आपल्यापैकी अनेक लोक उपवास करतात आणि बहुतांश लोकांचा उपास साबुदाण्याची खिचडी शिवाय पूर्ण होत नाही. अनेकांनी तर लहानपणी फक्त खिचडी खायला मिळते म्हणून उपवास केले असतील. याचबरोबर साबुदाण्याचे वडे आणि खीर सुद्धा उपवासाला बनवली जाते. दक्षिण भारतात फिश करीमध्येही साबुदानाचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, साबुदाण्याचे मोत्यासारखे पांढरे दाणे कसे तयार होतात? आपल्या आहारातला परिचित पदार्थ शेतांमधून नाहीतर कारखान्यांमधून येतो आणि हो भारतीय नसलेला हा खाद्यपदार्थ दीडशे-दोनशे देशात लोकप्रिय झालाय.
साबुदाणा कसा बनतो? तर साबुदाणा मुळात एका विशिष्ट झाडाच्या मुळांपासून तयार होतो. ज्या प्रमाणे उसाची कांडी लावली जाते, तशीच कसाब्याची लागवड होते. रोपवाटिकांमध्ये ही त्याची रोपे मिळतात. 9 ते 11 महिन्यात तयार होणाऱ्या या पिकातून प्रति एक चांगलं उत्पादन होते. या पिकाला कमी देखभाल आणि कमी पाणी लागत. हे पीक अत्यंत नापीक जमिनीवर घेता येऊ शकतो फक्त ही जमीन पाणी धरून ठेवनारी नसावी. पीक तयार झाल्यावर त्याची मूळ काढून कारखाना पाठवली जातात. तिथे मुळांवर धुळ आणि माती दूर करून मग या वेड्यावाकड्या मुळांना पद्धतशीरपणे कापला जातो. मग कंद सोलले जातात, पण त्यांना धक्का लागू नये याची विशेष काळजी घेतली जाते.
मग हे कंद कुस्करली जातात आणि त्यातले धागे म्हणजे तंतू बाजूला काढले जातात. हा चोथा गुरांसाठी उपयोगी ठरतो. हे कदाचित ही खत म्हणून वापरली जातात. मग यातून पांढरा रस काढला जातो तो पाण्यात मिसळून त्याची अशुद्धता दूर करण्याची प्रक्रिया केली जाते, त्यासाठी तो मोठ्या टाक्यामध्ये ठेवला जातो. मग यातून पांढरा लांढा मिळवण्यासाठी पाणी काढून टाकल जातं.
मग त्याला मोत्यांसारखे आकार देवून तव्यावर भाजून घेतले जात. जेणेकरून त्यातलं पाणी निघेल. त्यानंतरही ते उघड्यावर सूर्यप्रकाशात वाळवले जातात. कारण ओलावा राहता कामा नये आणि मग हा साबुदाणा पॉलिश करून पॅक केला जातो आणि मग तो आपण बाजारातून घरी आणून मस्तपैकी त्याचे खिचडी किंवा खीर, पापड बनवतो.