पुणे शहरातील सर्वात पॉश 5 ठिकाणे कोणती? जाणून घ्या!!

News

 

मित्रांनो पुणे हे शहर महाराष्ट्रातील मुंबईनंतर सर्वात मोठे महानगर म्हणून ओळखले जाते. जे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील सहाव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. पुणे शहर खासकरून उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. अनेकदा भारतातील सर्वात चांगले राहण्यायोग्य शहर म्हणूनही पुणे शहराकडे पाहिले जाते. पुणे शहरामध्ये किती अशी ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी उच्च राहणीमान, सुयोग्य व्यवस्थापन आणि वेगवेगळ्या सुविधा आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी येण्यासाठी अनेक लोकांची लगबग असते, अशातच आज आपण कोणी शहरातील सर्वात पॉश ठिकाणी कोणती आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..

◆ कोथरूड : पुणे शहरातील कोथरूड हे ठिकाण राहण्यासाठी अतिशय पॉश ठिकाण समजले जाते. नुकतीच आशिया खंडातील सर्वात वेगाने विकसित होणारी उपनगर म्हणून कोथरूड गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. हे ठिकाण पुण्याच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये स्थित आहे. जिथे गेले काही वर्ष तरी रियल इस्टेडमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. काही रहिवासी मालमत्ता आणि व्यावसायिक इमारती देखील आहेत. सुविकसित सामाजिक आणि नागरी पायाभूत सुविधांमुळे कोथरूड इतर सर्व सर्वांपेक्षा जास्त मागणी असलेले निवास बनते. या ठिकाणी असणारे आयटी कंपनी आणि सुप्रसिद्ध महाविद्यालयामुळे कोथरूड ठिकाण व्यवसायिक लोकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे.

◆बोट क्लब रोड : पुणे शहराच्या पूर्वेला असलेले बोट क्लब रोड ठिकाण पुण्यातील आकर्षक आणि पॉश ठिकाणांपैकी एक आहे. जिथे सर्वत्र अल्टा लक्झरी हाऊसिंग विला आणि बंगले पाहायला मिळतात. त्यामुळे या रॉयल बोट क्लब म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण पुणे-मुंबई महामार्ग बरोबर शहराच्या इतर भागांशी उत्तम प्रकारे जोडलेली आहे आणि त्याच्या वाढीचे मुख्य कारण आहे. बोट क्लब रोड पुण्यातील लक्झरी क्षेत्रापैकी एक आहे. जे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ जवळ असल्याने त्यातून प्रवास करणे खूप सोपे होते. तसेच या ठिकाणी आपल्याला मॉल, फूड स्टॉल, मार्केट प्लेस इत्यादींसारखे अनेक पर्याय असल्याने बोट क्लब रोड अतिशय चैतन्यशील आणि सक्रिय ठिकाण आहे.

◆कोरेगाव पार्क : कोरेगाव पार्क हे पुण्यातील सर्वात पॉश ठिकाणापैकी एक आहे. जे संपुर्णतः हिरवेगार सौंदर्यासाठी आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. जे व्यवसायिक आस्थापना आणि हिरवाईने नटलेले लक्झरी ओळखले जाते. कोरेगाव पार्क निवासी कारणासाठी प्रसिद्ध ठिकाण नाही तर व्यावसायिकांसाठी ओळखले जाते. या परिसरात तरुणांना आकर्षित करणारी अनेक रेस्टॉरंट आणि पब आहेत. जर कोरेगाव पार्कला जाण्याचा विचार करत असाल तर तेथील सुनियोजित रस्ते अतिशय सुंदर आहेत. आगाखान पुलावरून शहराच्या मध्यभागातपर्यंत जाता येते. येथून 6 किलोमीटर अंतरावर एअरपोर्ट आणि 3 किलोमीटर अंतरावर स्टेशन आहे, त्यामुळे येथून प्रवास करणे खूप सोपे होते.

◆ शिवाजीनगर : शिवाजीनगर हे पुण्यातील एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये, शहर न्यायालय आणि शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे हे ठिकाण पुण्यातील सर्वात श्रीमंत आणि पॉश ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकनी उभा ठिकाणी घरे बांधण्यासाठी जमिन खरेदी केल्याने या जागेला लोकप्रियता मिळाली. घरांच्या वाढत्या मागणीमुळे हे ठिकाण पुण्यातील पॉश ठिकाण बनले आहे. याठिकाणी पुढील काही वर्षात जमिनींच्या किमती आणखी वाढण्याची अपेक्षा असल्याने ही तेजी येण्याची खूप शक्यता आहे. शिवाजीनगरमध्ये आपल्याला दर्शन संग्रहालय, नीलकंठेश्वर मंदिर, आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय अशी ठिकाणी पाहायला मिळतात.

◆ न्यू कल्याणीनगर : न्यु कल्याणी नगर हे कल्याणी नगरचा एक भाग आहे. जिथे मोठी निवासी आणि व्यावसायिक वाढ होत आहे. पुणे शहरात नव्याने येणाऱ्या व्यक्तींसाठी कल्याणीनगर एक सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. न्यू कल्याणी नगर हे शहरातील इतर प्रसिद्ध ठिकाणी जाणे योग्य आहे. जे पुण्यात राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. जिथून विमानतळ आणि रेल्वे स्टेशन जवळ आहे, सोबतच इथं आयटी हब असल्याने ठिकाणी कायम असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि कुटुंबासाठी पुण्यात राहण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण बनले आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अपार्टमेंट आणि लक्झरी देखिल मिळू शकतात. इथे आगाखान पॅलेस, जॉगर्स पार्क, राष्ट्रीय युद्ध संग्रहालय, मेरीगोल्ड मल्टिप्लेक्स ठिकाणी पाहायला मिळतात.
तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात पॉश ठिकाणाची माहिती जाणून घेतली आहे तर तुम्ही पुण्याच्या कोणत्या भागात राहतात आणि तुमच्या भागात काय फेमस आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *