आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्या प्रोपार्टीच्या संबंधाने अनेक प्रश्न भेडसावतात. या प्रश्नांची उत्तरे आपणास सहजासहजी मिळत नाहीत. आपल्या info in marathi या वेब-पोर्टलच्या माध्यमातून आम्ही अश्याच काही प्रश्नांची उत्तरे समजेल अश्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा, पुढील लेखामद्धे त्याचे उत्तरे दिले जाईल. चला तर मग सुरू करू आजचा प्रश्नोत्तर विशेष लेख.
आजचा प्रश्न आहे : एखाद्या जमिनीच्या विक्री नंतर सुद्धा जमीन विक्री करणार्या व्यक्तीच्या वारसांची नावे सात-बारावर असतील तर काय करावं? उत्तर : आता सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे की एखादी मालमत्ता विक्री झाल्यावर खरेदीदाराने आपले नाव ताबडतोब सात-बारावर लावून घेणं हे गरजेचं होतं, मात्र तसं न झाल्यामुळे आणि या गोष्टीचा गैरफायदा घेऊन जमीन विक्री करणार्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे वारस आता अभिलेखावर किंवा रेकॉर्ड वर आलेले आहेत.
मात्र असं जरी असलं तरी एकदा मालमत्ता विक्री केल्यानंतर त्याच्या वारसांना त्याच्यात हक्क नसेल तर त्यांची नावे आपल्याला सातबारा उतार्यावरून कमी करता येतात. मात्र त्याच्या करता जे आपलं खरेदीखत करण्यात आलेला आहे त्यामध्ये सगळी मालमत्ता सामील आहे का, त्या मालमत्ते बाबतीत करार करायचा अधिकार विकणाऱ्या व्यक्तीला होता का, किंवा त्या कराराला या पुढच्या वारसांनी संमती दिलेली आहे का, ती संबंधित करारात सामील असून दिलेली असो किंवा पुरवणी करार करून दिलेली असो. या गोष्टी जर झालेल्या असतील तर वारसांना त्या मालमत्ते मध्ये कायद्याने कोणताही अधिकार मिळू शकत नाही.
असे असून सुद्धा जर वारस पंचनामा होऊन त्यांची नावे लागली असतील तर त्याच्या विरोधात आपल्याला तो फेरफार रद्द करण्याकरता प्रांत कार्यालयाकडे आरटीएस अपील दाखल करणे आवश्यक आहे. या बाबतीत हा मुद्दा फक्त महसूल अभिलेखा पुरताच मर्यादित असल्याने दिवाणी दावा करायची तशी आवश्यकता नाही.
दिवाणी दावा हा जेव्हा मालकीचा किंवा ताब्याचा मुद्दा उगवतो तेव्हा करता येतो पण ह्या परिस्थितीत फक्त महसुली अभिलेखा मधील नोंदीचा वाद असल्याने दिवाणी दावा दाखल करण्याची तशी कोणतीही आवश्यकता पडणार नाही.
आता अजून एक मुद्दा तो म्हणजे जे खरेदीखत झालेला आहे त्यामध्ये या वारसांचा हक्क किंवा हिस्सा नसेल किंवा त्या वारसांनी संमती दिलेली नसेल तर त्या वारसांवर ते खरेदी खत लागू आहे किंवा बंधनकारक आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. तसं जर कायदेशीर परिस्थिती उद्भवली तर त्या वारसांची नावे पुर्णपणे काढून टाकता येणार नाहीत.
तर त्याच्या ऐवजी मयत व्यक्तीच्या हिस्स्यातील मिळकती साठीच खरेदीदाराचे नाव लावून घेता येईल. आता मयत व्यक्तीने केलेला करार त्याच्या वारसांवर सुद्धा लागू आहे असं जर आपलं म्हणणं असेल आणि तशी जर परिस्थिती असेल तर तसं न्यायालयाकडून घोषित करून घ्यायला लागेल आणि त्याबाबत आपल्याला दिवाणी दावा दाखल करणे हे क्रमप्राप्त ठरेल.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.