नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
तुम्ही एखाद्या माणसाला लोण घेताना बँकेत बँक गॅरंटर म्हणून राहिलात तर त्या केस मध्ये तुमची गॅरंटी विथद्रॉ करता येते का याबद्दलची माहिती आपण बघूया.: बरेचदा एखादा जवळचा मित्र, नातेवाईक किना ऑफिस चा कलिक बँकेचे लोन घेताना आपण त्याला बँक गॅरंटर म्हणून गॅरंटी देतो. तिथे सही करतो. पुढे त्याने बँकेचे लोण वेळेत भरले नाही तर बँक तुमच्या घरापर्यंत येते आणि तुमच्याकडून वसुली करते.
कोरोना मध्ये खूप लोकांचे जॉब गेलेत, बिझनेस ठप्प पडलेत पण ते लोक जे बोरॉवर आहेत ते लोण रीपे करू शकत नाही. तर त्या केसमध्ये बँका, पतसंस्था गॅरंटर च्या घरापर्यंत येऊन जपती करत आहेत. आज काल सर्रास हे चालू झालय. कारण बऱ्यापैकी मार्केटमध्ये NP अकाउंट डिक्लेअर झाले आहे. कोरोनामुळे खूप बऱ्याच लोकांचा उत्पन्न इन्कम थांबलेला आहे आणि लोन डिफॉल्ट झाल्यामुळे गॅरंटरच्या घरापर्यंत बँका यायला लागले आहेत.
तुम्ही एखाद्याला गॅरंटर राहिलात तर त्याला उपाय नाही. एकदा का लोण NPA झालं की आता तुमच्या कडून वसुली होणारच त्याला काही पर्याय नाही. पण तुम्ही एखाद्याला गॅरंटर आहात आणि अजून त्याच लोण अकाउंट NPA व्हायचं असेल तर आत्ता तुमच्याकडे संधी आहे. तुम्ही काय करू शकता की बोरॉवर ला ज्याचा साठी तुम्ही गॅरंटर राहिला आहात त्याला पत्र लिहायचे
आणि बँकेला एक पत्र लिहायचं की मी अमुक अमुक लोण मध्ये अमुक अमुक माणसासाठी गॅरंटर होतो पण आता आपले नाते बिघडलं आहे त्यामुळे आता इथून पुढे मी गॅरंटर राहू शकत नाही मी ते विथड्रॉ करू इच्छितो. सहजासहजी बँक तुम्हाला तुमची गॅरंटी विथड्रॉ करू देत नाही.
कधीपर्यंत जोपर्यंत तो बॉरोवर दुसरा गॅरेंटर बँकेला देत नाही आणि बँकेला तो गॅरंटी घेण्यास समर्थ आहे हे पटत नाही तोपर्यंत जुना गॅरेंटरला बँक रिलीज करत नाही. त्याच्यामुळे जर बॉरोवर दुसरा समर्थ गॅरंटर देण्यास असमर्थ ठरला तर तुमची इच्छा असूनही तुम्ही बँकेतील गॅरंटर म्हणून तुमची गॅरंटी विथड्रॉ करू शकत नाही.
तो दुसरा गॅरंटर बँक ला पटला तर मात्र तुमची गॅरंटी बँक रिलीज करते व तुम्हाला गॅरेंटर म्हणून विथड्रॉ करायला परवानगी देतात. जर तुम्हाला अशी भीती असेल की तुम्ही एखाद्या बँकेत एखाद्या माणसासाठी एखाद्या बॉरोवर साठी गॅरंटर म्हणून सही केली असेल आणि अजून या घटकेला त्याचं अकाउंट NPA व्हायचं आहे अशी स्थिती असेल तर तुम्ही दोघांनाही पत्र लिहून बँकेला आणि त्या बॉरोवरला आपली गॅरंटी विथड्रॉ करू शकता.
पण एकदा जर लोण अकाऊंट NPA झालं तर तुम्हाला गॅरंटर म्हणून विथड्रॉ करता येणार नाही. ती NPA झालेली सगळी अमाऊंट बँक तुमच्या कडून वसूल करून घेते. कारण तुम्ही नेमकी याचीच गॅरंटी दिलेली असते की याने नाही दिले तर मी देईल. त्याच्यामुळे सावध व्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही उगीच मैत्री खातर किंवा फारसे कळत नसल्यामुळे बँक गॅरंटर म्हणून तुम्ही सही केला असाल आणि तुम्हाला वाटते की भविष्यत हा माणूस डिफॉल्ट ठरू शकतो आणि बँक तुमच्या घरापर्यंत वसुलीसाठी येईल असं वाटत असेल तर आजच जा आणि बँकेतील गॅरंटी विथड्रॉ करायची प्रोसेस सुरू करा.
याचं कारण असं की कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणात बँकेतील अकाउंट NPA व्हायला लागले आहे आणि गॅरंटरच्या घरापर्यंत बँका यायला लागले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच सावध होऊन योग्य ती काळजी घ्या आणि स्टेप घेऊन कार्यवाही करून स्वतः गॅरंटी मधून मोकळे व्हा. तर ही होती माहिती जर तुम्ही एखाद्या बँकेत गॅरंटर असाल तर गॅरंटी कशी विथड्रॉ करायची याबद्दल.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.