अगदी पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत मंगळ मोहीम एखाद्या विज्ञान कथेत असणारी गोष्ट होती. पण संशोधक आता मंगळावर फक्त जाण्याची नाही तर तिथे राहायची तयारी करत आहे. गेलं एक वर्षभर नासाचे शास्त्रज्ञ मंगळावर राहण्याचा सराव करत होते, पण त्यासाठी ते मंगळावर गेले नाहीत, तर त्यांनी मंगळ ग्रहाच इथे 3D प्रिंटिंग करून आणला. मग या 3D प्रिंटिंग करून मंगळावर राहून संशोधकांनी वर्षभर काय केलं? चला तर मग जाणून घेऊ..
वर्षभर सुरू असलेल्या हे नासा मार्श मिशन हे 6 जुलैच्या शनिवारी पूर्ण झालं. मंगळावर आयुष्य कसं असेल? तिथे काय होऊ शकत? कोणत्या अडचणी येऊ शकतात? हे सगळं जाणून घेण्यासाठीची ही मोहीम होती. नासाने एका शहरातील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये मंगळ ग्रहा सारखाच वातावरण आणि भुभाग असणारी सुविधा म्हणजे कृत्रिम मंगळ ग्रह तयार केला. 25 जून 2023 ला नासाची 4 सदस्यांची टीम या ठिकाणी दाखल झाली.
या चौघांनी प्रवेश केल्यानंतर सतराशे चौरस फुटांची जागा बंद करण्यात आली आणि हे चार शास्त्रज्ञ येथे तब्बल 378 दिवस राहिले.
3D प्रिंटिंगने तयार करण्यात आलेल्या एक कृत्रिम मंगल आदिवासामध्ये 4 बेडरूम, 1 लिविंग कम डायनिंग एरिया आणि 1 मेडिकल रूम आणि काम करण्यासाठी मोठी जागा होती. मग या जागेमध्ये वर्टीकल फार्मिंग करायला वाव होता जिथे या टीमने टोमॅटो उगवले.
या वर्षभरात यांनी वेगवेगळे प्रयोग केले. जर भविष्यात जर मंगळ मोहीम प्रत्यक्षात राबवली गेली तर मंगळ ग्रहावर आयुष्य कसं असेल? कोणत्या गोष्टीवर कसला परिणाम होईल? जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. मंगळावर चालण्याचा पर्यत सुद्धा यावेळी केला. शिवाय पृथ्वी सोबतचा संपर्क तुटला आहे, काही कारणांमुळे त्यासाठी वेळ लागला तर काय करायच? कठीण परिस्थितीत एखादा यंत्रातील बिघाड कसा दुरुस्त करायचा? याचा अनुभव घेतला.
चार वैज्ञानिक या कृत्रिम मंगळावरच्या अधिवासात असताना इतर संशोधक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांना ठराविक काळासाठीची काम देत होते आणि त्यांच्याकडून मिळत होते. या सगळ्या बरोबरच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा काय परिणाम होतो? याचा अभ्यास केला गेला.
या प्रयोगासाठी तयार करण्यात आलेला अधिवासात 3D प्रिंटिंग होता. कारण पृथ्वीवरून मंगळावर राहायला जायचं असेल तर थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने गोष्टी उभारता येते. अंतराळवीर लाखो किलोमीटर प्रवासात बांधकाम साहित्य बरोबर घेऊ शकणार नाहीत. मंगळ ग्रहावर वातावरण जगण्यासाठी अत्यंत अवघड असेल, म्हणूनच मंगळावरच्या वातावरणाशी शक्य तितकं साधर्म्य असणारा शक्य तितकं प्रयत्न केला गेला. मंगळावर माणसांसाठी काय प्रॉब्लेम उभे राहतील, याची कल्पना करून तशी तयारी केली गेली.
अंतराळात टिकू शकेल असं अन्न या संशोधकांनी खाल्लं. त्यांनी आपल्या अधिवासात काही गोष्टी पिकवण्याचा प्रयत्न केला. मंगळ पृथ्वीमध्ये 255. 80 दशलक्ष किलोमीटरचा अंतर आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात मंगळावर मानवी समूह गेलात तर त्यांना या दोन ग्रहांमधील या संपर्कासाठी मोठ्या काळाचा आणि कम्युनिकेशन दिलेयचा सामना करावा लागेल.
कारण पृथ्वीवर हा पाठवलेला कोणताही संदेश मंगळावर पोहचण्यासाठी साधारणता 22 मिनिटांचा काळ लागतो, म्हणजे समजा मंगळावर हा प्रश्न विचारला तर उत्तर येण्यासाठी साधारणपणे पाऊण तास लागू शकतो. त्यांनी याचाही सराव केला. कारण आणीबाणीच्या स्थितीत कृला पृथ्वीवर उत्तर येण्याची वाट पाहता येणार नाही. स्वतः काही गोष्टी कराव्या लागतील.
या प्रयोगातील मिळणाऱ्या माहितीचा फायदा मंगळावर जाणार्या मानवी मोहिमांसाठी होईल. त्यासाठीचं नवीन तंत्रज्ञान विकसित करता येईल. पण पृथ्वी ते मंगळ या प्रवासातील धोका पाहता, मुळात मंगळावर मानवी मोहीम पाठवण्याची गरज आहे का? असा सवाल टीकाकार करत आहेत. भविष्यात जर बहुतेक प्रयोग रोबोटद्वारे कळविले जाणार असेल, तर त्यामध्ये आयुष्याला धोका नसेल आणि मोहिमांचा खर्चही कमी असेल असं असताना मग मानवी वसाहतीची तयारी का? असे त्यांचे म्हणणे आहे.