बँकेचे अथवा फायनान्स कंपनीचे कर्ज फेडल्यानंतर त्यांच्याकडून हे कागदपत्र आवश्य घ्या, अन्यथा होऊ शकतो आर्थिक तोटा.

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आजकालच्या काळात घरासाठी, गाडीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी देखील कर्जाची आवश्यकता भासते. घर बांधणे महाग झाले आहे, नवीन कारच्या किमती वाढल्या आहेत, उच्च शिक्षणासाठी पैशांचा डोंगर उभा करावा लागतो. सर्वसामान्य व्यक्तींना एवढा सारा पैसा एकाच वेळेला उभा करणे शक्य होत नाही. मग अश्यात मदत होते ती बँक कर्जाची. बँकेत कर्ज घेऊन लोक काही महत्वाचे कामे मार्गी लावतात. आता कर्ज कसे घ्यायचे आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे हे तर आपण सर्वांना माहीतच आहे. बरेच लोक वेळेवर कर्ज फेडतात देखील. परंतु बहुतांश लोकांना हे माहीत नसते की कर्ज फेडल्यानंतर आपण बँकेकडून काही कागदपत्र घेणे गरजेचे असते. हे कागदपत्र आपणास भविष्यात खूप उपयोगी पडते आणि पुढे होणारा त्रास देखील कमी होतो.

आजच्या या लेखात आपण बँकेचे कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून कोणकोणते कागदपत्र आपण घ्यावे? त्या कागदपत्रांचा पुढे काय उपयोग होतो? ते कागदपत्र नाही घेतल्यास काय नुकसाक किंवा त्रास होईल याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा.

कर्ज घेताना तुम्ही बँकेला सादर केलेली सर्व ओरिजिनल कागदपत्रे गोळा करणे आवश्यक आहे. यापैकी काही दस्तऐवजांमध्ये सेल डीड, टायटल डीड, कर्ज करार आणि मुखत्यारपत्र यांचा समावेश असू शकतो. सर्व कागदपत्रे चांगल्या स्थितीत आहेत याची देखील तुम्हाला खात्री करणे आवश्यक आहे.

बँकेकडून ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र (एनडीसी) हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे कर्जाच्या परतफेडीनंतर आवश्य घेतले पाहिजे. NDC म्हणते की सर्व थकबाकी निकाली काढली गेली आहे आणि कर्जदाराचा मालमत्तेवर कोणताही हक्क किंवा दावा नाही. दस्तऐवजात कर्जाशी संबंधित महत्त्वाच्या तपशीलांचा उल्लेख केला पाहिजे, ज्यामध्ये मालमत्तेचा पत्ता, ग्राहकांचे नाव, कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम आणि कर्ज सुरू होण्याची आणि बंद करण्याची तारीख यांचा समावेश असावा. भविष्यात मालमत्तेमध्ये सुरळीत व्यवहार व्हावेत यासाठी NDC च्या डुप्लिकेट प्रती (आणि सॉफ्ट कॉपी देखील) बनवणे शहाणपणाचे ठरते.  आपण No Dues Certificate न घेतल्यास परत त्याच बँकेकडुन अथवा दुसऱ्या बँकेकडुन कर्ज घ्यावयाचे असल्यास आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते.

बरेच वेळा आपण शेत जमिनीवर, घरावर कर्ज उचलतो. कर्ज उचलते वेळी आपल्या प्रॉपर्टीवर बोजा चढवण्यात येतो. यामागचा मुख्य हेतु असा असतो की ज्या प्रॉपर्टीवर आपण कर्ज घेतले आहे ती प्रॉपर्टी विक्री करता येऊ नये. कर्ज पुर्णपणे फेडल्यानंतर बँकेकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे हा बोजा कमी करण्यात येतो. त्यामुळे बोजा कमी करण्यासाठी देखील बँकेकडून मिळालेल्या कागदपत्रांचा वापर होतो. हा बोजा कमी केल्याशिवाय प्रॉपर्टी हस्तांतरित करता येऊ शकत नाही.

कर्जाची परतफेड केल्यानंतर तुमचे क्रेडिट रेकॉर्ड अद्ययावत झाले आहेत का हे तपासणे शहाणपणाचे आहे. सामान्यतः, परतफेड तुमच्या क्रेडिट इतिहासामध्ये दिसून येण्यासाठी सुमारे 20-30 दिवस लागतात. त्यानंतर, तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट मिळवावा आणि अपडेट केलेला रेकॉर्ड तपासावा.

बरेच वेळा वाहन कर्ज घेताना बँक किंवा फायनान्स कंपनी आपल्या गाडीचे RC Book नोंदणी बँकेच्या अथवा फायनान्स कंपनीच्या नावाने होते. ही नोंदणी बदलण्यासाठी देखील NDC ची आवश्यकता भासते. हे NDC आपणास RTO मध्ये जमा करून RC वरील नोंदणी बदलून घ्यावी लागते. तसेच काही फायनान्स कंपन्या गाडीसोबत मिळणारी दुसरी चावी आपल्या ताब्यात ठेवतात. कर्ज फेडल्यानंतर आपण ती चावी परत घेण्याचे विसरू नये.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *