आपला भारत देश हा संपूर्ण जगामध्ये त्याच्या आध्यात्मिक संस्कृती, परंपरा आणि सर्दीमुळे ओळखला जातो. कारण आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोक श्रद्धाळू आहेत. आपल्या देशातील लोकांची देवाबद्दलची श्रद्धा खूप असल्याने ते त्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. भारत देशात शेकडो मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे ही श्रीमंतीसाठी ओळखले जातात. या मंदिरात दर्शनासाठी येणारे लोक श्रद्धेने दान करत असतात आणि त्यामुळेच इथे लाखो-करोडो रुपयांची देणगी जमा होते. आज आपण भारतात सर्वात श्रीमंत मंदिर याबद्दल जाणून घेणार आहोत..
◆ सोमनाथ मंदिर : सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये दहाव्या क्रमांकावर येते. सोमनाथ मंदिर हे भारताच्या गुजरात राज्यामध्ये आहे हे मंदिर गुजरात या पश्चिम किनाऱ्यावर वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटणमध्ये आहे. गुजरातचे एक महत्वाचे तीर्थस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराकडे बघितले जाते. भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे पहिले मंदिर आहे, असे मानले जाते. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. परकीय आक्रमणाने हे मंदिर 17 वेळा तोडले आणि लुटून नेले. तरीदेखील आजही मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. सोमनाथ मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. सोमनाथ मंदिराकडे आज देखील मोठ्या प्रमाणात गोल्ड रिजर्वमध्ये आहे.
◆काशी विश्वनाथ मंदिर : काशी विश्वनाथ मंदिर हे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यांत आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्येही मंदिर नवव्या क्रमांकावर येते. हे मंदिर उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी गंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. वाराणसी हे ठिकाण हिंदु धर्मातील पवित्र अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हे स्थळ फक्त भारतीयांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांना आकर्षित करते. काशी विश्वनाथ या मंदिराची देखील अनेक वेळा लूट करण्यात आली होती. दरवर्षी या मंदिराच्या दानपेटीत 4-5 करोड रुपये येतात. काशी विश्वनाथ या मंदिराची एकूण नेट वर्थ ही एकूण 6 करोड रुपये आहे असे सांगितले जाते.
◆ जगन्नाथ मंदिर : भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये जगन्नाथ मंदिर आठव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. हे मंदिर ओडिशा या राज्यांमध्ये पुरी शहरांमध्ये स्थित आहे. हिंदू धर्मातील सर्वात मनाच्या पवित्र चारधाम तीर्थ क्षेत्रापैकी जगन्नाथ मंदिर एक तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराचा लँड एरिया 30 एकर पर्यंत पसरलेला आहे. जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज तीस हजार पेक्षा येत असतात. त्याचबरोबर यात्रेनिमित्त या मंदिरातील मूर्ती या 209 किलो पर्यतच्या सोन्याने सजवल्या जातात. त्यामुळे या मूर्ती अतिशय सुंदर दिसतात. 2010 मध्ये या मंदिराचे बँक डिपॉझिट जवळजवळ 150 करोड इतके झाले होते.
◆ मीनाक्षी मंदिर : मीनाक्षी मंदिर तामिळनाडू या राज्यांमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये मंदिर सातव्या क्रमांकावर येते. हे मंदिर मदुराई या शहरांमध्ये येते. दररोज 20 ते 25 हजार पेक्षा जास्त लोक या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात. मीनाक्षी कल्याण या मंदिरामध्ये जर वर्षी एप्रिल महिन्यात दहा दिवसाचा मोठा उत्सव केला जातो. या उत्सवामध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोक येतात. या मंदिराला दरवर्षी 6 कोटीपेक्षा जास्त डोनेशन येते.
◆ गोल्डन टेम्पल : भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरामध्ये गोल्डन टेम्पल 6 व्या क्रमांकावर आहे. ते गोल्डन टेंपल हे शीख धर्मातील सर्वात मोठी गुरुद्वरा आहे. पंजाब राज्यांमध्ये अमृतसर या ठिकाणी हे सुवर्ण मंदिर आहे. याला स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. खरोखरच एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. गोल्डन टेम्पलमध्ये दररोज 40 हजार पेक्षा जास्त लोक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद दिला जातो. गोल्डन टेम्पलचे वार्षिक उत्पन्न हे शंभर करोड पेक्षा जास्त आहे.
◆ सिद्धिविनायक मंदिर : भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये सिद्धिविनायक मंदिर पाचव्या क्रमांकावर येते. अनेक लोकांना या मंदिराबद्दल माहिती असेल. हे मंदिर महाराष्ट्राच्या मुंबई मध्ये स्थित आहे. त्यामध्ये असणारी भगवान गणेशाची मूर्तीही 200 वर्षांपेक्षा जुनी आहे, असेच मानले जाते. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दररोज दोन लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत असतात. सिद्धिविनायक मंदिराचे वार्षिक उत्पन 50 ते 125 करोड आहे असे सांगितले जाते.
◆ वैष्णवीदेवी माता मंदिर : वैष्णवी माता मंदिर जम्मूमधील कटरा या शहरात आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्येही मंदिर चौथ्या क्रमांकावर येते. हिमालयाच्या पर्वत रांगामध्ये वसलेले हे मंदिर हिंदू धर्मातील एक मंदिर आहे. वैष्णवी देवीला दुर्गा देवीचा अवतार समजला जातो. वैष्णवी देवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा गावातून पंधरा किलोमीटरचा घाट चढावा लागतो. इतका मोठा आणि कठीण घाट चढून दर वर्षी 80 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. वैष्णोदेवी माता मंदिराचे वार्षिक उत्पन हे 500 करोड पेक्षा जास्त आहे.
◆ साईबाबा मंदिर : सर्वात श्रीमंत मंदिर साईबाबांचे मंदिर हे तिसर्या क्रमांकावर येते. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी याठिकाणी हे मंदिर आहे. साईबाबांनी या छोट्याशा गावाला आपल्या भक्तांसाठी पवित्र तीर्थ क्षेत्रात रूपांतर केले आहे. निस्वार्थ प्रेम आणि गरिबांच्या समर्पण यामुळे त्यांना आदर व त्यासाठी त्यांची पूजा केली जाते. साईबाबांच्या दर्शनासाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या उत्सुकतेने येत असतात. या मंदिराजवळ 35 करोड रुपयांची सोने आणि चांदी आहे. ज्या सिंहासनावर साईबाबांची विराजमान आहे असं 94 किलो शुद्ध सोन्याने बनवलेला आहे. त्याचबरोबर या मंदिराचे वार्षिक उत्पन हे 360 करोड रुपयांच्या जवळपास आहे.
◆ तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर : तिरूमला वेंकटेश्वर मंदिर भारतातील आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्येही मंदिर दुसऱ्या क्रमांकावर येते. आंध्र प्रदेश मधील तिरुपती या शहरांमध्ये तिरुमला हिल्स जवळच हे मंदिर आहे. तिरुपती मंदिर वेंकटेश्वर यांना समर्पित आहे. जे भगवान विष्णूचे एक रूप आहेत. या मंदिराला भूलोकीचे वैकुंठ म्हणूनही ओळखले जाते. तिरुपती व्यंकटेश्वर या मंदिरामध्ये दररोज 50 हजार पेक्षा जास्त लोक दर्शनासाठी येत असतात. त्याच बरोबर या मंदिरांमध्ये फक्त लाडू विकून 75 करोड रुपये येतात. या मंदिराला एका वर्षात सहाशे पन्नास करोड पेक्षा जास्त देणगी मिळते.
◆ एक पद्मनाभस्वामी मंदिर : भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये पद्मनाभस्वामी मंदिर हे पहिल्या क्रमांकावर येते.हे मंदिर भारतातील केरळ राज्यामध्ये आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये मंदिर आहे. आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिरामध्ये भगवान विष्णूची संपूर्ण सोन्याची मूर्ती उपलब्ध आहे. या मूर्तीची किंमत 500 करोड आहे, असे सांगितले जाते. पद्मनाभस्वामी या मंदिराला भारतातील सर्वात चमत्कारीक मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची संपत्ती ही 90 हजार करोड इतकी आहे.
तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर याबद्दल माहिती जाणून घेतली आहे.