नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा..
पेनला आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. कार्यालयातील काम असो किंवा शाळा, महाविद्यालयातील मुलांच्या शिक्षणासाठी असो, पेनचा वापर सर्वत्र केला जातो. याचा वापर मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण करतात. पूर्वीच्या काळी पक्ष्यांची पिसे लिहिण्यासाठी वापरली जायची. पण आजच्या काळात आपल्याला त्रास करून घ्यायची आवश्यकता नाही. एकापेक्षा एक पेन बाजारात मिळतात.
आजच्या काळात आपण बहुतेक जेल पेन किंवा बॉल पेन, रोलरबॉल पेन, फाउंटन पेन, फील्ड टिप पेन वापरतो. ज्या पद्धतीने शिक्षण डिजिटल होत आहे, त्यानुसार विविध डिजिटल पेन उपलब्ध होत आहेत. तुम्ही देखील रोज पेनचा वापर करत असालच, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की पेनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? चला तर मग आजच्या या लेखात आपण ही माहिती जाणून घेऊ.
पेनचा शोध फ्रेंच शोधक पेट्राचे पोएनारू यांनी लावला. त्यांनी 25 मे 1857 रोजी फाउंटन पेनचा शोध लावला. पण सर्वात महत्त्वाचा मानला जातो तो बॉल पॉइंट पेनचा शोध. बॉल पॉइंट पेनच्या शोधाचे श्रेय 2 लोकांना दिले जाते, त्यापैकी पहिले नाव जॉन जे. लाउड आणि दुसरे नाव लास्झलो बिरो. जॉन जेकब लाउड यांनी 1988 मध्ये बॉल पॉइंट पेनचा शोध लावला.
पहिला बॉल पेन : बॉल पेन बनवण्याची कल्पना जॉनला चामड्याच्या वस्तूंवर काम करत असताना सुचली. शिवणकाम करताना ज्या प्रकारे शिंप्याला कापडावर वारंवार खुणा कराव्या लागतात, त्याच पद्धतीने जॉनला चामडे कापण्यासाठी वारंवार खुणा कराव्या लागत होत्या पण त्यावेळी फाउंटन पेन आणि पेन्सिल उपलब्ध असल्याने ते थोडे अवघड होते. येथूनच जॉनला एक पेन बनवण्याची कल्पना सुचली जी त्याला या कामात मदत करू शकेल. या कल्पनेला अनुसरून त्यांनी एक पेन बनवला ज्याच्या टोकाचा आकार लहान धातूच्या चेंडूसारखा होता.
फाउंटन पेनचा आविष्कार : पेनचा शोध फ्रेंच शोधक पेट्राचे पोएनारू यांनी लावला. प्रत्येक शोधात जसे काही ना काही त्रुटी राहतात, त्याचप्रमाणे “पेट्राचे पोएनरू” ने बनवलेले फाउंटन पेन यामध्ये सुरुवातील अशीच एक त्रुटी होती. शाईने लिहलेला मजकूर जास्त काळ ओला राहत असे, शाई सुकायला खूप वेळ लागत असे. नंतर 1988 मध्ये एक नवीन शोधक जॉन. जे. लाऊडने बॉल पेनचा शोध लावून ही समस्या सोडवली आहे.
बॉल पेनचा शोध लागल्यानंतरही पेनमध्ये काही त्रुटी राहिल्या. फाउंटन पेनपेक्षा बॉल पेन खूप चांगले होते आणि लिहिणेही पूर्वीपेक्षा सोपे होते, पण तरीही बॉल पेनमधील शाई पेनच्या आत सुकून पेनच्या आत अडकत असे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.