तुम्हाला माहीत आहे का ढगांमद्धे वीज कशी तय्यार होते? ती जमिनीवर कशी येते? जाणून घ्या विज्ञानाची रंजक माहिती सोप्या भाषेत.

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

पावसाळ्यात बर्‍याच वेळा आपल्याला आकाशात विजा चमकताना दिसतात. त्या विजा बघून आपल्या मनात एकच प्रश्न येतो की ढगांमध्ये असं काय आहे ज्यामुळे या विजा चमकतात? जोरात लाईटनिंग देखील होते? जोरात आवाज पण येतो? जमिनीवर जर ही वीज पडली तर खूप नुकसान करते. यामागचं रहस्य काय आहे? असं काय आहे की एवढ्या जोरात विजा आणि ढग कडकतात? इतका जोराचा आवाज येतो कुठून? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जमिनीवरच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्याचे वाफ बनते, अति उंच गेल्यावर ती वाफ थंड होऊन तिचे छोटे छोटे पाण्याचे थेंब तयार होतात. ते पाण्याचे छोटे-छोटे थेंब एकत्र आल्यावर त्याचे ढग बनतात. या ढगांचे तापमान खूपच थंड म्हणजेच झिरो डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असते. कमी टेंपरेचर मुळे ढगांमध्ये छोटे छोटे बर्फाचे तुकडे बनतात.

हे बर्फाचे छोटे-छोटे तुकडे एकमेकांशी धडकत राहतात. त्या बर्फाच्या तुकड्यांच्या सततच्या धडकेमुळे त्यांच्यात सतत घर्षण होऊन इलेक्ट्रिक चार्ज उत्पन्न होतो. म्हणून ढगांमध्ये काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह चार्ज तयार होतात. शक्यतो छोट्या पार्टिकल्स मध्ये पॉझिटिव्ह चार्ज व मोठ्या पार्टिकल्स मध्ये निगेटिव्ह चार्ज तयार होतो. पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल वजनाने हलके असल्यामुळे ते वरच्या बाजूला जातात तर निगेटिव्ह चार्ज पार्टीकल खालीच राहतात.

जेव्हा हे चार्जेस जास्त होतात तेव्हा ते एकमेकांना Attract करतात त्यामुळे त्यांचे घर्षण होऊन इलेक्ट्रिक करंटचा स्पार्क तय्यार होतो. हा स्पार्क खूप मोठ्या प्रमाणात असतो तोच आपल्याला लाईट च्या रूपात दिसतो ज्याला आपण वीज चमकणे असे म्हणतो.

या क्रियेमध्ये खूप मोठी लाईट आणि हीट बाहेर पडते. याच घर्षणामुळे आणि इलेक्ट्रिक स्पार्क मुळे खूप मोठा आवाज पण बाहेर पडतो ज्याला आपण ढगांचा कडकडाट बोलतो. जेंव्हा आकाशात वीज चमकते तेंव्हा साधारण दोन लाख एंपियर पर्यंत करंट तयार होतो. हा करंट आपल्या घरात असणाऱ्या इलेक्ट्रिक करंट पेक्षा खूप जास्त असतो. या वीजांमुळे एकट्या भारतात दर वर्षी शेकडो लोकांचा आणि जनावरांचा जीव जातो.

ही वीज तीन प्रकारची असते. इंट्रा क्लाऊड लाईटनिंग (म्हणजे एकाच ढगांमध्ये विजा चमकणे), यामध्ये एकाच ढगातील पॉझिटिव्ह चार्जेस व निगेटिव्ह चार्जेस यांची एकमेकांशी टक्कर होऊन लाइटनिंग होते. पण ही टक्कर खूप थोड्या प्रमाणात असते त्यामुळे त्याचा आवाज येत नाही.

क्लाऊड टू क्लाऊड लाइटनिंग ( म्हणजे दोन ढगांमध्ये विज चमकणे ), या प्रकारात एका ढगातील पॉझिटिव्ह चार्ज व दुसर्‍या ढगामधील निगेटिव्ह चार्ज एकमेकांबरोबर डिस्चार्ज होतात. ज्यामुळे खूप जोरात विज चमकते. ही चमक आणि टक्कर इतकी जास्त असतेकी आपल्याला जमिनीवर पण त्याचा आवाज येऊ शकतो.

क्लाऊड टू ग्राऊंड लाईटनिंग (म्हणजे ढग आणि जमिनीमध्ये वीज चमकणे ), जेंव्हा ढगामद्धे खालच्या बाजूचे निगेटिव्ह चार्ज खूप जास्त होतात तेव्हा ते जमिनीवर असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जकडे Attract होतात. ढगामधील हे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल खूप जोराने जमिनीच्या आसपास असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स बरोबर टक्कर करतात. ज्यामुळे जोरदार वीज कडाडण्याचा आवाज येतो, आणि आपल्याला जमिनीच्या दिशेने चमकणारी वीज दिसते. या लाईटचा स्पीड साऊंडच्या स्पीड पेक्षा जास्त असतो म्हणूनच आपल्याला पहिले वीज चमकताना दिसते आणि त्याचा आवाज नंतर येतो.

आता जाणून घेऊ वीज जमिनीवर कुठेकुठे कोसळू शकते? तर सामान्यता जमिनीवर मोठी झाडे, डोंगर, लाईटचे टॉवर, उंच बिल्डिंग यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो जो ढगामधील निगेटिव्ह चार्जला स्वतःकडे attract करतो. यामुळेच या ठिकाणी वीज पडण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणूनच विजा चमकताना या सर्व जागा पासून दूर राहिले तर आपला बचाव होऊ शकतो. पण ही वीज प्रत्येक वेळी जमिनीपर्यंत येतेच असे नाही. कधी कधी ती हवेमध्येच विझते, जमीनीपर्यंत पोहोचत नाही. जमिनीवर पडणारी वीज 27 हजार ते 30 हजार डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम असते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *