”आग लावां मजबूरी नु
आन जान दी पसूरी नु
ज़हर बने हां तेरी
पी जावां मैं पूरी नु”
”मेरे ढोल जुदाईयां दी
तैनू खबर किवें होवे
आ जावे दिल तेरा
पूरा वि ना होवे..”
भारतात असा एखी व्यक्ति नसेल ज्याने हे गाणे ऐकले नाही. 5 महिन्यांपूर्वी कोक स्टुडिओचे हे गाणे रिलीज झाले आणि पाहता पाहता सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. यूट्यूबवर जवळपास 30 कोटी लोकांनी पाहिलेले पासूरी हे गाणे त्याच्या लीरिक्स आणि जबरदस्त बिट्स मुळे अतिशय लोकप्रिय झाले. आणि या गाण्याचा आत्मा म्हणजे या गाण्याच्या गायकांचा आवाज. मंत्रमुग्ध करणारा हा आवाज आहे पाकिस्तानचे लोकप्रिय सिंगर आली सेठी आणि नवखी ‘शे गिल’.
आजच्या या लेखात आपण instagram वर व्हिडिओ पोस्ट करणार्या 23 वर्षाच्या मुलीचा रातोरात जगभर प्रसिद्ध होण्याचा प्रवास जाणून घेऊ. शे गिल ( Shae Gill ) बद्दल प्लब्लिक डोमेन मध्ये अधिक माहिती कुठेही आढळून येत नाही, त्यामुळे तिच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी तिच्या चाहत्यांना जास्तच कष्ट घ्यावे लागत आहे. पण तुम्हाला जास्त कष्ठ घेण्याची आवश्यकता नाही, फक्त हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रातोरात लोकप्रिय झाले ‘पसूरी’ :
शे गिल ही एक पाकिस्तानी गायिका आहे जीने 2022 मध्ये तिचे पहिले गाणे “ पसूरी” रिलीज करून रातोरात खळबळ माजवली. पसूरी हेकोक स्टुडिओ सीझन 14 मधील गाणे आहे ज्यात शे गिल आणि अली सेठी आहेत. ‘पसूरी’ हे कोक स्टुडिओच्या सीझन 14 मधील सर्वात ट्रेंडिंग गाण्यांपैकी एक आहे. अली सेठीचे वैशिष्ट्य असलेले हे गाणे एक मधुर गाणे आहे जे अलीकडे प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये हिट झाले आहे. या गाण्याने काही वेळातच संगीतप्रेमींना प्रभावित केले आहे, त्याच्या आकर्षक बोल आणि बीट्समुळे.

कोण आहे पसूरी गर्ल?
अनुशा गिल, प्रोफेशनली “शे गिल” म्हणून ओळखली जाते, ती 23 वर्षांची आहे. पाकिस्तानात जन्मलेल्या आणि वाढलेल्या शे गिलला बालपणापासूनच संगीताची प्रचंड आवड निर्माण झाली. त्यामुळे तिने लहान वयातच गाणे सुरू केले. “पसूरी” गाण्याच्या यशाने, शे गिल फक्त पाकिस्तानातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाली. गिलच्या अप्रतिम गायन कौशल्यामुळे, तिचा पसुरी सह-गायक अली सेठी याने तिला ‘पाकिस्तानची Dua Lipa’ म्हणून संबोधित केले .
अदनान सिद्दीकीसारख्या अभिनेत्यानेही या तरुण प्रतिभावान गायिकेचे कौतुक केले आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर करून पसुरीच्या गायकांचे कौतुक केले ज्यामध्ये तो म्हणाला, “हे काय गाणे आहे; अली सेठी मी याचा पुरेपूर आनंद घेतला आहे. शे गिल तुझा आवाज छान आहे आणि तू अप्रतिम काम केलेस.”

शे गिल ही फोरमन ख्रिश्चन कॉलेजची विद्यार्थीनी आहे. तिच्या एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार गिलने तिचे इंस्टाग्राम अकाउंट बनवले आणि सोशल मीडियावर तिचा संगीत प्रवास सुरू केला. ती गंमत म्हणून गाणी म्हणायची आणि ती तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करायची. गिलने 17 मे 2019 रोजी तिची पहिली इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. तिने एक सुंदर गाणे गातानाचा व्हिडिओ अपलोड केला.
त्यानंतर ती सोशल मीडियावर तिची गाणी शेअर करत राहिली आणि काही वेळातच तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली कारण लोकांना तिचा शांत आवाज आवडू लागला. इंस्टाग्रामवर सक्रिय असलेल्या गिलचे 400k पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
Spotify ला दिलेल्या एका मुलाखती मध्ये शे गिलने संगितले की, ” गाण्यांचा हा सर्व प्रवास कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असताना तिच्या बेस्टीच्या खोलीत सुरू झाला. तिचे स्वप्न आहे की तिला ए. आर. रहमान यांच्यासोबत काम करायचे आहे. पुढे तिला शास्त्रीय संगीत देखील शिकण्याची इच्छा आहे.”
गिलच्या म्हणण्यानुसार, तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कोक स्टुडिओमध्ये गाणे खरोखरच रोमांचक आहे. आपण स्वत:वर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले पाहिजे, असे तिचे मत आहे.