वरती एका नव्या ग्रहावर ती एकटे राहिल्याने मर्यादित जागेत राहिल्याने किंवा वावरल्याने सगळ्या मानवी शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतात? याचा देखील अभ्यास या मोहोमेत करण्यात येतो.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, टीम म्हणून काम करताना या सगळ्या गोष्टींचा परिणाम कसा होतो? तेच तेच खाऊन कंटाळा येतो का? अशा गोष्टी देखील तपासले जातात. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाणाऱ्या, चंद्रावर उतरणार्या, पृथ्वीच्या कक्षेत दीर्घ काळ राहून प्रदक्षिणा घालणारा मोहिमांसाठी नासाने अशाप्रकारे अनलॉक स्पेस मिशन राबवली होती.
इस्रो सध्या मंगळ आणि चंद्रावर जाणाऱ्या मोहिमांची गगन या विषयाची तयारी करत आहे. लडाखची खडतर आणि भौगोलिक परिस्थिती आणि ते खटाटोपाचा हवामान लक्षात घेता यांची निवड या विषयांसाठी करण्यात आल्याचा तज्ञांचे म्हणणे आहे. लडाखच वातावरण, समुद्रसपाटीपासून या भूभागाचा तीन हजार मीटर उंचीवर, मैलोन् मैल शुष्क जमीन, वातावरणातला कमी ऑक्सिजन या सगळ्या गोष्टी मंगळ आणि चंद्रावरच्या परिस्थिती सारखे आहेत.
तसेच याठिकाणीच हवामान एखाद्या वाळवंटासारखा आणि त्याच वेळी थंड प्रदेशातसारखा देखील आहे. तापमान 35 डिग्रीपर्यंत चढत तर थंडीमध्ये तेवढे -35 पर्यंत खाली घसरत. इतक्या दुर्गम भागांमध्ये येणाऱ्या समस्या या अंतराळवीरांना पृथ्वीपासून दूर वर येणाऱ्या समस्या कशी मिळते जुळते असते आणि यामुळे या सिमुलेशन साठी लेहची निवड करण्यात आली आहे.
या मोहिमेत उभारलेल्या तळात हायड्रोपोनिक्स स्वयंपाक घर आणि टॉयलेट असतील आणि हा तळ स्वयंपूर्ण म्हणजे आकाशवाणीने दिलेल्या बातमीत सांगितले आहे. या प्रयोगात मिळणारी माहिती ही भारतीय अवकाश संस्थेच्या चंद्र-मंगळ आणि इतर मोहिमांसाठी अतिशय उपयोगाचे असणार आहे.