मारवाडी लोक इतके श्रीमंत कसे असतात?

Infomative

आपले वाडवडील लोक आधीपासूनच बोलत आहेत की, “मारवाडी लोकांना धंदा शिकवू नये”, कारण धंदा कोळून प्यायलेली ही लोक असतात. त्यांना कधीच धंदा नाही शिकवायचा आणि धंद्यात यांच्याशी पंगा नाही घ्यायचा. धंदा आणि पैसा हे दोन त्यांचे फार आवडते विषय.

पण मारवाडी लोक धंद्यात असतात म्हणून इतके श्रीमंत असतात की त्यांच्या श्रीमंत असलेला पण काही वेगळी कारणे आहेत? चला तर मग जाणून घेऊ.. पैसे कमवण्यासाठी त्यांचं पहिलं सिक्रेट आहे म्हणजे पॅसिव्ह इनकम होय. पॅसिव्ह इनकम म्हणजे काय? तर पॅसिव्ह इनकमची अगदी टेक्निकल टर्म पाहिली तर या रेंटेड इन्कम असही म्हणतात.

तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल किंवा कुठला बिजनेस त्यातून तुम्हाला जे पैसे मिळतात ते झालं तुमचं ऍक्टिव्ह इनकम. कारण या इन्कमसाठी तुम्ही मेहनत घेत असता. पण आता समजा तुम्ही कुठे प्रॉपर्टी घेतली आणि ती भाड्याने दिली. तर त्यातून तुम्हालाच भाडे मिळतो त्याला पॅसिव्ह इनकम म्हणतात,

म्हणजेच अशा पद्धतीने पैसे कमावण्यात तुमची मेहनत ऐवजी गुंतवणूक असते. मारवाडी लोक हेच करतात. कारण पैशाने पैसा कमवत असतात. दुसर सिक्रेट आहे ते म्हणजे अपॉर्च्युनिटी. सोप्या पद्धतीने सांगायचे झाल्यास हे मारवाडी लोकं संधी साधू असतात. कुठलीही चांगली संधी या लोकांच्या हातून निसटली अस कधीच होत नाही. कायम नवनवीन संधीच्या शोधात असतात.

सोळाव्या आणि सतराव्या शतकात सुद्धा भारतात लाखो रुपयांचा अंतर्देशीय व्यापारही मारवाडी लोकांद्वारे व्यवस्थापित केला जात होता. व्यापारात उत्पादनापर्यंत किंवा अगदी सर्विसेसपर्यंत मारवाड यांनी व्यवस्थित संधी साधून यशस्वी उपक्रम करून दाखवले आहेत. बिरला ग्रुप हा पाच पिढ्या म्हणूनही अधिकार भारतातला सगळ्यात ग्रुप राहिलाय आणि त्यामध्ये तुझा संधी शोधणं आणि ती साधना हेच प्रमुख कारण आहे.

याचबरोबर, त्याचे तिसरे सिक्रेट म्हणजे फॅमिली व्यवसाय. कारण कोणताही मारवाडी कधीच कुठलाही नवीन बिझनेस सुरु करतोय असं दिसत नाही. जरी नवीन काही सुरू करत असेल तर यावरच त्याचे सर्वकाही अवलंबून नसतं. ते तो हौसेपोटी किंवा जरा नवीन प्रयोग म्हणून करत असतो.

त्यांच्याकडे कायम एक वडिलोपार्जित बिझनेस सेट असतो, जे ही लोक पुढे चालवत असतात. शून्यापासून सुरुवात करावी लागत नसल्यामुळे यांना सुरुवात करावी लागत नसल्यामुळे आणि मुळात फाउंडेशन एकदम तगड असल्यामुळे त्यांची भरभराट आणि प्रगती इतरांच्या तुलनेत बरीच गतीने आणि जास्त होते.

तसेच या लोकांमध्ये पटापट आणि वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते. कारण व्यवसाय चालवताना समोर येणारे प्रसंग एकदम प्रोफेशनली आणि डोकं शांत ठेवून हाताळावे लागतात आणि हे कसं मारवाडी लोकांना भारी जमत. कारण कोणताही निर्णय फक्त योग्य घेणं महत्त्वाचं असतं तर तो वेळेत घेणं तितकाच महत्त्वाचा असतात आणि तिथेच मारवाडी इतरांपेक्षा पुढे जातात.

याचबरोबर, लहान पोरांना दिलं जाणारं बाळकडू होय. मारवाडी घरांत जन्म झाला।की, त्यांच्या लहान वयातच व्यवसाय कसा चालवावा? हे बाळकडू दिले जात. मारवाडी लोक तुम्हाला सहसा नोकरी करणारी नाहीतर देणारी दिसतात. त्यांना UPSC किंवा सरकारी नोकरी करायचं नसतं.

त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो तो फक्त आणि फक्त धंदा आणि हा वैचारिक बदल त्यांचा लहानपणापासूनच मनात होत असतो. या बाबतीतलं नियोजन आणि अंडरस्टँडिंग मारवाडी लोकांच खूप लहान वयातच होत. तसेच हे लोकं कायम मोठा विचार करत असतात. साधारण लोकांचे व्यवसाय जपुन आणि वेळ घेऊन विचार करून बिजनेसमध्ये उलथापालथी करायचा,

पण मारवाडी लोकांचा तसं नसतं. ते निर्णय घेतात आणि मोकळे होतात. तसेच त्या लोकांचे प्लॅनिंग मोठं आणि दीर्घ कालावधीसाठी असतं. मारवाडी लोक एवढे श्रीमंत असल्याचा कारण म्हणजे त्यांची कंजूस होय. कारण चांगल्या भाषेत सांगायचं तर त्यांचा फायनान्शिअल प्लॅनिंग होय.

त्यांना कुठे पैसा घालायचा, कुठे जाऊन घ्यायचा ते बरोब्बर ठाऊक असतं. पैसे उडवण्यापेक्षा वापरण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. तसेच पैसा उडवला तर तितकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त तो कमवण्याची त्यांच्यात धमक असते, तेवढ्या मजबूत प्लॅनिंग लोकांमध्ये बघायला मिळते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *