मित्रानो तुम्हाला माहिती आहे का की, आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मात्र फारसा आकारमान आणि भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश नसल्याने याबाबत आज देखील काही मतभेद आहेत. भारतात भारतीय राज्यघटनेच्या कलम 83 नुसार लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेणे आवश्यक आहे.
लोकसभेच्या 543 सभासद म्हणजेच खासदार पौढ लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात, अशातच आज आपण भारताच्या कोणत्या राज्यात किती लोक सभा सीट आहे? त्याबद्दल माहिती घेणार आहोत. भारतात सर्वात जास्त लोक सभा सीट असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक लागतो. कारण या राज्यांमध्ये तब्बल 80 लोकसभा सीट आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य असून या ठिकाणी 48 लोकसभा सीट आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल हे राज्य ज्या ठिकाणी 42 लोकसभा सीट आहे. चौथ्या क्रमांकावर बिहार हे राज्य असून त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी 40 लोकसभा सीट आहेत. पाचव्या क्रमांकावर तमिळनाडू राज्य असून ज्या ठिकाणी एकूण 39 सीट आहेत. सहाव्या क्रमांकावर मध्य प्रदेश हे राज्य असून या ठिकाणी 29 लोक सभा सीटस आहेत.
यानंतर कर्नाटक हे राज्य असून या राज्यांमध्ये 28 लोकसभा सीट आहेत व आठव्या क्रमांकावर गुजरात राज्य असून 26 लोकसभा सीट आहेत. नवव्या क्रमांकावर राजस्थानी असून हे राज्य क्षेत्रफळ नुसार भारतातील मोठे राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यात एकूण 25 लोकसभा सीट आहेत. यानंतर आंध्र प्रदेश हे राज्य असून या राज्यांमध्ये एकूण 25 लोक सभा सीट आहेत.
पुढे अनुक्रमे ओडिशामध्ये 21 लोक सभा सीट असून केरळ राज्यात 20 लोकसभा सीट, तेलंगणा राज्यात 17 लोक सभा सीट, झारखंड राज्यात 14 लोकसभा सीट, आसाम राज्यात 14 लोकसभा सीट, पंजाब राज्यात 13 लोकसभा सीट, छत्तीसगडमध्ये 11 लोकसभा सीट तर हरियाणा राज्यात 10 लोक सभा सीट, उत्तराखंड राज्यात 5 लोकसभा सीट तसेच हिमाचल प्रदेश या राज्यात 4 लोकसभा सीट यानंतर गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय, त्रिपुरामध्ये प्रत्येकी 2 लोक सभा सीटस आहे.
मिझोरम, नागालँड, सिक्कीम या राज्यांमध्ये प्रत्येकी एक लोकसभा सीट आहे. भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर भारताच्या एकूण केंद्रशासित प्रदेशमध्ये एकूण 19 सीट आहेत. यामध्ये दिल्ली 14 लोकसभा सीट, जम्मू कश्मीर मध्ये 5, लोकसभा सीट दादरा नगर हवेलीमध्ये 2 लोकसभा सीट तर अंदमान निकोबार आणि चंदिगड, लक्षद्वीप आणि पुदुचेरीमध्ये प्रत्येकी 1 लोकसभा सीट आहे.
तर मित्रांनो आज आपण भारताच्या कोणत्या राज्यात किती लोकसभा सीट आहेत? याबद्दल माहिती जाणून घेतली आहे.तर महाराष्ट्रमध्ये तुमचा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे. आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..