मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
चंदिगड विद्यापीठात विद्यार्थिनींचे आ’क्षे’पा’र्ह व्हिडिओ व्हायरल झाले यावरून सध्या आं’दो’ल’न सुरू आहे. या प्रकरणानंतर विद्यार्थिनींनी आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न केल्याचे दावे देखील झाले, परंतु विद्यापीठाने या अफवा असल्याचे म्हटले आहे. सगळ्या प्रकरणाची चौकशी आता पंजाब पोलिसांची SIT करत आहे. एक विद्यार्थिनी आणि तिच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
या सर्व प्रकरणावरून आपल्या मनात काही प्रश्न नक्कीच येतात. जेंव्हा एखाद्या व्यक्तीचे खाजगी व्हिडिओ काढले जातात आणि ते प्रसारित केले जातात तेंव्हा पीडितांना कायदा नेमका कसे संरक्षण देते? अश्या पीडित व्यक्तींकडे कायद्याने कोणते संरक्षण मिळते? हेच आज आपण जाणून घेऊया आजच्या या विशेष लेखात.
भारतात महिलांचे अ’श्ली’ल फोटो प्रसिद्ध करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये अशा तब्बल 1422 गुन्ह्यांची नोंद झाली आहे जिथे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 2015 पासून अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये फक्त फोटो/व्हिडिओ वायरल करून ते लोक थांबत नाही, तर अशा मुलीला अनेकदा ब्लॅकमेल केलं जातं. घरच्यांना सांगितलं तर अब्रूचे धिंडवडे निघतील म्हणून मुली मुकाटपणे एकट्याने हा त्रास सहन करतात.
मुलींसमोर नेमके कायदेशीर मार्ग काय आहेत हे आज समजून घेऊया. चंदीगड विद्यापीठात झालेला प्रकरण हा महिलां विरोधातला ऑनलाइन गुन्हा आहे आणि 2021 मध्ये 999 महिला अशा ऑनलाइन गुन्ह्यांना बळी पडलेल्या आहेत. अशावेळी आपला बचाव कसा करावा? आणि खाजगीपणा कसा जपावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
इंडिसेंट रेप्रेसेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिशन अॅक्ट. 1986 मध्ये अस्तित्वात आलेला हा कायदा महिलांचा फोटो Morf करून तो अ’श्ली’ल कारणांसाठी वायरल केला असेल तर उपयोगात आणता येतो. या कायद्याच कलम 6 महिलांना त्या विरोधात संरक्षण देतं. माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम कायदा 2000. यालाच आपण IT अॅक्ट म्हणून ओळखतो. एखाद्या व्यक्तीच्या संमती शिवाय त्याचे फोटो काढणं ते प्रसारित करणे आणि छापून आणणं हा गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सध्या चंदिगड विद्यापीठातही याच कायद्याच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.
भारतीय दंड संहिता मध्येही काही संरक्षण पहण्यास मिळते. एखाद्या महिलेला तिचे अ’श्ली’ल फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने लैं’गि’क सं’बं’ध ठेवणं हा गंभीर गुन्हा आहे आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार अशा गुन्ह्यासाठी तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि आर्थिक दंड होऊ शकतो. ही शिक्षा गुन्ह्याच्या गंभीरते नुसार पाच वर्षांपर्यंत वाढू शकते. महत्त्वाचं म्हणजे महिलेने फोटो काढायला परवानगी दिली पण तो प्रसारित करायला नाही आणि तरीही तो फोटो व्हायरल झाला तरीही तो गुन्हा आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.