मामलेदार कचेरी कायदा : एखाद्याने तुमच्या घराकडे जाणारा एकमेव रस्ता अडवला तर काय पर्याय आहे?

Infomative

आज आपण इथे बघणार आहोत की, तुमचं जिथे घर आहे आणि त्या घराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो जर समजा एखाद्याच्या जागेतून जात असेल, एखाद्याच्या ओपन फ्लॅाटमधून जात असेल, एखाद्याच्या शेत जमिनीतून वगैरे जात असेल आणि तो तुमच्या घरात पोहोचण्यासाठीचा एकमेव पर्यायी रस्ता आहे. अजून दुसरीकडून कुठूनही तुमच्या घराकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही आहे आणि जर हा एकमेव पर्यायी रस्ता एखाद्याने अडवला आणि तुमचं घरी जाणं बंद केलं. अशी जर घटना घडली तर तुम्हाला काय करता येईल? आपल्याकडे काही पर्याय आहे का?

बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की, माझं घर अशा ठिकाणी आहे की जिथे जाण्यासाठी दुसऱ्याच्या जमिनीतून जावं लागतं आणि तो ज्याच्या जमिनीतून जातो तो बरेचदा त्रास देतो. तर या केस मध्ये आपण काय करू शकतो? या केससाठी आपल्याकडे कायदेशीर तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे की जर तुमची मालकी हक्काची जमीन कुठेतरी असेल आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला एकमेव रस्ता असेल आणि तो जर दुसऱ्या माणसाच्या जमिनीतून जाणारा असेल तर इथे तुमचा राईट काय बनतो की जर पर्याय रस्ता नसेल आणि एखाद्याच्या जमिनीतून जाणे हे तुम्हाला अपरिहार्य असेल तर अशावेळी आपल्याकडे एक कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे, “मामलेदार कचेरी कायदा”.

या कायद्यामध्ये यासंबंधी “section 5” मध्ये माहिती दिलेली आहे. या सेक्शन मध्ये सांगितला आहे की जर एखाद्या माणसाला आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी एकमेव रस्ता असेल आणि तोच एकमेव रस्ता जर दुसऱ्या कोणाच्यातरी जमिनीतून घराचा अंगणातून वगैरे जात असेल तर तिथून तो रस्ता कायदेशीर रित्या त्या माणसाच्या जाण्यासाठी कायमची सोय म्हणून तहसीलदाराने ऑर्डर पास करून तिथून कायम त्याला जाता यावं अशा पद्धतीची सोय लावून देण्यात यावी.

अशी पावर section 5, मामलेदार कचेरी कायदा यामध्ये दिलेली आहे. या संबंधित तुम्ही मामलेदार कचेरीत जाऊन section 5 संबंधित अर्ज करून तशी माहिती तहसीलदाराला सांगू शकता. यावर तहसीलदार दुसऱ्या दिवशी त्या माणसाला जो तुमचा रस्ता अडवतो त्याला नोटीस पाठवून तहसील ऑफिसला बोलून घेईल आणि त्याला विचारेल त्याचं जे काही म्हणणं आहे ते लिखित लिहून देईन आणि हे सगळं एकदा झालं की दोन ते तीन दिवसाच्या आत तहसीलदार स्वतः साईट विजिट करून किंवा आपला प्रतिनिधी पाठवून इन्स्पेक्शन करून त्याचा घरी जायला खरंच पर्यायी रस्ता दुसरा कोणता नाही आहे का? आणि त्यांना खरंच जर असं आढळलं की कोणताच दुसरा पर्यायी रस्ता नाहीये तर ते दहा दिवसांच्या आत मध्ये तुमच्या फेवर मध्ये ऑर्डर काढून तो रस्ता जो दुसऱ्यांच्या अंगणातून शेतातून घरासमोरून जातो तो रस्ता तुम्हाला कायमस्वरूपी कायदेशीर रित्या जाण्यासाठी रजिस्टर करून देईल.

यामध्ये महत्त्वाचा भाग असा की या ऑर्डरला चॅलेंज करता येत नाही. कारण तुमच्या घरात जाण्यासाठी तुम्हाला एकमेव पर्याय रस्ता असेल आणि तो दुसऱ्याच्या जमिनीतून जमिनीतून देणे हा तुमचा फंडामेंटल राईट आहे आणि हा फंडामेंटल राईट कमी करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही माणसाला इतकाव करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे एखाद्याच्या जमिनीतून जर तुमचा रस्ता जात असेल तर तुम्ही तहसीलदाराकडे सेक्शन पाच अंतर्गत अर्ज दाखल करून तो अधिकार किंवा तशी ऑर्डर काढू शकता आणि तुम्हाला तशी कायमची सोय लावून देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *