मराठवाड्यात ज्ञानराधा, आदर्श, जिजाऊ, साईराम अर्बन आणि राजस्थानी अशा अनेक पतसंस्थांमधील घोटाळे सध्या चांगलीच चर्चेत आहेत. या पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले आणि ठेवीदारांना पतसंस्थामध्ये पैसे ठेवले होते त्यांचे पैसे आता अडकून पडले आहेत. मराठवाड्यामध्ये जवळपास पाच हजार कोटींचा घोटाळा वेगळ्या पतसंस्थांमध्ये झाल्याची माहिती संसदेला देण्यात आली. ठेवींवर टक्के मिळताहेत म्हणून या पतसंस्थामध्ये पैसे ठेवले तर काहींनी दाम दुप्पट ठेव योजनाच्या नावाखाली या आमिषाला बळी पडून पतसंस्थांमध्ये पैसे ठेवले होते. आता आपण पतसंस्थांमध्ये पैसे ठेवण्यापूर्वी ठेवीदारबद्दल नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पतसंस्थांमधील घोटाळ्याची बातमी ऐकून अनेक प्रश्न मनात उत्पन्न होत असतात. त्या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील तज्ञशी संपर्क साधला आहे..
◆ महाराष्ट्रात गावोगावी पतसंस्थांचे प्रमाण जास्त दिसून येण्याचे कारण काय?
पतसंस्था नोंदणी करायला लागणारी रक्कम ही इतके कमी आहे हा पैसा जमवणं सहज शक्य असल्यामुळे सर्व ठिकाणी पत्तसंस्थांचे पेव फुटलेलं दिसत आहे. या गावांमध्ये अनेक तुम्हाला पतसंस्था दिसतात. प्रवेश फी अत्यंत कमी असल्यामुळे शासनाने वास्तविकता आहे ही रक्कम वाढवायला पाहिजे. कारण एखाद्या बँकेचे शाखा उघडायचे असेल तर तुम्हाला 2-3 कोटी रुपये लागतात. मात्र तुम्ही एक लाख रुपयेमध्ये तुम्ही पतसंस्था उघडू शकता आणि एक लाख रुपये जमा करणे सहज शक्य आहे.
◆ एखादी पतसंस्था अडचणीत केव्हा येते?
एखादी पतसंस्था आलेल्या ठेवींचा कर्ज वाटप करत असते. मात्र, जर कर्जाची रकमेचा परत आली तरच ठेवीदारांना परत देऊ शकतात. पण कर्ज वाटपामध्ये जर घोटाळा होत असेल तर वाटपामध्ये भ्रष्टाचार होत असेल तारण न घेता कर्ज वाटली जात असतील तर कालांतराने ठेवीदारांचे पैसे धोक्यात येतात.
◆ व्याजाचा दर जास्त असल्यामुळे पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवणे योग्य आहे का?
मुळात तज्ञांच्या मते, पतसंस्थेत ठेव ठेवत असताना ठेवीचा व्याजदर विचारण्याऐवजी कर्जाचा व्याजदर विचारणे आवश्यक आहे. कारण ज्या ठिकाणी जास्त व्याजदरात कर्ज दिले जाते, त्या पत्तसंस्थेमधील गुंतवणूक धोकादायक आहे.