कागदोपत्री 1 एकर शेतजमीन विकत घेतली, परंतु प्रत्यक्षात ती जमीन 1 एकर पेक्षा कमी असेल तर काय करावे?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

बरेच वेळा आपल्या असे पाहण्यात येते की एखाद्या जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करते वेळी फक्त 7/12 उतार्‍यावर असलेले जमिनीचे क्षेत्र पाहून व्यवहार केला जातो. जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना प्रत्यक्षात जमिनीची मोजणी करून घेणे टाळले जाते, आणि पुढे काही काळानंतर जमीन खरेदी करणार्‍या व्यक्तीच्या लक्षात येते की प्रत्येक्षात जमिनीचे क्षेत्र हे 7/12 उतार्‍यावरील क्षेत्रापेक्षा कमी आहे.

अश्या परिस्थितिमध्ये आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडणार की यावर काय उपाय आहे? तर आज आपण या लेखात याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ. हा फरक कशामुळे येतो? यावर कायदेशीर पर्याय काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ.

मित्रांनो, 7/12 उतार्‍यावर असलेल्या क्षेत्रापेक्षा जमिनीचे प्रत्यक्षात असलेले क्षेत्र कमी किंवा जास्त असण्याचे 2 प्रमुख कारणे असतात. त्यापैकि पहिले कारण म्हणजे महसुली अभिलेख बनवताना त्यामध्ये झालेली चूक किंवा जमिनीवर शेजारील व्यक्तीने केलेले अतिक्रमण. बहुतांश वेळा या दोन पैकी कोणत्याही एका कारणामुळेच कागदोपत्री असलेले क्षेत्र आणि प्रत्येक्षात असलेले जमिनीचे क्षेत्र यामध्ये तफावत दिसून येते.

आता तुम्ही म्हणाल हे सर्व तर ठीक आहे, परंतु यावर पर्याय काय आहे? तर महसुली अभिलेख बनवताना झालेल्या चुकांमुळे कागदोपत्री जमिनीचे क्षेत्र बदलले असेल तर त्याबाबत आपल्याला काही विशेष करता येईल याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण जमीन खरेदी करतो, तेव्हा जर आपण व्यवहार क्षेत्रफळानुसार मोबदला ठरवत असाल, तर असा क्षेत्रफळ मोजणी करून नक्की किती आहे? त्याची खात्री केलेलं कधीही योग्य ठरतं.

म्हणजे बघा, 7/12 उतार्‍यावर देखील 1 एकर क्षेत्र असेल म्हणून तुमचे खरेदी खत हे 1 एकर एवढ्या क्षेत्रासाठीचे असेल, तर हा व्यवहार करण्यापूर्वि आपण प्रत्येक्षात जमिनीचे मोजणी करून घेणे कधीही फायद्याचे ठरते. समजा महसुली अभिलेखातील चुकीमुळे 1 एकर क्षेत्रपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीचे कागदोपत्री क्षेत्र हे 1 एकर झालेले असेल, तर आपला व्यवहार तोट्याचा ठरेल.

आता, अश्या प्रकारच्या तफावतीचे दुसरे कारण म्हणजे शेजारील व्यक्तीने आपल्या क्षेत्रात केलेले अतिक्रमण. तर यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एक म्हणजे दिवाणी न्यायालयात या संदर्भात रीतसर दावा दाखल करणे. अश्या प्रकारे आपल्या क्षेत्रात शेजारील व्यक्तीने केलेले अतिक्रम काढून टाकणे शक्य होते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *