तुम्हाला आईस्क्रीमचा कोणता फेल्व्हर आवडतो. आईस्क्रीमचा पहिला घास तोंडात गेल्यावर सगळा मुडच बदलून जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, खरंच आपल्याला आईस्क्रीम इतकं का आवडतं. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपल्या मेंदूत नेमकं काय घडतं? आईस्क्रीमचा शोध लावला कोणी? चला तर मग समजून घेऊया…
जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आईस्क्रीम कोणी तयार केले? हा वादाचा आणि चर्चेचा विषय आहे. यावरून अनेक फूडक्षेत्रांत देखील अनेक मत-मतांतरे आहेत, पण आईस्क्रीमचा शोध हा फ्रीज आणि रेफ्रिजरेटरचा शोध लागण्यापूर्वीच लागला हे मात्र नक्की आहे. ज्या मानवी संस्कृती बर्फ पडणाऱ्या प्रदेशात होत्या तिथे त्यांनी त्यांच्या पद्धतीने एखादा थंड खाद्य पदार्थ किंवा थंड पेय तयार केलं होतं एक आइस्क्रीमचा पूर्वरूप मानलं जातं.
पहिल्या शतकात रोमन सम्राट निरो त्याच्या सरबतामध्ये टाकण्यासाठी सेवकांना डोंगरावरती जाऊन बर्फ सांगायचा असं म्हटलं जातं. तर चीनमधील अनेक राजवटीमध्ये सम्राट गोठवलेला दुधासारखा पदार्थ खात असल्याच्या नोंदी आहेत. बर्फावर मीठ घातलं की, बर्फाच तापमान शून्य पेक्षा कमी होते, याचा शोध माणसाला कधी लागला? हे शोधलं तर त्यावरून आईस्क्रीमचा शोध कधी लागला याचा अंदाज लावला जाऊ शकतो, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे.
साधारण -10 ते -20 तापमानामध्ये आईस्क्रीम छान तयार होतं. चायनीज, अरब आणि भारतीय संस्कृती मधल्या लोकांना बर्फ आणि मीठ वापरून अँडोथार्मिक इफेक्ट्स असलेल्या नोंदी इतिहासात असल्याचं एका पुस्तकात म्हटले आहे. ख्रिस्तपूर्व 400 काळाची काही शेकडो बांधकाम बर्फ साठवण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज आहे. मार्कोपोलो हा प्रसिद्ध व्यापारी आणि प्रवासी युरोपात परतला तेव्हा त्याने चीनमधल्या अनेक पाककृती व्हेज रेसिपीज युरोपात आणले होते.
आईस्क्रीम तयार करण्यासाठी कोणते घटक वापरले गेले पाहिजेत? या गोष्टींचा शरीरावर ती काय बरावाईट परिणाम होतो? याबद्दल आपण पुष्कळ ऐकलं असतं. पण अनेक गोष्टी घडतात, ज्यामध्ये मेंदू समोर असलेला तो भाग जो निर्णय घेण्याच्या प्रकियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. आईस्क्रीमची फक्त चव घेतल्यानंतर मेंदूच्या या भागांतून प्रतिक्रिया यायला लागल्याच 2021 मध्ये केलेल्या एका अभ्यासात आढळलं होतं. तसेच चांगल्या दर्जाच्या आईस्क्रीममध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे ते खाणाऱ्याचे शरीरातील ग्रंथीची पातळी सुधारते आणि आपला मूड चांगला होतो. शिवाय या मधलं साखर आणि थंडावा कॉम्बिनेशन खाणाऱ्याला सुखावणारं असतं.
आईस्क्रीम खाल्ल्यावर कधी-कधी मेंदूला मुंग्या आल्यासारखा होतं? डोकं दुखतं? असं का होतं? याला ब्रेन फ्रिज असं म्हटलं जातं. आईस्क्रीम हेडएक ही संज्ञा 1939 मध्ये सगळ्यात आधी वापरण्यात आली होती. या प्रकारची डोकेदुखीमध्ये सहसा कपाळाच्या इथे दुखतो, कधीकधी कानाजवळ किंवा डोळ्यामागे दुखतं. तर कधीकधी थंड पदार्थांचा संपर्क आल्यानंतर रक्तपेशी आकुंचन पावतात. त्यामुळे आपल्या तोंडात टालूमधील काही नसा दुखावल्याचा संदेश मेंदूकडे पाठवतात आणि यावर उपाय म्हणून मेंदूकडे गरम रक्तपेशींचा प्रवाह पाठवला जातो आणि रक्तप्रवाह झपाट्याने होणाऱ्या या बदलांमुळे डोकं दुखण्याची शक्यता असते.
मायग्रेनमध्ये होणारी डोकेदुखी देखील काहीशी याच प्रकारची असते. ज्या महिलांना मागच्या वर्षभरामध्ये किमान एकदा मायग्रेनचा त्रास झाला होता. त्यांना थंड खाल्ल्याने डोकेदुखी वाढण्याची शक्यता दुप्पट असते, असं स्वीडन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट यांनी केलेल्या एका संशोधनात आढळलं होतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चिमात्य जगामध्ये रेफ्रिजरेशन तंत्रज्ञान परवडण्याजोगा झालं आणि आईस्क्रीमची औद्योगिक पातळीवर निर्मिती आणि विक्री निर्माण झाली.
2024 मध्ये जगाची आईस्क्रीम उद्योगाची उलाढाल 103.4 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरामध्ये आहे.