मुंबई जवळची सर्वात सुंदर 5 पर्यटन स्थळे !! जाणून घ्या!!

News

आपल्या भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे. ज्याला पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जायचे. अनेकदा मुंबई या शहराला स्वप्नांची शहर म्हणूनही ओळखले जाते. मुंबईमध्ये असणाऱ्या अनेक पर्यटन स्थळांचा आडवा तुम्ही घेतला असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का? शहराजवळ आणि सुंदर पर्यटनस्थळे आहेत! यांना भेट देण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने पर्यटक या ठिकाणी येत असतात, अशातच आज आपण मुंबई जवळील सर्वात सुंदर 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..

◆ भंडारदरा : मुंबईपासून साधारण 160 किलोमीटर अंतरावर असणारे भंडारदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. जे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात अकोले या तालुक्यांमध्ये आहे. जिथे मोठ्या प्रमाणात डोंगर-कडे, जलाशय हिरवी झाडी, शुद्ध आणि थंड हवा आपल्याला अनुभवायला मिळते. मुंबई शहराला भेट देण्यासाठी घेणारे बरेच पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्सुक असतात. भंडारदरा या ठिकाणी अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणी आपल्याला भंडारदरा धरण, ऑर्थर तलाव, विल्सन धरण, अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी किल्ला आणि कळसुबाई पर्वत बरोबर अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांना भेट देता येते. भंडारदरा या ठिकाणाला भेट हिवाळा हा ऋतू अतिशय योग्य समजला जातो.

◆ राजमाची किल्ला : मुंबईपासून साधारण 95 किलोमीटर अंतरावर असणारा राजमाची किल्ला भेट देण्यासाठी अतिशय सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. ज्याला राजमाची पॉइंट म्हणूनही ओळखले जाते. राजमाची किल्ला पॉईंट ते मुंबई जवळ एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे. जे समुद्रसपाटीपासून साधारण 833 मीटर इतक्या उंचीवर आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी असलेली नैसर्गिक सुंदरता आणि पवित्र यांचा आनंद आपण घेऊ शकतो. या किल्ल्यावरून आपल्याला शिरोडा धरण आणि सह्याद्री पर्वत रांगेचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. पावसाळा हा ऋतू राजमाची पॉइंटला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जातो. कारण पावसाळ्यात या ठिकाणचे वातावरण अगदी निसर्गरम्य स्वरूपाची असते.

◆इगतपुरी : मुंबईपासून इगतपुरी हे ठिकाण साधारण 120 किलोमीटर अंतरावर आहे. जे निसर्गरम्य सौंदर्य आणि धबधब्यांसाठी ओळखले जाते. हे ठिकाण महाराष्ट्र-नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ज्याला आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिनही ऋतुमध्ये भेट देऊ शकतो. इगतपुरीमध्ये तुम्ही किल्ले, नद्या, धबधबे आणि अभयारण्याचा आनंद घेऊ शकता आणि जुन्या भारतीय सुवर्ण इतिहासाची साक्ष देतात. त्याच बरोबर इगतपुरी हे शहर जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र विपश्यना आघातमीचे घर म्हणूनही प्रसिद्ध आहे.

◆ माथेरान : मुंबईपासून माथेरान ठिकाण 80 किलोमीटर अंतरावर आहे. येते मंत्रमुग्ध करणारी दृश्यं, धुक्याने भरलेल्या पायवाटा आणि हिरवीगार हिरवळ पाहायला मिळते. हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. जे समुद्रसपाटीपासून साधारण तर 2,600 फूट उंचीवर वसलेले आहे. माथेरान येथील कोणत्याही वाहनाला जाण्यासाठी परवानगी दिली जात नाही, त्यामुळे या ठिकाणचे वातावरण अगदी प्रदूषण मुक्त असते. त्यामुळे इथे आपल्याला सुंदर आणि नैसर्गिक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेता येतो. महाराष्ट्रातबरोबर भारताच्या अनेक कानाकोप-यातून अनेक पर्यटक आवर्जून या ठिकाणांना भेट देण्यासाठी येत असतात.

◆ लोणावळा- खंडाळा : महाराष्ट्रातील लोणावळा व खंडाळा ही पर्यटनस्थळे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळामध्ये भेट देण्यासाठी उत्तम समजली जातात. कारण या तिनही ऋतुमध्ये या परिसराच्या सभोवतालचा परिसर अतिशय आल्हाददायक असतो. या ठिकाणी असणाऱ्या निसर्गरम्य दऱ्या, किल्ले आणि नैसर्गिक तळी आणि विविध वनस्पती वेढलेले तलाव येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात. लोणावळामध्ये खास करून धरण पाहण्यासारखे आहे. तसेच लोणावळा व खंडाळा ही पर्यटनस्थळे एकमेकापासून जवळ आहेत. जी अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत. लोणावळा आणि खंडाळा या पर्यटनस्थळ जवळ आपल्याला टायगरलिप, तलाव, अमृतांजन पॉईंट, लेणी अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते.

तर मित्रांनो आज आपण मुंबईजवळील सर्वात सुंदर 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत? याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही मुंबईजवळील कोण-कोणते पर्यटनस्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात! ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *