काय आहे ChatGPT? याच्यामुळे नोकऱ्या जाणार?

Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

100 मिलियन युजर चा टप्पा गाठायला फेसबुकला चार वर्षे लागले होते, स्नॅपचॅट ला तीन वर्षे लागले होते, इंस्टाग्राम ला दोन वर्ष लागले होते आणि गुगल ला एक वर्ष लागलं होतं 100 मिलियन युजरचा टप्पा गाठायला. आता हे आपण का बघतोय तर चॅट जीपीटी जे सध्या खूपच पॉप्युलर आहे, या चॅट जीपीटीने लॉन्चिंग पासून अवघ्या तीन महिन्यांमध्ये 100 मिलियन युजरचा टप्पा गाठलेला आहे.

आता हे जे चॅट जीपीटी आहे याचा फुल फॉर्म आहे, जनरेटिव्ह प्री ट्रेड ट्रान्सफॉर्मर (Chat Generative Pre-trained Transformer) असा हा फुल फॉर्म आहे. हे चॅट जीपीटी जे आहे ते काय करू शकत तर हे तुमच्या सोबत संवाद साधू शकतो, हे एखादी गोष्ट सांगू शकतो, कथा सांगू शकतो, यासोबतच संगीत रचना सुद्धा करू शकत.

थोडक्यात काय येणाऱ्या काळामध्ये चॅट जीपीटी मुळे खूप सार्‍या गोष्टी ज्या आहेत या सोप्या होऊ शकतात आणि हे चॅट जीपीटी माणसांची जागा घेऊन नोकऱ्या सुद्धा कमी करू शकत असं बोललं जाते. आज आपण सविस्तर मध्ये माहिती घेऊ या चॅट जीपीटीची, हे नेमकं कसं काम करत हे जाणून घेऊयात, तसंच या चॅट जीपीटी मुळे जे काही नोकऱ्या कमी होतील असं म्हटलं जाते याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

सुरुवातीलाच एक फॅक्ट बघा, ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे Open AI या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. चॅट जीपीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैम अल्टमन आणि अलोन मस्क यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. आता एलोन मस्क हे कंपनीमध्ये नाहीयेत पण सैम अल्टमन हे या कंपनी चे CEO आहेत.

आता बघा माहिती जर का मिळवायची असेल तर आपण अगोदर पुस्तक व न्युज पेपर याचा रेफरन्स घ्यायचो त्याचा आधार घ्यायचो. नंतरच्या काळामध्ये न्यूज चॅनल आले आणि मग इंटरनेट वरती आपण आपल्याला हवी ती सगळी माहिती सर्च करायला लागलो. थोडक्यात जनरल नॉलेज मिळवायचं जर का असेल तर गुगल हा एकमेव पर्याय होता. गुगल हेच सर्च इंजिन आपण वापरत होतो. मी सांगितल्या प्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून मोकळेबाज उत्तर देण्याच काम चॅटबोट करत आहेच.

म्हणजे गेले सात-आठ वर्ष झालं आपण चॅटबोट वापरतोय म्हणजे एखाद्या वेबसाईट वरती गेलं तर ते चॅट बोट येतं, हाय म्हणत, हाऊ आर यू म्हणत, मग आपण त्याच्यावरती एखादी आपली समस्या जी आहे ती टाईप करतो किंवा आपल्याला कोणती सर्विस हवी असेल ते आपण त्याच्यावरती टाईप करतो आणि त्याची उत्तरं ते आपल्याला देत असतं. हा चॅटबोटचा वापर जो आहे हा दिवसेंदिवस वाढत गेलेलाच आपल्याला दिसतोय. पण जर का आपण एखादा अवघड प्रश्न विचारला किंवा वेडावाकडा प्रश्न विचारला तर चॅट बोटला त्याच उत्तर देता येत नव्हतं किंवा समाधानकारक उत्तर देता येत नव्हतं.

आता या चॅटबॉक्सच विकसित रूप म्हणजे चॅट जीपीटी. आता हे हाऊ आर यू , हाऊ मे आय हेल्प यू याच्या पलीकडे जाऊन विचारपूर्वक प्रश्न विचारत सुद्धा आणि विचारपूर्वक त्याची उत्तरं देत सुद्धा. म्हणजेच काय चाट जीपीटी मध्ये कल्पकतेचा वापर करून कॉन्व्हर्सेशन करण्याचं तंत्रज्ञान आहे. हे चॅट तुमच्या संभाषणामधील त्रुटी ओळखत, त्या दुरुस्त करतं आणि अपेक्षित उत्तर सुद्धा देत आणि जर का कोणी उगाच खोडिल प्रश्न विचारला तर ते तसं सुद्धा सांगत. खूप जणांनी चॅट जीपीटी चा अनुभव घेतला असेल किंवा ते सगळ्यांनी वापरून बघितलेलं असेल. हे स्क्रिप्ट लिहू शकत, हे एक गोष्ट लिहू शकते, निबंध लिहू शकते, डायलॉग सुद्धा लिहिले जातात, अगदी किचकट गणित आहे ती त्याच्यावरती सोडवता येत आहेत आणि कोडींग सुद्धा करता येते.

डिसेंबर मध्ये लॉंच झालेलं हे चॅट जीपीटी अगदी थोड्याच अवधीमध्ये लोकप्रिय झालं आणि तीन महिन्यात शंभर मिलियन युजरचा टप्पा गाठला सुद्धा! आपल्याला जर का एखादा अवघड प्रश्न विचारला तर आपण सरळ सरळ उत्तर देतो यार कुठे डोक्याला त्रास करून घेतो, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी हा त्रास घेण्याचे काम चॅट जीपीटी करणार असं म्हणलं जाते.

आता याच तंत्रज्ञान कसं काम करत तेही पाहू. सर्वप्रथम हे तंत्रज्ञान माणसाने विकसित केलेल आहे. याच्यामुळे गोष्टी नक्कीच सोप्या होतील किंवा सुलभ होतील पण माणसाला रिप्लेस नाही करता येणार असं सुद्धा तज्ञ सांगताना दिसतायत. Chat GPT हे Open AI या तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर इन्फॉर्मेशन आणि ह्युमन रिएक्शन्स या सगळ्यांची जोड मिळून हे चॅट जीपीटी तयार झालेले आहेत. आता हे कसं शक्य झालं तर विविध विषयातील तज्ञ प्रशिक्षक यांची याच्यासाठी मदत घेण्यात आलेली आहे.

मग टेक्नॉलॉजी प्लस तज्ञ यांच्याद्वारे टेस्टिंग करून इव्हॅल्युएशन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये गुणात्मक करण्यात आली आणि चॅट जीपीटी हे आजच्या रूपामध्ये आपल्यासमोर आपल्याला दिसते आहे. चॅट बोट, तज्ञ, व evaluation या सगळ्यांची एकत्रित बेरीज जर का आपण केली तर आजच्या दिवशीचे चाट जीपीटी चे इव्होल्यूशन झालेल आपल्याला दिसून येईल. चॅट जीपीटी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याचा वापर केला जातो आणि त्याद्वारे ते आपल्या सोबत संवाद सुद्धा साधते. चॅट बोट आपण गेल्या सात आठ वर्षांपासून वापरतोय.

सध्या 190 देशांमध्ये जवळपास 100 कोटी लोक चॅटबोटचा वापर करतात, पण ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला उपलब्ध आहे, एखाद्या वेबसाईट वरती गेलो तर लगेच त्याचा पॉपअप येतो त्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. पण चॅट जीपीटी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फ्री दिला गेला पण आता चॅट जीपीटीच प्लस वर्जन वापरायचं असेल तर २० डॉलर प्रति महिना इतक शुल्क ते आकारणार आहेत आणि या मागचं कारण सुद्धा तसंच आहे. तीन महिन्यात 100 मिलियन युजर्स याच्यावरती आले. अपेक्षा पेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यावरती लोड वाढत गेला ज्याच्यामुळे हा मंथली सबस्क्रीप्शन प्लॅन आलेला आहे असे या विषयातले जाणकार सांगतात.

चॅट जीपीटी मुळे संगीत, लेखन, कोडींग, गणित याच्यामध्ये क्रांती होऊ शकते असा दावा जरी केला जात असला तरी सुद्धा जितकं कौतुक केलं जाते तितकं ते वर्थ आहे का हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चॅट जीपिटी सर्जनशील किंवा क्रिएटिव्ह आहे का? तर तसं बिलकुल नाही. जी काही आगोदर इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये फीड केलेली आहे, जे काही प्रतिसाद नोंदवले गेलेले आहेत किंवा वेगवेगळी माहिती जी काही आपण इंटरनेटच्या माध्यमातून शेअर केलेली आहे त्याच्या वरतीच ते काम करत. त्याच्यामुळे त्याला ओरिजनल म्हणता येणार नाही.

चॅट जीपीटी मध्ये अगदी लेटेस्ट किंवा रियल टाईम डेटा बिलकुल नाहीये. त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं एप्रिल 2021 पर्यंतचा डेटा आहे. काय काय जण असेही म्हणतात की 2022 मधील काही लिमिटेड इन्फॉर्मेशनच त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच काय हा सगळा खेळ डेटाचा आहे. जसं जसं आपण त्याचा वापर करत जाणार, जसं जसं आपण त्याला वेगवेगळे प्रश्न विचारणार, जशी वेगवेगळी माहिती त्या जीपीटी मध्ये येत जाणार, तसं तसं ते स्वतःला अपग्रेड करत राहणार आहे.

आज वरच्या उपलब्ध आणि स्टोर डेटा वरती आजच्या दिवशीचा चॅट जीपीटी अवलंबून आहे आणि हेच त्याचा सगळ्यात महत्त्वाचं लिमिटेशन आहे. जसजसं वापर वाढेल तसं ते स्मार्ट होईल आणि अपडेट होईल असं तज्ञ सांगतात. सध्याच्या चॅट जीपीटी पॉप्युलर आहे कारण की ते नवीन आहे म्हणून, म्हणजे इंटरेस्ट असतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नवीन काहीतरी वापरण्याचा. नंतर नंतर बोर होईल का? तर ते आपण आजच्या दिवशी सांगू नाही शकणार, पण सोशल मीडियाचा अनुभव आपण घेतलेला आहे. आपण जे सर्च करणार आपण जी काही माहिती शेअर करणार तितकंच चॅट जीपीटी अजून सुधारत जाणार. चॅट जीपिटी सल्ला सुद्धा देत, खूप जणांनी तो अनुभव सुद्धा घेतलेला असेल. पण ते सल्ला कोणता देतोय जी माहिती त्याच्यामध्ये स्टोअर केलेली आहे किंवा जी काही माहिती त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे त्याचाच ते सल्ला देत.

चॅट जीपिटी ला लिमिटेशन्स आहेत का? तर नक्कीच लिमिटेशन्स आहेत. आता जर का तुम्ही असा प्रश्न विचारला की एकनाथ शिंदे कोण आहेत तर ते एकनाथ शिंदे यांची सर्व काही माहिती नक्कीच देऊ शकत पण एकनाथ शिंदे बंड करतील का असं जर का प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर ते देऊ नाही शकणार.

या सोबतच काल परवा जो तुर्कीमध्ये भूकंप झाला याच्याविषयीची ते माहिती देऊ शकेल, भूकंप कसा होतो याची माहिती देऊ शकेल, प्लेट टेक्टोनिक्स वगैरे हे सर्व काही ते समजवून सांगू शकेल, पण येणाऱ्या काळामध्ये कुठे भूकंप होणार हे ते नक्कीच सांगू नाही शकणार. यासोबतच जर का तुम्ही त्याच्यावरती असं सर्च करण्याचा प्रयत्न केला की सध्या मायक्रोसॉफ्ट च्या स्टॉक ची किंमत काय आहे तर त्याचही उत्तर त्याला देता येणार नाही.

यासोबतच तुम्ही जर का एखाद्या वेबसाईटची URL तेथे टाकली आणि can you read this असं विचारलं तर तेही त्याला करता येणार नाही कारण की ते आजच्या दिवशीच त्याच लीमिटेशन आहे. हे समजून घ्या की सर्च इंजिन ही वेगळी गोष्ट आहे आणि चॅट जीपीटी ही वेगळी गोष्ट आहे. रियल टाईम डेटा साठी सध्या तरी सर्च इंजिन वरती सर्वजण अवलंबून असणार आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये चॅट जीपिटी अजून किती स्मार्ट होईल आणि नेमक्या कोणकोणत्या प्रश्नांची उत्तर देईल हे आपल्याला समजेलच.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *