तुम्हाला माहीत आहे का आमदारांना किती पगार मिळतो? जाणून घ्या कोणत्या राज्यात आमदारांना मिळतो सर्वात जास्त पगार.

Infomative

नुकतीच दिल्लीच्या आमदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता दिल्लीच्या आमदारांचे मासिक वेतन 54,000 वरून 90,000 करण्यात येत आहे. राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर सर्वांच्या पगारात वाढ होणार आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघातील आमदारांना दरमहा किती पगार मिळतो, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. इतर राज्यात काय परिस्थिती आहे माहीत आहे का? कोणत्या राज्यातील आमदारांना सर्वाधिक पगार मिळतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

दिल्लीच्या आमदारांचा पगार : दिल्लीतील आमदारांच्या पगारात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आता येथील आमदारांचा पगार 66 टक्क्यांनी वाढणार आहे. यानंतर दिल्लीच्या आमदारांना दरमहा ९० हजार रुपये मिळतील. यापूर्वी त्यांना केवळ 54 हजार रुपये मिळत होते. दिल्लीच्या आमदारांच्या पगाराचा हिशेब असा आहे की, पूर्वी त्यांचा पगार फक्त १२ हजार महिन्यांचा होता आणि इतर भत्ते जोडून ५४ हजार व्हायचे. आता हे वेतन 30 हजार होणार असून इतर भत्ते जोडून त्यांना दरमहा 90 हजार रुपये मिळतील. तसे, अहवालानुसार, हा पगार दरमहा 2 लाख करण्याचा प्रस्ताव होता, परंतु तो मंजूर झाला नाही.

या राज्यात मिळतो सर्वाधिक पगार : भारतात सर्वाधिक पगार हातेलंगणाच्या आमदारांना दिला जातो. तेलंगणाच्या आमदारांना दरमहा २ लाख ५० हजार रुपये पगार मिळतो. जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आमदारांचे मासिक वेतन केवळ 20 हजार रुपये आहे. उर्वरित रक्कम त्यांना भत्त्यांच्या स्वरुपात मिळते. राहत्या घरासाठी भत्ता, प्रवासासाठी भत्ता, आपल्या कार्यालयासाठी भत्ता, टेलिफोन साठी भत्ता इ.

महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर : पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील आमदारांना 2 लाख 32 हजार रुपये मिळतात. गतवर्षी ठाकरे सरकारने आपल्या राज्यातील आमदारांना दरमहा 15 हजार रुपये इतका ड्रायव्हर भत्ता दिला आहे. आमदारांना आपल्या मतदार संघात फिरण्यासाठी ड्रायव्हरची गरज असून त्यासाठी ड्रायव्हर भत्ता देण्यात आल्याचे सांगण्यात आले.  तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे आमदार आहेत त्यांना वेतन भत्त्यासह 2 लाख 10 हजार रुपये मिळतात. त्याचवेळी कर्नाटकच्या आमदारांना 2 लाख 5 हजार रुपये मिळतात.

या राज्यात मिळतो सर्वात कमी पगार : आता जाणून घेऊ कोणत्या राज्यात आपल्या आमदारांना सर्वात कमी पगार दिला जातो? फायनान्शिअल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, सर्वात कमी पगार देणाऱ्या राज्यांमध्ये केरळचे नाव आघाडीवर आहे. केरळच्या आमदारांना महिन्याला फक्त ४३,२०० रुपये पगार मिळतो, यामध्ये सर्व भत्ते देखील आले. त्याचबरोबर त्रिपुराच्या आमदारांना दरमहा ४८ हजार रुपये मिळतात.

इतर राज्यातील आमदारांचे पगार : आंध्र प्रदेशच्या आमदारांना दरमहा 1 लाख 25 हजार रुपये इतके वेतन मिळते. अरुणाचल प्रदेश येथील आमदारांना दरमहा 1 लाख 20 हजार रुपये इतके वेतन मिळते. आसाम मधील आमदारांना दरमहा 60 हजार रुपये इतके वेतन मिळते. बिहारच्या आमदारांना दरमहा 1 लाख 60 हजार रुपये इतके वेतन मिळते. छत्तीसगढ मध्ये 1 लाख 35 हजार इतके वेतन मिळते. गोवा येथील आमदारांना दरमहा 1 लाख रुपये इतके वेतन मिळते. गुजरात आणि हरियाणाच्या आमदारांना देखील लाखभर पगार मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *