नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मागेल त्याला गाळ दिला जाणार आहे. हा गाळ तुमच्या शेजारील धारणामधून तुम्हाला मिळेल. यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. नक्की कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे ती संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सर्वात प्रथम तुम्हाला wcdmh.mahaonline.gov.in या वेबसाईट वर जायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे, नवीन युजर येथे नोंदणी करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसतील. पहिला आहे शेतकरी, शेतकरी असाल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा. जर अशासकीय संस्था असेल तर तो ऑप्शन सिलेक्ट करा. आणि तिसरा जर तुम्ही ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत सिलेक्ट करा. असे तीन ऑप्शन आहेत.
आता आपण शेतकऱ्यांचे पाहणार आहे. सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी नोंदणी करूया, त्यानंतर शेतकरी सिलेक्ट करूया, त्यानंतर जेंडर निवडायचे पुरुष का स्त्री आहात ते निवडल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव, त्यानंतर आडनाव टाकायचे आहे. आधार कार्ड वरती जसं आहे तसे टाकावे.
पुढे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सातबारा जोडायचा आहे, एक सातबारा असेल तर एक जोडा दोन तीन सात बारा असतील तर पीडीएफ फाईल मध्ये 200 kb च्या आत मध्ये जोडायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता म्हणजे जिथे जमीन असेल तिथला पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जिल्हा विचारला जाईल, ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे त्या ठिकाणचा जिल्हा टाकायचा. त्यानंतर जो काही तुमचा तालुका आहे तो येथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुमचे गाव सिलेक्ट करायचे आहे.
त्यानंतर पुढे तुम्हाला युजर आयडी विचारला जाईल, इथे तुम्हाला एक युजर आयडी तयार करायचा आहे, त्यानंतर पासवर्ड बनवायचा आहे. खाली कॅपचा दिला जाईल तो बॉक्समध्ये जसा आहे तसे टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्या नंतर User created successfully असा मेसेज दिसेल, त्याला ओके करायचे आहे. ओके केल्या नंतर आता तुम्हाला युजर आयडी जो बनवला होता तो युजर आयडी टाकायचे त्यानंतर जो पासवर्ड बनवला होता तो टाकून लॉगिन करायच आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला होमपेज दिसेल.
लेफ्ट साईडला तुम्हाला एक ऑप्शन येईल, गाळमुक्त तलाव त्या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. गाळमुक्त तलावा वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराचा तपशील दिसेल. ही पहिली स्टेप तुमची कम्प्लीट झाली आहे. आता खाली दुसरी स्टेप म्हणजे शेतीचा तपशील तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता सर्वात प्रथम तुम्हाला सर्वे क्रमांक म्हणजे गट नंबर जो काही भूमापक क्रमांक आहे तो गट नंबर येथे टाकायचा आहे.
त्यानंतर क्षेत्रफळ टाकायचे आहे. क्षेत्रफळ टाकताना लक्षात ठेवायचे एक दोन तीन चार असं हेक्टर मध्ये टाका. झिरो पॉईंट मध्ये टाकू नका. हेक्टर मध्ये एक दोन तीन असे टाका तरच तुमचा अर्ज सबमिट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला किती गाळ हवा आहे तो तुम्हाला घनमीटर मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर खाली तिसरा बॉक्स आहे ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव अशा पद्धतीने निवडायचे आहे आणि तुमच्या शेजारी जे उपलब्ध धरण आहे ते निवडायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला इंधनाचा खर्च पाहिजे का? तुम्हाला पाहिजे असेल तर होय करा नसेल पाहिजे तर नाही ऑप्शन वरती क्लिक करा. खर्च पाहिजे असेल तर होय करून तुम्हाला पाच नंबरला तुमच बँकेचं नाव टाकायचे, त्यानंतर शाखा आणि आयएफसी कोड टाकून खाते नंबर टाकून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अर्ज सबमिट करताना अर्ज जतन करू इच्छिता तर सेव बटणावरती क्लिक करायचं आहे. तुमचा अशा पद्धतीने अर्ज सबमिट होणार आहे.
लक्षात ठेवा हा अर्ज केव्हा तेव्हाच सबमिट होईल जेव्हा तुम्ही क्षेत्रफळ एक दोन तीन हेक्टर अशा पद्धतीने टाकाल, लक्षात ठेवा पॉईंट मध्ये टाकू नका. तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे. आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ओके करायचे आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला २३ रुपये पेमेंट करायचे आहे त्यासाठी कन्फर्म करायचे. कन्फर्म केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन बरेच दिसतील.
वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, IMPS, UPI यातील तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्यावरून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर पेमेंट ची रीसिट प्रिंट किंवा डाउनलोड सुद्धा करू शकता. तुमचा फॉर्म येथे सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. आता तुमचा जो काही फॉर्म भरलेला आहे त्याची तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर पुन्हा तुम्हाला मुख्य पृष्ठा वरती यायचं आहे.
इथे view application चा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमची सगळी माहिती डाऊनलोड होते. अशा पद्धतीने ही रिसिप्ट तुम्हाला भेटून जाईल. हे डाउनलोड करून ठेवा आणि फ्युचर मध्ये तुम्हाला लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता. आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की ही माहिती पोहोचवा.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.