IFSC कोड म्हणजे काय? याचा वापर कशासाठी होतो? IFSC कोड कसा शोधावा? जाणून घ्या सविस्तर.

Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि फायदेशीर माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर फायदेशीर माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

जर तुम्ही ऑनलाइन व्यवहार करत असाल तर तुम्ही IFSC कोड देखील वापरला असेल. जेव्हा केंव्हा आपण एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करतो, तेव्हा आपल्याला बँक खाते क्रमांका-व्यतिरिक्त एक कोड देखील आवश्यक असतो, ज्याला आपण IFSC कोड म्हणतो. या IFSC कोड शिवाय कोणत्याही एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात पैसे पाठवले जाऊ शकत नाही.

आजच्या या महितीशीर लेखात आपण IFSC कोड म्हणजे काय? याचा वापर कशासाठी होतो? आपल्या बँकचा IFSC कोड कुठे आणि कसा शोधावा याबद्दल माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. माहिती आवडल्यास आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.

IFSC कोडचा फूल फॉर्म Indian Financial System Code असा आहे. आपल्या देशात स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा अशा अनेक बँका आहेत आणि या सर्व बँकांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. या सर्व बँकांच्या प्रत्येक शाखेचा स्वतःचा विशिष्ट कोड असतो ज्याला आपण IFSC कोड म्हणतो. या कोडद्वारे बँकेच्या शाखेचा शोध घेता येतो.

तुमची बँक तुम्हाला देत असलेल्या तुमच्या चेकबुकच्या पानावरही याचा उल्लेख असतो. बँक खातेदाराला जे पासबुक देते त्याच्या पहिल्या पानावरही IFSC कोड छापलेले असते. प्रत्येक बँकेच्या शाखेसाठी एक वेगळा असा IFSC कोड असतो जो भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे नियुक्त केला जातो. IFSC कोड हा 11 अक्षरांचा अल्फान्यूमेरिक कोड आहे. IFSC कोड शिवाय, वापरकर्ते NEFT, IMPS आणि RTGS वापरून इंटरनेट बँकिंग किंवा निधी हस्तांतरण करू शकत नाहीत.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *