Explained : Flipkart आणि Amazon सारख्या सेल मध्ये कसा मिळतो भरघोस डिस्काऊंट? जाणून घ्या काय आहे यामागचा खेळ.

Market

नमस्कार मंडळी. आपण दररोज आपल्या इन्फो इन मराठी या वेबसाईट आणि फेसबुक पेजवर नवनवीन माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच काहीशी रंजक माहिती घेऊन आलो आहोत.

दोन प्लॅटफॉर्म्सचा वापर भारतामध्ये ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वाधिक केला जातो. Amazon आणि Flipkart… या दोन्ही कंपन्या भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज मानल्या जातात. या दोन्हीवर सध्या प्रचंड Discount मिळत आहे. अॅमेझॉनवर हा सेल ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या नावाने आहे , तर फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल सुरू आहे आणि या दोन्हीवर जोरदार सूट मिळत आहे.

Flipkart आणि Amazon चा हा सेल 23 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून सर्वांसाठी सुरू झाला होताया सेलमध्ये स्मार्टफोनपासून कपडे, गृहोपयोगी उपकरणे, गॅझेट्सपर्यंतच्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली. नेहमीप्रमाणे, प्राइम मेंबर्ससाठी एक दिवस आधी म्हणजेच 22 तारखेलाचा सेल ची सुरूवात झाली होती. भारतीयांनी देखील याचा पुरेपूर फायदा घेत बजेटच्या पुढे जाऊन खरेदी केली. परंतु सर्वांच्या मनात एक प्रश्न येतो तो म्हणजे या वेबसाईट्सला एवढा मोठा Discount देणे कसे काय परवडते? यामागचा नेमका खेळ काय आहे? चला तर मग जाणून घेऊ.

वास्तविक, या कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे विक्रेते आणि ग्राहकांना जोडणाऱ्या मध्यस्थांसारख्या आहेत. या कंपन्या विक्रेत्यांना आपल्या वेबसाइटद्वारे वस्तू विकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि त्या बदल्यात विक्रीवर कमिशन घेतात. या सेल दरम्यान व्हॉल्यूम वाढवण्यासाठी, प्लॅटफॉर्म स्वतःचे कमिशन कमी करतात. यामुळे त्यांचा जुना स्टॉक देखील साफ होतो. अशा परिस्थितीत लिक्विडेटर कंपनीकडून किरकोळ किमतीच्या २०-३०% दराने मोठा स्टॉक खरेदी करतो. त्यानंतर तो छोट्या फरकाने ऑनलाइन विक्रीसाठी ठेवतो आणि नंतर ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना खरेदीची सवय लावतात.

याचसोबत, प्रॉफिट = सेलिंग प्राइस-कॉस्ट प्राइस हा फॉर्म्युला देखील उपयोगात घेतला जातो. एखादे उत्पादन बनवण्यासाठी येणारी किंमत आणि त्या उत्पादनाची विक्री किंमत यामधील फरक म्हणजे मिळालेला नफा. आता सेल दरम्यान होणारी विक्री ही खूपच जास्त प्रमाणात होते, त्यासाठीची तय्यारी म्हणून कंपन्या अधिक प्रॉडक्ट बनवून तय्यार ठेवतात. एखादे प्रॉडक्ट जेवढे जास्त बनवले जाते तेवढी त्याची उत्पादन किंमत कमी-कमी होत जाते. सेल मध्ये discount दिल्यानंतर देखील अधिक प्रॉडक्ट विकून कंपन्या/विक्रेते आपला नफा कमावतात.

याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ठराविक बँक द्वारे दिला जाणारा Discount. flipkart वर ICICI आणि AXIS बँक बँकच्या ग्राहकांना अधिकचा Discount दिला गेला, तर Amazon वर SBI च्या ग्राहकांना अधिकचा Discount मिळाला. वास्तविक या Discount साठी Flipkart आणि Amazon सारख्या कंपन्या विविध बँकांसोबत पार्टनरशीप मध्ये हा Discount देतात. यामध्ये वेबसाईट आणि बँक दोघांचाही फायदा असतो.

जे लोक पैशांच्या कमतरतेमुळे खरेदी करू शकत नाहीत अश्या लोकांसाठी Credit Card च्या वापरावर Discount देऊन flipkart, amazon अधिक प्रॉडक्ट विक्री करतात. बँक त्या क्रेडिट कार्डवर व्याज वासूल करून भविष्यात आपला नफा वाढवतात. अश्या प्रकारे या सेलच्या खेळात कंपन्या, बँका पैसा कमवून मालामाल होतात तर ग्राहक पैसे वाचले म्हणून आनंदी होतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *